NYCI4Maharashtra

NYCI4Maharashtra National Friends Youth Social Foundation

केवळ सामाजिक सेवा नव्हे तरस्व:समाधान शोधण्याचा प्रवास...
14/07/2025

केवळ सामाजिक सेवा नव्हे तर
स्व:समाधान शोधण्याचा प्रवास...

*शालेय वस्तूंच वाटप*आमचे मार्गदर्शक मित्र डॉ.दिनेश सांगवी यांच्या विशेष सहकार्याने व नॅशनल फ्रेंड्स युथ सोशल फौंडेशन,महा...
25/06/2025

*शालेय वस्तूंच वाटप*
आमचे मार्गदर्शक मित्र डॉ.दिनेश सांगवी यांच्या विशेष सहकार्याने व नॅशनल फ्रेंड्स युथ सोशल फौंडेशन,महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या वांझोळे येथील जि.प. प्रा.शाळेतील विदयार्थांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

हे वाटप प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वांझोळे गावचे सरपंच मा.राजेश पवार,मा.सुरेश गुरव,मा.बालकण्याण सभापती सातारा. सौ.सुनंदा पाटील, पंकज गुरव, प्रदीप पाटील, संदीप काटे, पांडूरंग पवार, शितल गुरव, वंदना काटे, प्रतीक्षा काटे,शाळेचे मुख्याध्यापक मा.अनिल झोरे, शिक्षक मा.पांडुरंग सावंत,नॅशनल फ्रेंड्स युथ सोशल फौंडेशनचे सदस्य प्रतिक गुरव, तनुजा गुरव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक पांडूरंग सावंत यांनी केले. आभार शितल गुरव यांनी मानले.






वांझोळे(ता.पाटण जि. सातारा) शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप ....      आज रविवार  दिनांक 03/09/2023 रोजी श्र...
04/09/2023

वांझोळे(ता.पाटण जि. सातारा) शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप ....
आज रविवार दिनांक 03/09/2023 रोजी श्री.हर्ष सेथीआ सर, डॉ.दिनेश सांघवी सर व श्री. लहेरी सांघवी सर, मुंबई यांच्या विशेष सहकार्याने व National Friends Youth social Foundation, महाराष्ट्र टीम यांच्या पुढाकाराने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांझोळे च्या सर्व विद्यार्थ्यांस स्कूल बॅग, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, कंपास, लेखन साहित्य संच , रंगीत खडू , स्केच पेन सर्व प्रकारच्या वहया तसेच खेळण्यासाठी कॅरम साहित्य, दोरी उडया, चक्र, चेंडू इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून NFYSF चे सदस्य श्री.गणेश नकाते सर, श्री.अक्षय वायदंडे सर, श्री.जयदिप पाटील सर, कु.निकीता पवार मॅडम, श्री.प्रतिक गुरव सर, मा.जि.प.सदस्या सौ.सुनंदा गुरव मॅडम , वांझोळे गावचे सरपंच श्री.राजेशजी पवार सो. उपसरपंच सौ.सुनिता कांबळे मॅडम, बोपोली शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रकाशजी काटे सर, गोषटवाडी वि.का.सेवा.सोसा.चे व्हाईस चेअरमन श्री.शंकरजी काटे सर, जलसंपदा विभागाचे श्री.सुरेशजी गुरव सौ. संगिता गुरव ग्रा.पं. सदस्या, सो. जेष्ठ नागरिक श्री.सखाराम पाटील, श्री.तानाजी शेलार, श्री.महादेव काटे, श्री.निवृत्ती पाटील, श्री.सुरेश काटे, श्री.शिवाजी पाटील, श्री.विजय काटे, श्री.जगन्नाथ गुरव सर, श्री.पंकज गुरव सर श्री.विलास गुरव सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यरुपी भेट देऊन शिक्षणास पाठबळ दिले, त्याबद्दल श्री.हर्ष सेथीआ सर, डॉ. दिनेश सांघवी सर, श्री. लहेरी सांघवी सर यांचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले. सदर शालेय साहित्य शाळेला मिळवून देण्यासाठी NFYSF चे महाराष्ट्र टीम सदस्य श्री.प्रशांत गुरव सर मा.अंजली गुरव मॅडम ( सेक्रेटरी मुंबई NFYSF ) श्री.प्रतिक गुरव सर यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.पांडुरंग सावंत सर यांनी केले व आभार श्री.अनिल जोहरे सर यांनी मानले.

