29/08/2026
DJ विरोधातील मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनची मोहीम आता पुढच्या टप्प्यात
तीन RTI दाखल, सरकारी रेकॉर्ड मागवले, High Court Petition ची तयारी
पुण्यातील ईद-ए-मिलाद 2026 ची मिरवणूक DJ मुक्त ठेवावी, अशी मागणी मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनने यापूर्वीच केली होती. ही केवळ सोशल मीडियावरील मागणी नव्हती, तर पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि निवेदनांच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्यात आला होता.
फाउंडेशनच्या वतीने Police Commissioner, DCP, ACP तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली होती. धार्मिक मिरवणुकीमध्ये अत्याधिक आवाजाचे DJ आणि sound systems वापरले जाऊ नयेत तसेच Supreme Court च्या ध्वनीप्रदूषणासंदर्भातील निर्देश आणि लागू कायद्यांची अंमलबजावणी करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती.
या मोहिमेला माध्यमांमध्येही प्रसिद्धी मिळाली. 25 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये फाउंडेशनची DJ पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी आणि DJ सुरू राहिल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा नमूद करण्यात आला होता.
Joint CP संजय डांगे यांच्या वक्तव्यानंतरही DJ कसा वाजला?
ईद-ए-मिलादपूर्वी Times of India मध्ये 26 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनच्या DJ मुक्त ईद-ए-मिलादच्या मागणीला प्रसिद्धी देण्यात आली होती.
या वृत्तामध्ये Joint Police Commissioner Sanjay Dange यांनी स्पष्ट केले होते की कोणत्याही संस्था किंवा स्थानिक युवकांनी loudspeaker वर music वाजवण्याच्या परवानगीसाठी पोलिसांशी संपर्क केलेला नाही आणि त्या वेळेपर्यंत कोणालाही अशी परवानगी देण्यात आलेली नव्हती.
मग प्रश्न असा आहे.
जर परवानगी देण्यात आली नव्हती, तर 26 ऑगस्टच्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीमध्ये DJ कसा वाजला?
जर पोलिसांनी निर्देश दिले होते, तर त्याची अंमलबजावणी कोणी केली?
किती तक्रारी आल्या?
किती DJ रोखण्यात आले किंवा जप्त करण्यात आले?
किती FIR, NC किंवा नोटिसा देण्यात आल्या?
किती ठिकाणी sound level किंवा decibel measurement करण्यात आले?
आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यांकडून नेमका कोणता अहवाल देण्यात आला?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सरकारी रेकॉर्डच्या माध्यमातून मागवण्यात येत आहेत.
पहिली RTI Permission चा संपूर्ण रेकॉर्ड
Registration No. PUCPO/R/2026/60927
या RTI मध्ये DJ, loudspeaker, music आणि sound system च्या परवानगीशी संबंधित संपूर्ण रेकॉर्ड मागवण्यात आला आहे.
किती applications आल्या, किती permissions देण्यात आल्या किंवा नाकारण्यात आल्या, कोणत्या अधिकाऱ्याने permission दिली, permission number आणि date काय होती, permission च्या conditions काय होत्या आणि police station wise किती permissions देण्यात आल्या, यासंबंधी certified copies मागवण्यात आल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर DJ किंवा music साठी कोणतीही permission देण्यात आली नसेल, तर त्यासंदर्भातील order किंवा written instruction ची certified copy देखील मागवण्यात आली आहे.
दुसरी RTI 26 ऑगस्टला पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली?
Registration No. PUCPO/R/2026/60928
या RTI मध्ये 26 ऑगस्टच्या Police Action चा संपूर्ण रेकॉर्ड मागवण्यात आला आहे.
DJ, loudspeaker, excessive noise आणि laser lights संदर्भात किती complaints आल्या?
किती DJ किंवा sound systems थांबवण्यात आले, हटवण्यात आले किंवा जप्त करण्यात आले?
