Dhyeya Foundation

Dhyeya Foundation राष्ट्रसेवा हेच आमुचे ध्येय

*तुम्ही सर्वांनी तीन कुटुंबाच्या आयुष्यात उजेड निर्माण केला…* दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि आशेचा सण.या दिवाळीत आपण एक ...
29/10/2025

*तुम्ही सर्वांनी तीन कुटुंबाच्या आयुष्यात उजेड निर्माण केला…*

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि आशेचा सण.
या दिवाळीत आपण एक छोटा उपक्रम सुरू केला —
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एका कुटुंबाला रोजगार देण्यासाठी एक शिलाई मशीन देण्याचा.
उपक्रमाचा प्रतिसाद आणि आपली देण्याची वृत्ती यामुळे तीन शिलाई मशीन आपण पोहचवू शकलो

आपल्या सगळ्यांच्या मदतीतून या शिलाई मशीन गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात पोहोचल्या आहेत.
या मशीनमुळे तिथल्या गरजू महिलांना आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नवी संधी मिळाली आहे.
त्यांच्या घरात आणि मनात खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश पेटला आहे.

ध्येय फाउंडेशन फक्त एक माध्यम होतं…
पण प्रकाश देणारे तुम्ही सगळे आहात 🙏

*सहकार्य करणारे उदार हात :*

स्वप्नील कोद्रे – एक संपूर्ण शिलाई मशीन
सुनील शेंडकर – एक संपूर्ण शिलाई मशीन
सतीश ससाणे, किरण लाडके, रोहित बागुल, रूपेश केदारी, आदर्श केदारी, हर्षद जाधव, उमेश बंटनूर, अजित बनकर, गोपेश राठोड, राहुल ठवरे, दयानंद कोल्हे, स्वाती ताई, सोनूभाऊ जांभूळकर
तसेच काही देणगीदार ज्यांची संपूर्ण नावे scanner payment मध्ये दिसली नाहीत — त्यांनाही मनापासून धन्यवाद ❤️

विशेष आभार : सुदीप मित्रा तू तुझी नोकरी करून गडचिरोली मध्ये या गरजू हातांना मदत करण्यासाठी धावतोस त्यासाठी तुला सलाम..

एकूण ₹31,800 ची मदत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून पोहोचली आहे.

ही दिवाळी फक्त प्रकाशाची नाही,
तर या तीन घरांमध्ये आशेचा किरण बनून आली आहे. ✨

ध्येय फाउंडेशन : 9762519604

#ध्येयफाउंडेशन

21/10/2025

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा क्षण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आज या कुटुंबाच्या आयुष्यात प्रकाश आणायचे कार्य करण्याचे माध्यम ध्येय ला होता आले त्या बद्दल धन्यवाद १०६०० रु च्या एकूण ३ मशीन या दिवाळी निमित्त गडचिरोली भागात देण्यात आल्या.. आज एक पोहोचली उर्वरित २ ते ३ दिवसात पोहचतील…
सर्व देणगीदारांचे आभार आज तुमच्यामुळे या कुटुंबाच्या आयुष्यात प्रकाशमय दिवाळी झाली

लवकरच सविस्तर लिहिल…

#ध्येय #सामाजिककार्य #दिवाळी #प्रकाशाचादिवस #आनंदवाटूया #गडचिरोली #स्वावलंबन #मदत #दयाळूपणा #धन्यवाद

*एक दिवा देवांसाठी,**एक दिवा घरासाठी,**आणि एक दिवा समाजासाठी..* ❤️या दिवाळीत प्रकाश फक्त घरात नाही,तर प्रत्येक मनात उजळू...
20/10/2025

*एक दिवा देवांसाठी,*
*एक दिवा घरासाठी,*
*आणि एक दिवा समाजासाठी..* ❤️

या दिवाळीत प्रकाश फक्त घरात नाही,
तर प्रत्येक मनात उजळू द्या ✨

ध्येय फाउंडेशन तर्फे
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
*शुभ दीपावली!* 🌟

✨ *आता ती दयेवर नाही, स्वाभिमानावर जगेल...* ✨*ही फक्त एक शिलाई मशीन नाही,**तर तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे* 💫या दि...
19/10/2025

✨ *आता ती दयेवर नाही, स्वाभिमानावर जगेल...* ✨
*ही फक्त एक शिलाई मशीन नाही,*
*तर तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे* 💫

या दिवाळीत ध्येय फाउंडेशनच्या माध्यमातून
गडचिरोलीतील एका निराधार कुटुंबाला
स्वावलंबी होण्यासाठी शिलाई मशीन दिली जात आहे.

चला, आपणही या उजेडाचा भाग बनूया...
तुमच्या छोट्याशा सहकार्याने एखादं आयुष्य बदलू शकतं. ❤️

📞 अधिक माहितीसाठी : 9762519604 / 9881850458

#ध्येयफाउंडेशन #स्वाभिमान #माणुसकीचादिवा #दिवाळीदान #गडचिरोली #आशेचादिवा

माझ्या ध्येयाचा खांदा आज अजून मजबूत झाला आमचा प्रत्या अधिकारी झाला! ध्येयचा एक एक पोरगा आपल्या पायावर मजबूत उभा राहतोय त...
07/03/2025

माझ्या ध्येयाचा खांदा आज अजून मजबूत झाला
आमचा प्रत्या अधिकारी झाला!
ध्येयचा एक एक पोरगा आपल्या पायावर मजबूत उभा राहतोय त्यात आज आमचा प्रत्या अधिकारी झाला.
अभिमान आहे मित्रा..!

प्रतिक पताडे
(नगररचना सहाय्यक (Town Planning)*

ध्येय Foundation
#अभिमानाचा क्षण #ध्येय फाउंडेशन

30/08/2023
बंध प्रेमाचे बंध विश्वासाचेरक्षाबंधनाच्या शुभेच्छा
29/08/2023

बंध प्रेमाचे
बंध विश्वासाचे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण 🇮🇳"आपले चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले ठरले" चंद्राव...
23/08/2023

प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण 🇮🇳

"आपले चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले ठरले"

चंद्रावरच्या या यशस्वी ऐतिहासिक प्रवासाला चालना देणाऱ्या इस्रो टीमचे तसेच सर्व भारतीयांचे खूप खूप अभिनंदन..!
जय हिंद
🇮🇳🇮🇳

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छ...
20/10/2022

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक : ध्येय फाउंडेशन

वसुबारसदिवाळीचा पहिला दिवस!हि दिवाळी तुम्हाला आणितुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीचीआणि भरभराटीची जावो..!शुभेच्छुक : ध्ये...
20/10/2022

वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो..!
शुभेच्छुक : ध्येय फाउंडेशन

सोने लुटून आनंदाचे वाढवू स्नेह अन् सहकार्यदुष्ट प्रवृत्तीचे दहन करून राखू सृष्टीचे सौंदर्यविजयादशमी निमित्त आपणा सर्वांन...
04/10/2022

सोने लुटून आनंदाचे वाढवू स्नेह अन् सहकार्य
दुष्ट प्रवृत्तीचे दहन करून राखू सृष्टीचे सौंदर्य
विजयादशमी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दसरा

Address

Pune
411040

Telephone

+919762519604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhyeya Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhyeya Foundation:

Share