Sarthak Welfare Foundation

Sarthak Welfare Foundation SARTHAK Welfare Foundation is an NGO, believe In Creating a small and sustainable positive change in society by reaching out to every individual, every day

 #सार्थकसेवासन्मान2026समाजात एखादा सकारात्मक बदल घडवायला सर्वात  महत्वाची ठरते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने कींवा अनेकांन...
16/04/2026

#सार्थकसेवासन्मान2026

समाजात एखादा सकारात्मक बदल घडवायला सर्वात महत्वाची ठरते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने कींवा अनेकांनी हा चांगला बदल घडवण्यासाठी सातत्याने केलेली क्रुती, जी नंतर एखाद्या चळवळीत कींवा मोठ्या कार्यामधे रुपांतरीत होते.
विचारातून क्रुती व क्रुती तून चळवळ, चळवळीतून कार्य व त्यातून घडून आलेला सामाजिक बदल हा एक मोठा प्रवास आहे व तो सहज सोपा अजिबात नाही.. अनेक खाच खळग्याने व आव्हानाने भरलेला आहे. अनेक चांगल्या व्यक्ती अतिशय उत्तम उद्देश व स्वप्न घेऊन सामाजिक कार्याचा श्रीगणेश करतात, आत्यंतिक तळमळीने व जिद्दीने एखादा सकारात्मक बदल घडवायचा प्रयत्न करतात, पडत धडपडत आपले काम नेटाने पुढे नेतात,यशस्वी होतात.
अशा या संघर्षमय दिवसांमधेच खरी गरज असते ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची. त्यांना मदत करण्याची, आर्थिक, व्यवहारीक सल्ला मसलतीची, तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाची आणि केलेल्या कामाच्या प्रशंसेची, पाठीवरच्या शाबासकीची! त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी या करता पुढे केलेल्या मदतीच्या हातांची!
‘सार्थक वेल्फेअर फौंडेशन’ हे शाश्वत आणि सकारात्मक सामाजिक बदल आणि विकासासाठी काम करत आहे.
मुलांचा व युवकांचा सर्वांगीण विकास, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, शारीरिक व मानसिक आरोग्य या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गावें, त्यातील शाळा,गावातील युवक,महिला व विद्यार्थी या बरोबर कार्यरत आहे. संस्थेचे चाळीसहून अधिक कार्यकर्ते व मेंटॉर्स असून त्यामध्ये समुपदेशक, शिक्षक, डॉक्टर,इंजिनिअर अशा अनेकांचा समावेश आहे..
*सार्थक सेवा व सार्थक सेवा सन्मान ह्या पुरस्काराचा खरा उद्देश व स्वरूप हेच आहे. चांगल्या व्यक्तिच्या कींवा संस्थेच्या कामाचा उचित गौरव करणे, त्यांना पुरस्काराच्या निमित्ताने आर्थिक मदत करणे, त्यांचे कार्य अनेकांपर्यंत पोहोचावे या करता प्रयत्न करणे, आपल्या अनुभवांचा व संपर्काचा फायदा त्यांना मिळवून देणे व जीथे आवश्यक तेथे मार्गदर्शन करणे*…. *थोडक्यात म्हणजे त्यांच्या पाठीशी उभे राहणे. एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ! हेच ब्रिद ठेवत चांगल्या माणसांना घेऊन पुढे जाणे. व या सर्व प्रवासात चांगल्या व्यक्ति व संस्था याच्याबरोबर जोडले जाणे, व चांगल्या गोष्टी आपणही शिकणे हे ओघाने आलेच*!
*सार्थक सेवा सन्मान दरवर्षी एखाद्या अशा व्यक्तीला कींवा संस्थेकरता दिला जाईल ज्यांनी समाजाला भेडसावणार्या अतिशय मूलभूत प्रश्नांकरता काम करायला सुरवात केली आहे. ज्यामुळे समाजात, विचारांमधे, सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो*.
या पुरस्काराकरता सेवाभावी संस्थांकडून व व्यक्तिगत सामाजिक कार्यासाठी पुरस्काराकरिता 31 मे पर्यंत खालील फाँर्म भरुन पाठवायचा आहे.
हा पुरस्कार 1 लाख रुपये, मानपत्र अशा स्वरुपात असून संस्थेबरोबर भविष्यात सहयोगाने सामाजिक कामे करण्याची संधी आहे.
तरी शक्य होईल तेवढे लवकर फोर्म भरून जमा करावा. तसेच आपल्या ओळखीच्या संस्थेला व व्यक्तिला पाठवावा ही विनंती! दरवर्षीप्रमाणे आँगस्ट महिन्यात, आमच्या वर्धापनदिनाच्या दिवशी हा पुरस्कार जाहीर करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी, व काही मदत लागल्यास खालील नंबर वर संपर्क करावा .
स्वप्नील - ९३७०१६८६११ ऑफिस - ९७६६०७८१४६
[email protected]
याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून फोर्म भरायचा आहे.
https://forms.gle/nvaXYijE4Ua1vNqf7

