Drushti - Vision for Blind

Drushti - Vision for Blind We believe that People with dis-Ability can be empowered by sowing the seeds of financial & emotional stability.

Our vision is to reach out to them and empower them by enabling to live their life with dignity and respect.

येथे दिलेल्या बातमीतील मजकूर मराठीत आहे. तुमच्या सुविधेसाठी मी या बातमीचे मजकूर स्वरूपात रूपांतर खाली दिले आहे:अंधत्वावर...
31/03/2026

येथे दिलेल्या बातमीतील मजकूर मराठीत आहे. तुमच्या सुविधेसाठी मी या बातमीचे मजकूर स्वरूपात रूपांतर खाली दिले आहे:
अंधत्वावर मात... विनायकचा नर्मदे हर... जयघोष
नगरच्या युवकाची धाडसी नर्मदा परिक्रमा यात्रा यशस्वी
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - तो ३३ वर्षांचा युवक पूर्णतः अंध आहे. पण, त्यामुळे तो खचलेला नाही वा त्याचा आत्मविश्वासही कमी झालेला नाही. अंधत्वाचा बाऊ न करता धाडसाने भटकंती करीत शिवनेरी-पुरंदरसारख्या शिवछत्रपतींच्या गडांवर जाऊन तेथील माती मस्तकाला लावण्याचे भाग्य त्याने मिळवलंय. त्यानंतर अष्टविनायक आणि महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचे व माहूर गडावरील रेणुका मातेचे दर्शनही त्याने घेतलंय... या भटकंतीच्या अनुभवाच्या जोरावर त्याने चक्क नर्मदा परिक्रमेचे शिवधनुष्य नुकतेच धाडसाने पेलले.
अंधत्वाची कोठेही अडचण त्याला आली नाही. मंदिरांच्या दगडांना स्पर्श केल्यावर त्याला देवाचे दर्शन घडल्याची व भेटलेल्या माणसांच्या स्पर्शातून भावभक्तीची अनुभूती त्याने घेतली.... अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोडवर राहणाऱ्या विनायक धूत या युवकाची यशस्वी झालेली नर्मदा परिक्रमा त्याला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे करीत आहे. तो या परिक्रमेची कथा सांगतो... तेव्हा आपण प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेत आहोत काय, अशी जाणीव ऐकणाऱ्यांना होते...
अंधांना स्वावलंबी करण्यासाठी अनेकविध उपक्रम राबवणारे मूळचे नगरकर स्वागत थोरात यांनी अंधांना शिक्षण देण्यासाठी ब्रेल पाक्षिक सुरू केले आहे. अहिल्यानगरमधील या ब्रेल पाक्षिकाचा युवा वाचक विनायक धूत याने नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या परिक्रमेविषयी त्याने जे लिहिलंय ते थोरात यांनी सोशल मीडियातून सर्वदूर पोहोचवले आहे. नर्मदा परिक्रमेवर विनायक धूत याने ओघवत्या शैलीत माहिती दिली आहे. स्वावलंबनाची पाऊलवाट... तंत्रज्ञान आणि श्रद्धेच्या बळावर माझी एकल नर्मदा परिक्रमा झाली. नर्मदा परिक्रमेबद्दल एक अतिशय प्रचलित म्हण आहे - परिक्रमा ही एकट्यानेच करावी.
कुटुंबीयांचे प्रोत्साहन ठरले ताकद
* विनायक धूत याचे वडील रामप्रसाद धूत कांदा मार्केटमध्ये व्यापारी आहेत तर आई शकुंतला धूत या गृहिणी आहे. मोठा भाऊ व बहीणही त्याला आहे. या सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिले.
* विनायक स्वतः अहिल्यानगर शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या डाळ मंडई शाखेत वरिष्ठ ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून काम करतो.
* पॉलिटिकल सायन्समध्ये त्याने पदवी घेतली आहे. अंधत्वावर मात करण्यासाठी त्याने अनेक ऑनलाइन कोर्सेस केले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे अभ्यासक्रमही केले आहेत.
* अंध व दिव्यांग व्यक्तींना तो मार्गदर्शन करतो. स्वतःच्या भटकंतीच्या अनुभवातून तो त्यांना आत्मविश्वासाने उभे राहण्याची प्रेरणा देतो.
* नर्मदा परिक्रमेत तो स्वतः ३० किलोमीटर कोणाचीही मदत न घेता चालला आहे. अहिल्यानगर शहराच्या लौकिकात भर घालणारी अभिमानास्पद कामगिरी त्याने केली आहे.

दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाईंड या संस्थेने आता पर्यंत केलेल्या कामाचा आढावा पुढील प्रमाणे 1. महाराष्ट्रात अंध मित्र मैत्रिण...
03/12/2025

दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाईंड या संस्थेने आता पर्यंत केलेल्या कामाचा आढावा पुढील प्रमाणे 1. महाराष्ट्रात अंध मित्र मैत्रिणीं शिक्षणामध्ये व स्पर्धा परीक्षेमध्ये पेपर लिहण्यासाठी 400 पेक्षा जास्त लेखनिक (Writer) टीम उभारली आहे आणि 80 पेक्षा जास्त विद्यार्थी आज वेळवेगळया पदावर कार्यरत आहेत 2. महाराष्ट्रातील 4 विद्यापीठ आणि 8 जिल्ह्यामध्ये व सुरत, गुजरात मध्ये महानेत्रदान शिबीराचे आयोजन करून 15,500 विद्यार्थी मित्रांकडून नेत्रदानाचा संकल्प केला आहे 3. दरवर्षी दिव्यांगांमधुन 10 ते पदवीधर परीक्षेत अव्वल येणारे व विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ 4. पुण्यातील 6 अंध अपंग हॉस्टेल ला वेळोवेळी गरजेच्या वस्तु भेट 5. खास दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी ब्रेल निबंध, गायन, बुद्धिबळ, बासरी, सांस्कृतिक स्पर्धां, व्यक्तिमत विकास कार्यशाळा आयोजन करण्यात येते 6. भारत सरकारच्या Online Unique Disability Identity Card हे 300 पेक्षा जास्त लोकांना फ्री मध्ये काढून देण्यात आले आहेत 7. दरवर्षी दिव्यांगांसाठी समाजात तळागाळात काम करणाऱ्या संस्थांना, विद्यार्थ्यांना, Writer ग्रुप यांना आणि डोनेशन करणाऱ्या या सर्वांचा सन्मान करण्यात येतो 8. DONETKART या संस्थेकडून 15 ऑक्टोबर 2020 रोजी 620 पांढऱ्या काठ्या डोनेशन स्वरूपात दृष्टी या संस्थेला मिळाल्या आणि दृष्टी संस्थेने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये सर्व विविध संस्थांच्या संयुत विद्यमाने कार्यक्रम आयोजित करून सर्व अंध व्यक्तींना त्या वाटप करण्यात आल्या

15/10/2025

✨ मदत नको संधी द्या ✨

दिव्यांग असणं म्हणजे अशक्तपणा नाही…
थोडी साथ, थोडी संधी, आणि विश्वास दिलात तर —
तेही उभं राहू शकतात, आपला व्यवसाय उभारू शकतात! 💪

🙏 दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाईंड, पुणे तर्फे
दिव्यांग बंधू श्री रमेश उणवणे यांना
अगरबत्ती, कापूर, पणती, आणि Rose बॉटल व्यवसायासाठी देण्यात आले 🌺

हे आमचे 45 वे उद्योजक —
एकच ध्यास... दिव्यांगांचा विकास! 📈

✨ आपणही हात द्या, पण मदतीचा नाही — संधीचा! ✨

आपला
श्री सागर धुमाळ
संस्थापक अध्यक्ष - दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाईंड

#मदतनकोसंधीद्या #दिव्यांगउद्योजक #सकारात्मकबदल

मॅग्नेटी मरेली मदरसन शॉक ऑब्झव्हरर्स, इंडिया कामगार संघटना संलग्न ( शिवक्रांती कामगार संघटना ) यांच्या ५ स्नेह मेळावा या...
18/11/2024

मॅग्नेटी मरेली मदरसन शॉक ऑब्झव्हरर्स, इंडिया कामगार संघटना संलग्न ( शिवक्रांती कामगार संघटना ) यांच्या