किती FIR, NC, notices किंवा इतर proceedings करण्यात आल्या?
कोणत्या police station ने काय action घेतला?
Senior officers कडे कोणते Action Taken Reports पाठवण्यात आले?
Decibel किंवा sound level measurement करण्यात आले का?
Noise monitoring साठी कोणते officers किंवा deployment करण्यात आले?
Laser violations वर काय action घेण्यात आले?
आणि मिरवणुकीनंतर consolidated action report तयार करण्यात आली का?
या सर्वांचा certified record RTI द्वारे मागवण्यात आला आहे.
तिसरी RTI Joint CP चे Instructions आणि Compliance
Registration No. PUCPO/R/2026/60929
तिसऱ्या RTI चा उद्देश Joint Commissioner of Police आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात कोणते निर्देश दिले आणि 26 ऑगस्ट रोजी त्या निर्देशांची अंमलबजावणी झाली का, हे सरकारी रेकॉर्डच्या माध्यमातून समोर आणणे हा आहे.
यामध्ये Joint CP यांनी जारी केलेले orders, circulars आणि instructions, police stations ना पाठवलेले communications, कोणत्या officers आणि police stations ना निर्देश देण्यात आले, 26 ऑगस्टचे compliance reports, मिरवणुकीनंतरचा consolidated report तसेच DJ, noise आणि laser violations संदर्भातील review meeting records मागवण्यात आले आहेत.
कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसल्यास त्याबाबत लेखी confirmation देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ही तिन्ही RTI 29 ऑगस्ट 2026 रोजी Commissioner of Police, Pune यांच्याकडे दाखल करण्यात आल्या आहेत.
आता विषय फक्त DJ चा नाही, तर जवाबदेहीचा आहे
मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे.
आमचा कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक मिरवणुकीच्या विरोध नाही.
धार्मिक कार्यक्रम शांततेत, शिस्तीत आणि कायद्याच्या चौकटीत व्हावेत, हीच आमची भूमिका आहे.
परंतु जर पोलिस प्रशासनाला आधीच निवेदन देण्यात आले होते, वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती, DJ किंवा music साठी परवानगी नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माध्यमांसमोर सांगण्यात आले होते आणि त्यानंतरही DJ वाजल्याचे समोर येत असेल, तर या संपूर्ण घटनाक्रमाचा अधिकृत रेकॉर्ड जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
म्हणूनच आता तीन स्वतंत्र RTI च्या माध्यमातून Permission, Police Action आणि Senior Officers Instructions आणि Compliance या तीनही स्तरांचा रेकॉर्ड मागवण्यात आला आहे.
मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने या विषयातील पुढील कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे. High Court Petition चीही तयारी करण्यात येत आहे.
RTI मधून मिळणाऱ्या सरकारी कागदपत्रांचा आणि प्रमाणित रेकॉर्डचा अभ्यास केल्यानंतर पुढील कायदेशीर पाऊल उचलले जाईल.
आमचे प्रश्न सरळ आहेत.
जर परवानगी नव्हती तर DJ कसा वाजला?
जर निर्देश दिले होते तर त्यांची अंमलबजावणी का झाली नाही?
आणि उल्लंघन झाले असेल तर कारवाई किती आणि कुठे झाली?
आता या प्रश्नांची उत्तरे केवळ वक्तव्यांमधून नकोत.
सरकारी रेकॉर्डमधून हवी आहेत.
Miss Farha Charitable Foundation
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख
Director
अन्वर शेख
Director
Mob 8459867838
“DJ चा आवाज कमी करणे हा उपाय नाही, DJ पूर्णपणे बंद झाला पाहिजे. धार्मिक मिरवणूक शांतता, शिस्त आणि बंधुभावाने झाली पाहिजे.”
#मिसफराहचॅरिटेबलफाउंडेशन #ईदमिलाद2026 ुक्तईदमिलाद ंदकरा ुक्तमिरवणूक #ध्वनीप्रदूषण