05/06/2026
मागच्याच शुक्रवारी सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत अण्णांचा (माझ्या मावशीचे मिस्टर - सोपान रखमा कोलपाक) शंभरावा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झालेला आणि आज सकाळी अण्णांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली😭 घरातील सर्वांनी शेवटपर्यंत चांगली काळजी घेतल्यामुळे अण्णा सुखी-समाधानी शंभर वर्ष आयुष्य जगले याचे सर्वांना नक्कीच समाधान आहे.
अण्णांच्या वाढदिवसाला मला जाता आले नव्हते आणि आजही जाता येत नाहीये, याची माझ्या मनात कायम खंत राहील. नियतीच्या मनात काय असतं काय माहित. भावपूर्ण श्रद्धांजली💐. ईश्वर अण्णांच्या आत्म्यास शांती देवो.🙏