५ स्नेह मेळावा या निमित्त

मॅग्नेटी मरेली मदरसन शॉक ऑब्झव्हरर्स, इंडिया कामगार संघटना संलग्न ( शिवक्रांती कामगार संघटना )
आणि
दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे - यांच्या सहकार्यातून

मदत नको संधी - अंध अपंग निर्मित - वस्तु विक्री केंद्र

दिव्यांग बंधू भगिनींना हि संधी उपलब्ध देण्यात आली त्याबद्दल सर्व मॅग्नेटी मरेली मदरसन शॉक ऑब्झव्हरर्स, इंडिया कामगार संघटना संलग्न ( शिवक्रांती कामगार संघटना ) परिवाराचे खुप खूप आभार आणि कौतुक...!

प्रमुख पाहुणे कामगार नेते / ॲड. विजयराव पाळेकर साहेब
मॅग्नेटी मरेली मदरसन शॉक ऑब्झव्हरर्स, इंडिया कामगार संघटना संलग्न ( शिवक्रांती कामगार संघटना )

दिव्यांग मित्र श्री. दत्तात्रय काळडोखे - राष्ट्रीय पुरस्कृत बासरी वादक.

श्री. निलेश पवार - दृष्टी परिवाराचे सदस्य यांच्या सहकार्याने हि संधी मिळाली त्याबद्दल निलेश मनापसून खूप खूप कौतुक आणि अभिनंदन...

आपला
श्री. धुमाळ सागर
संस्थापक अध्यक्ष , दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे

आपल्या सर्वांना दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छादृष्टी - व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे जे व्ही एस फ्रेंड्स ग्रुप आणि श्री कृष्ण मं...
16/11/2024

आपल्या सर्वांना दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छा
दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे जे व्ही एस फ्रेंड्स ग्रुप आणि श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट या संस्थांच्या वतीने
श्री कृष्णा मंदिर, निगडी पुणे येथे १९ ऑक्टोबर २०२४ रोजी
209 विशेष दिव्यांग बंधू भगिनी
ममता अंध अपंग अनाथ कल्याण केंद्र येथे 27 विशेष दिव्यांग मित्रांना
अनामप्रेम सुखसागर बिबवेवाडी, पुणे येथे संस्थेतील १४ विशेष मुलांना आणि २५ गरजू व्यक्ती एकूण 275 दिव्यांग बंधू भगिनी या सर्वांच्या सोबत दिवाळी फराळ वाटपाचा छान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

आज किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री मध्ये दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड यांच्या सहकार्यातून "मदत नको संधी द्या"या उपक्रमअंतर्गत दिव...
28/10/2024

आज किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री मध्ये दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड यांच्या सहकार्यातून "मदत नको संधी द्या"
या उपक्रमअंतर्गत दिवाळी निमित्त दिवाळी वस्तु स्टॉल चे आयोजन केले आहे

#दिवाळी #दिवाळी2024

CYBAGE Scholarship Distribution Ceremony - 2024 कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांनी पुण्यात स्व कर्तुत्वा...
14/10/2024

CYBAGE Scholarship Distribution Ceremony - 2024 कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांनी पुण्यात स्व कर्तुत्वातर अडमिशन मिळवले अश्या २८४ विद्यार्थी विद्यार्थीनींना CYBAGE खुशबू फौंडेशन तर्फे इंजिनिअरींग, मेडिकल, मॅनेजमेंट , प्रोफेशनल कोर्सेस साठी तब्बल १ कोटी ८४ लाख रुपये या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप च्या स्वरुपात देण्यात आली