26/02/2026



✨Project Unnati – Redefining Success Beyond Marks ✨

In our recent Project Unnati session, we began with a simple yet powerful question:
“What is your definition of success?”

Students thoughtfully wrote their answers, followed by an open and engaging discussion exploring the reasons behind their perspectives. 🌱

The session then expanded into key aspects of personal and professional growth:
🔹 Workplace collaboration & being a strong team player
🔹 Understanding expectations of superiors
🔹 The importance of continuous learning & upskilling in today’s competitive world
🔹 Resilience and perseverance – two powerful pillars of long-term success
🔹 The role of hobbies in maintaining balance and creativity
🔹 And finally, an eye-opening discussion on Gratitude 🙏

The interaction was insightful, reflective, and energizing. Students actively participated and shared their thoughts with honesty and enthusiasm.

Project Unnati successfully provided a comprehensive roadmap for navigating both personal and professional journeys. By shifting the focus from only academic achievement to holistic development, the session empowered students to redefine success on their own terms. 💫

https://youtube.com/shorts/rja7O4-5tfk?si=tI8Idhf9QE2zu9Jm

 #कायदेशिक्षण हवेच!       आपल्या सर्वांच्या सुरक्षितता आणि सुव्यवस्थे करता कायदा अस्तित्वात आहे. पण कीती जणांना कायदा मा...
17/02/2026

#कायदेशिक्षण हवेच!

आपल्या सर्वांच्या सुरक्षितता आणि सुव्यवस्थे करता कायदा अस्तित्वात आहे. पण कीती जणांना कायदा माहीती आहे? विषेशतः कीशोरवयीन मुलं-मुली, काँलेजमधले विद्यार्थी, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कंपनीमधे काम करणार्‍या बायका, यांना महत्वाचे कायदे माहीत असायलाच हवेत. नाहीतर कोणीही धाकदपटशा, भिती, छळ, गैरवर्तन, गैरव्यवहार करु शकतो व आपला गैरफायदा घेऊ शकतो.
तरुण मुला मुलींना सक्षम व्हायचे असेल तर इतर पुस्तकी ज्ञान आणि कौशल्यां बरोबर कायद्याची माहिती अनिवार्य आहेच.

दुसरी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सोशल मिडीया चा वापर!सोशल मिडीया कसा वापरावा, काय काळजी घ्यावी, सोशल मिडीया वर आपल्याला उपयोगी काय, निरुपयोगी आणि फसवणूक, बनवा बनवी काय होऊ शकते, सोशल मिडीया उत्तम प्रकारे कसा वापरावा आपल्या फायद्यासाठी तो कसा वापरता येतो, समाज माध्यमातून कसे व्यक्त व्हायचे, आपले प्रोफाईल्स कसे तयार करायचे अशा अनेक गोष्टींची कार्यशाळा सार्थक च्या विद्यार्थ्यांकरता घेतली गेली.

सिनीअर कायदेतज्ज्ञ Advocate अनिषा फणसळकर मॅडम आणि TSystems मधले उच्चपदस्थ अधिकारी श्री. विराज आवटी यांनी ह्या दोन्ही दिग्गजांनी दोन्ही कार्यशाळा अतिशय उत्तम घेतल्या.

17/02/2026

नमस्कार!! माझ्या फेसबुकीय मित्रमंडळी! माझ्या पेजवरती मी माझे व सार्थक च्या सर्व activities बद्दल कायम लिहीत असतेच. पण आता सार्थक चे सर्व उपक्रम तुम्हाला सार्थक वेलफेअर फौंडेशन च्या official page वरती मिळतील. तुम्हाला मी पेज लाईक करायची आणि माझी रीक्वेस्ट accept करायची विनंती करते.

SARTHAK Welfare Foundation is an NGO, believe In Creating a small and sustainable positive change in society by reaching out to every individual, every day

Address

A1 Hillok Residency, Behind Mirch Masala Hotel, Near Vanadevi, Kotbrud
Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Telephone

+919766078146

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarthak Welfare Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sarthak Welfare Foundation:

Share