जाहीर सूचनाभारतीय राष्ट्रीय युवा परिषद अर्थात National youth council of India (NYCI) अधिकृतपणे नाव लोगो आणि इतर गोष्टींच...
20/02/2023

जाहीर सूचना

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अर्थात National youth council of India (NYCI) अधिकृतपणे नाव लोगो आणि इतर गोष्टींचा वापर न करणेबाबत .

यापुढे NYCI या नावाखाली कुठलाही कार्यक्रम नसेल. तसेच त्या पदाचा, नावाचा आणि लोगो चा वापर आपण कुणीही करू शकत नाही; याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

*भारतीय राष्ट्रीय युवा परिषद*महाराष्ट्र राज्यआयोजित    📖 *वाचन कट्टा* 📖या उपक्रमाचे *द्वितीय सत्र* *शनिवार, दि. ०४ फेब्र...
02/02/2023

*भारतीय राष्ट्रीय युवा परिषद*
महाराष्ट्र राज्य
आयोजित
📖 *वाचन कट्टा* 📖
या उपक्रमाचे *द्वितीय सत्र* *शनिवार, दि. ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता* आयोजित केले आहे.
सर्व वाचक प्रेमींनी सहभागी व्हावे.
अधिक माहितीसाठी आणि वाचन प्रेमींसाठी
👇
https://chat.whatsapp.com/BIWRxcVqFpHCkgRnI9V8yi

*सत्राची लिंक लवकरच कळविण्यात येईल*

*भारतीय राष्ट्रीय युवा परिषद*महाराष्ट्र राज्यआयोजित         📖 *वाचन कट्टा* 📖 या उपक्रमाचे *प्रथम सत्र* *रविवार दि. २२ जा...
22/01/2023

*भारतीय राष्ट्रीय युवा परिषद*
महाराष्ट्र राज्य
आयोजित
📖 *वाचन कट्टा* 📖

या उपक्रमाचे *प्रथम सत्र* *रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता* आयोजित केले आहे.
सर्व वाचक प्रेमींनी सहभागी व्हावे.

*जॉईन करण्यासाठी लिंक👇🏻*

https://meet.google.com/awv-pbfg-jta

युवकांचे प्रेणास्थान"स्वामी विवेकानंद" यांच्या जयंती निमित्तभारतीय राष्ट्रीय युवा परिषदमहाराष्ट्र राज्यआयोजित*पुस्तकं आण...
22/01/2023

युवकांचे प्रेणास्थान
"स्वामी विवेकानंद"
यांच्या जयंती निमित्त

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद
महाराष्ट्र राज्य
आयोजित

*पुस्तकं आणि गप्पा*
"माझा वाचन कट्टा"

प्रत्येक महिन्यात दुसऱ्या रविवारी आपण सर्व या वाचन कट्ट्यात भेटणार आहोत. यात जे पुस्तक आपण वाचले आहे, त्यावर विचार मांडावे की
🔹ते पुस्तक का वाचले,
🔹त्यातलं काय आवडलं,
🔹 काय शिकलात,
🔹इतरांना काय सांगाल वैगेरे.

एकंदरीत साधक बाधक चर्चा आपण करणार आहोत.
पुढील उपक्रमासाठी इच्छुक वाचकाने आधीच नाव द्यावे म्हणजे नियोजन सोपे होईल.

*सदर उपक्रमासाठी इच्छुक सदस्यांनी खालील what's app ग्रूप जॉईन करावा.*
👇🏻
https://chat.whatsapp.com/BIWRxcVqFpHCkgRnI9V8yi

*बाकी सूचना त्यावर दिल्या जातील*
आपले कुणी मित्र, नातेवाईक यासाठी जोडले जाणार असतील, जे खरोखर इच्छुक आहेत त्यांना देखील याविषयी माहिती सांगा.

*"चला तर मग वाचू आनंदे, पुस्तकं मित्र बनू स्वानंदे"*

Address

Pune
411001

Telephone

+919730637681

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NYCI4Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NYCI4Maharashtra:

Share