आतापर्यंत २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्यात आली आहे आणि याचे एक छोटेसे फळ म्हणजे या कार्यक्रमात ३ विद्यार्थी आले होते
त्यातील एक मुलगी तिला मार्क्स चांगले होते पण घरची परिस्थिती हलाकीची होती आणि आई वडिलांच्या म्हणण्या नुसार तिला इंजिनिअरींग ला अडमिशन घेतले होते परंतु तिला आर्कीटेक्चर बनायचे होते आणि हे स्वप्न घेवून तिला CYBAGE खुशबू मुळे तिची आर्कीटेक्चर बनायची पूर्ण झाली आणि ती आता नामांकित कंपनी मध्ये आर्कीटेक्चर चा जॉब करत करत साईड बाय साईड आता स्वतः छोटासा बिझनेस हि सुरु केला आहे.
२. इचलकरंजी जवळ च्या एका छोट्या गावातून लहानपणीच वडील गमावलेला तन्मय आणि त्याची आई या दोघांनी एक मेकांना सांभाळत गरीब परिस्थितून कसे बसे शिक्षण पूर्ण केले आणि COEP पुणे सारख्या इंजिनिअरींग मध्ये नंबर लागल्यानंतर फी भरायला हि पैसे नव्हते पण हिम्मत न हारता धडपड करून CYBAGE स्कॉलरशीप ला APPLY केले आणि ४ वर्षे या स्कॉलरशीपच्या जिवावर स्वतःचे शिक्षण पुर्ण केले चांगल्या कंपनी मध्ये सिलेक्शन हि झाले होते परंतु सरकारी परीक्षा देवून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न होते आणि आज MPSC सरळ सेवा मध्ये राज्यात १० क्रमांक प्राप्त करून Class 1 म्हणून CO म्हणून लवकरच महानगरपालिका मध्ये सहाय्यक उपायुक्त म्हणून लवकरच पदभार सांभाळेल असे सांगितल्यानंतर आम्हा सर्वांना अभिमान आणि कौतुक वाटले आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

जेवढे तुम्ही इतरांना चांगल्या गोष्टी द्याल त्या तुम्हाला १०X ने परत मिळतातच याचा जिवंत अनुभव देखील पाहायला मिळायला

तसेच CYBAGE कंपनीचे सर्वे सर्वा FOUNDER & CEO श्री अरुण नथानी सर आणि त्यांचा प्रवास २ BHK FLAT मधून ४ इंजिनीअर सोबत सुरु केला होता आज CYBAGE कंपनी भारतात तर नाव मोठे केले ते केले परंतु अजून १० देशात हि स्वतःचा बिझनेस आणि ऑफिस उभारले भरपूर मोठा रोजगार हि उभारला
तसेच त्यांच्या सौ रितू नथानी मॅडम यांनी अरुण सरांना खंबीर पणे साथ देत डायरेक्टर म्हणून CYBAGE खुशबू आणि CYBAGE आशा फौंडेशन उभारले आणि गेले १५ वर्षे या फौंडेशन च्या माध्यमातून ग्रामीण भागात शेती चा विकास असो वा महिला वर्गासाठी सक्षमीकरण असो वा स्कॉलरशीप सारखा शिक्षणासाठी बळ देणारा प्रोग्राम हाथी घेवून जिद्दीने , मेहनतीने समाजासाठी तन मन धनाने निस्वार्थ कार्यरत आहे.

Scholarship Distribution Ceremony च्या कार्यक्रमा निमित्त या कार्यक्रमामध्ये एक पावरफुल बिझनेस लिडर श्री अरुण नथानी सर आणि प्रेमळ आणि एनर्जी टिक सामाजिकदृष्ट्या तळमळ अश्या सोशल हिरो सौ रितू नथानी मॅडम यांना भेटण्याचा योग आला या थोड्याश्या सहवासाने व गप्पागोष्टी मुळे माझी एनर्जी तर पावर फुल झाली आणि सोबत POSITIVE VIBES देखील मिळाल्या हे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी लाभल्या कु. शर्मिला शेंडे मॅडम (Deputy Educational Officer, Goverment Of Maharashtar)
१. Top ५ मध्ये Best Speakar अवार्ड - मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते MIT छात्र संसद पुणे येथे देण्यात आला

या कार्यक्रमाला आम्हाला पाहुणे म्हणून संधी दिली ते CYBAGE कंपनी चे CSR प्रतिनिधी व माझा जिवलग मित्र राकेश कांबळे याचे हि खूप खूप आभार आणि CYBAGE परिवारातील CSR HEAD प्रशांत महामुनी सर आणि त्यांची सर्व टिम यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार

श्री. धुमाळ सागर
संस्थापक अध्यक्ष - दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे
Founder & CEO - DIGITAL KATTA PUNE

Cybage C S R

सर्व पुणेकरांना एक छोटेसे आव्हान करत आहे मदत नको सेवेची संधी द्या आपल्या हत्ती गणपती चौक, पुणे येथे दरवर्षी अद्वैत परिवा...
14/09/2024

सर्व पुणेकरांना एक छोटेसे आव्हान करत आहे

मदत नको सेवेची संधी द्या

आपल्या हत्ती गणपती चौक, पुणे येथे दरवर्षी अद्वैत परिवार तर्फे दिव्यांग बंधू भगिनी हे विविध वस्तूंचे व खाद्य पदार्थांचे STALL लावतात

एक वेळ आवश्य भेट द्या

आणि इथे आम्ही सर्वाना आव्हान करतो "मदत नको संधी द्या" या उर्जेतून आम्ही सर्व विविध स्टॉल लावून गणपती पहायला येणाऱ्या मित्र मैत्रिणीसाठी व आपल्या सर्वांच्या सेवासाठी १० दिवस असतात

हि संकल्पना गेली २० वर्षे चालू आहे इथून पुढे हि चालू राहील

अभिमानाची गोष्ट अशी कि आमचा दिव्यांग मित्र निशांत याने चॉकलेट चे स्टोअर सुरु केले आहे आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहत आहे आणि भविष्यात खूप मोठा चॉकलेट च्या उद्योजक व्हावा हि ईश्वरचरणी प्रार्थना

डोळे नसले म्हणून काय झाले स्वतःची पदवी पूर्ण केली आणि आता हाथ कोणापुढे न पसरता स्व बळावर माझा दिव्यांग मित्र शुभम गायकवाड याने चांगल्या प्रकारचे सेंट्स आणि अत्तर चा व्यवसाय विक्री सुरु केली

तसेच माझे जिवलग दिव्यांग मित्र शिवाजी लोंढे जो SBI मध्ये PO पदावर आहे आणि तसेच २०१४ ब्लाईड क्रिकेट विश्व चषक मध्ये पाकिस्तान ला हरवून भारताला विजय मिळवून देणारा अमोल कर्चेकर आज EPFO विभाग मध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे

आमची रीना ताई पाटील रा. तासगाव जिल्हा एकच आमचा सांगली पण ती पुण्याला SBI बँके मध्ये आहे आणि तिने आम्हाला डोळे नसलेला व्यक्ती मोबाईल द्वारे कीबोर्ड चा करु शकतो आणि MS-OFFICE वर काम कसे करायचे हे सांगितले तर करून दाखवले - आपल्या कडे डिव्हाईस असून आपण वापर करत नाही आणि असाही चांगला वापर होवू शकतो हे तिने आम्हाला शिकवले

या माझ्या दिव्यांग मित्राना मैत्रिणींना भेटल्यावर मला अभिमान वाटतो आणि माझी ENERGY वाढते

मी भेट दिली आता तुम्ही पण भेट देवून दिव्यांग बंधू भगिनींचा उत्साह वाढवावा
हि विनंती



आपला
श्री. सागर धुमाळ
संस्थापक अध्यक्ष - दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे

Late Post : बिझनेस टायकून - मा. श्री संजय घोडावत साहेब यांची - ग्रेट भेट  आणि HDFC - परिवर्तन व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट...
06/07/2024

Late Post : बिझनेस टायकून - मा. श्री संजय घोडावत साहेब यांची - ग्रेट भेट आणि HDFC - परिवर्तन व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट सोबत ३ वर्षे बिझनेस मेंटरचा प्रवास आणि
नव उद्योजक - VIP ओम सुतार, घोगाव याचा एक सुंदर प्रवास.. नक्की पहा
https://www.youtube.com/watch?v=AodTQCqsTSY

HDFC - परिवर्तन व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट यांनी मेंटर म्हणून निवड केली या मेंटरशिप प्रवासात भरपूर नव उद्योजक भेटले त्यांच्याशी उद्योगा विषयी चांगल्या वाईट संकटांना तोंड कसे द्यायचे , कर्जाच्या हफ्त्याच्या टेन्शन, बिझनेस GROW कसा करायचा, मार्केटिंगच्या डिजिटल व प्रिंटींग च्या टेकनिकस, Strategy कश्या आखायच्या त्याचे व्यवस्थापन आणि भरपूर गोष्टींवर चर्चा करत मार्ग अश्या गोष्टी शिकलो आणि शिकवता ही आल्या.

HDFC - परिवर्तन व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट यांच्या सहकार्याने घोडावत ग्रुपचे सर्वे सर्वा मा. श्री. संजय घोडावत सरांना भेटण्याचा योग आला त्यांच्या कडून बिझनेस ला Grow कसे करायचे Dicipline ठेवून वेळे व काम करणे कोणत्याही संकटांना न घाबरता पुढे कसे जायचे याविषयी उदाहरणे दिली

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांना लहान पनापासून फक्त TV आणि पेपर मध्ये पाहिले मा. श्री. संजय घोडावत हे आपल्या जयसिंगपूर भागातले आहेत आणि हि गोष्ट मला कळाली आणि एवढा माणूस ज्याचा बिझनेस भारत आणि जगभर आहे आणि एवढी मोठी व्यक्ती आपल्या या मातीतील आहे हे आईकल्यावर खुप अभिमान वाटला आणि खूप आनंद झाला

पुन्हा एकदा सर्व HDFC - परिवर्तन व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि मा. सर्व पदाधिकारी व सहकार्य श्री. राम कांबळे, विशाल चव्हाण, दिग्विजय पाटील, आमचे मित्र उत्तम पाटील सर्व उद्योजक व मेंटर्स परिवाराचे खुप खुप आभार...

स्वप्न पाहण्याची हिंमत करा, त्यासाठी प्रयत्न करा आणि यश मिळवा..!

आपल्या सर्वांना दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छादृष्टी - व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे या संस्थेच्या वतीने श्री कृष्णा मंदिर, निगड...
10/11/2023

आपल्या सर्वांना दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छा
दृष्टी - व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे या संस्थेच्या वतीने
श्री कृष्णा मंदिर, निगडी पुणे येथे 147 विशेष दिव्यांग बंधू भगिनी
ममता अंध अपंग अनाथ कल्याण केंद्र येथे २५ विशेष दिव्यांग मित्रांना
माई बाल भवन संस्था देहू रोड, ४० स्पेशल दिव्यांग भगिनींना आणि
अनामप्रेम संस्थेतील २० विशेष मुलांना आणि १३ गरजू व्यक्ती एकूण २८५ दिव्यांग बंधू भगिनी या सर्वांच्या सोबत दिवाळी फराळ वाटपाचा छान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

प्रमुख पाहुणे :
शर्मिला अजिनाथ शेंडे - उप शिक्षणाधिकारी, जिल्हा परीषण , पुणे
श्री. सूर्यभान जाधव - प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य
श्री. आशुतोष शिरोळकर - संस्थापक अध्यक्ष - अराईज विश्व सोसायटी, पुणे
श्री, सी. पी शशीधरण, अध्यक्ष - श्री. कृष्ण मंदिर ट्रस्ट, निगडी, पुणे
श्री. अम्रीतांश शर्मा - संगणक अभियंता, पुणे

कार्यक्रमाचे आयोजक :
श्री. सागर भगवान धुमाळ - संस्थापक अध्यक्ष - दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे
श्री. विजय रमेश बुरुंगले - ट्रस्टी - दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे
सौ. भावना रोहित पाटील-कुतवळ, खजिनदार - दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे
श्री. भुलेश्वर शुक्लेश्वर बोरुडे, सेक्रेटरी - दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे
कु. अमर खारतोडे - ट्रस्टी - दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे
सौ. जयश्री गोरे- बोरुडे - ट्रस्टी - दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे

या कार्यक्रमाला ज्यांनी आर्थिक स्वरुपात आणि वस्तू स्वरुपात मदत केली अश्या सर्व डोनर यांचे खुप खुप धन्यवाद आणि कौतुक आपल्याशिवाय हा कार्यक्रम अशक्य चा शक्य झाला त्याबद्दल मी दृष्टी परीवार्तर्फे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो असेच प्रेम आमच्या वर आपल्या दिव्यांग बंधू भागींनीवर राहो आणि आपली सर्वांची प्रगती व्हावी हि ईश्वरचरणी प्रार्थना...!

आपला विश्वासू
श्री. सागर धुमाळ - संस्थापक अध्यक्ष, दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे

Address

Pune
PUNE

Telephone

+919730277442

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drushti - Vision for Blind posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Drushti - Vision for Blind:

Share