Unnati Social Foundation

Unnati Social Foundation Unnati is a Hindi word that says prosperity. Unnati Foundation is a non-profit organization established in 2018.

Unnai work in the sector of education, health, environment, women and youth empowerment.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपल्या अद्वितीय शौर्य, अटळ स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या ...
14/05/2026

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपल्या अद्वितीय शौर्य, अटळ स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या बळावर स्वराज्याचे रक्षण केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी औरंगजेबासमोर कधीही मान झुकवली नाही. अमानुष छळ आणि यातना सहन करूनही धर्माशी तडजोड न करणाऱ्या या महान योद्ध्याच्या त्याग आणि बलिदानाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

मानवसेवेलाच ईश्वरसेवा मानून रुग्णांच्या आरोग्यासाठी अखंड झटणाऱ्या परिचारिका या समाजातील प्रेरणादायी शक्ती आहेत. त्यांच्य...
12/05/2026

मानवसेवेलाच ईश्वरसेवा मानून रुग्णांच्या आरोग्यासाठी अखंड झटणाऱ्या परिचारिका या समाजातील प्रेरणादायी शक्ती आहेत.

त्यांच्या अथक परिश्रम, सहनशीलता आणि सेवाभावामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळते. अशा सर्व परिचारिकांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि जागतिक परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.!

आई ही केवळ एक व्यक्ती नसते, तर ती संपूर्ण आयुष्याचा आधार असते. आपल्या लेकरांच्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःच्या सुखाचा त्य...
10/05/2026

आई ही केवळ एक व्यक्ती नसते, तर ती संपूर्ण आयुष्याचा आधार असते. आपल्या लेकरांच्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारी आई आयुष्यभर निस्वार्थपणे प्रेम करत राहते. तिच्या एका शब्दात धीर असतो, एका स्पर्शात माया असते आणि तिच्या आशीर्वादात संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते.

प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देणारी आणि यशाच्या प्रत्येक टप्प्यावर आनंदाने डोळे भरून पाहणारी आई हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असते. अशा प्रत्येक मातेला जागतिक मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कर्मवीर भाऊराव पाटील य...
09/05/2026

गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता आणि स्वाभिमानाचा विचार समाजात रुजवला. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले.

“पराक्रम, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान” यांचे जिवंत प्रतीक असलेल्या वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणा...
09/05/2026

“पराक्रम, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान” यांचे जिवंत प्रतीक असलेल्या वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..!

अन्यायापुढे कधीही न झुकणाऱ्या या महान योद्ध्याचा इतिहास सदैव प्रेरणा देत राहील.

🚩⚔️

आजचा निकाल म्हणजे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीची सुरुवात..!दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिन...
08/05/2026

आजचा निकाल म्हणजे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीची सुरुवात..!

दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा! तुमच्या परिश्रमांनी यशाचा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला आहे. तुमची पुढील वाटचाल ज्ञान आणि यशाने उजळून निघो!

तसेच, ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे त्यांनी निराश न होता नव्या जोमाने पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी. प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्की मिळते.

भारत आणि आशियातील पहिल्या नोबेल पुरस्काराचे मानकरी, राष्ट्रगीताचे रचनाकार, महान तत्वचिंतक, कवीश्रेष्ठ गुरुदेव रविंद्रनाथ...
07/05/2026

भारत आणि आशियातील पहिल्या नोबेल पुरस्काराचे मानकरी, राष्ट्रगीताचे रचनाकार, महान तत्वचिंतक, कवीश्रेष्ठ गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

देशात सामाजिक क्रांतीचे पर्व सुरु करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #रा...
06/05/2026

देशात सामाजिक क्रांतीचे पर्व सुरु करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज

बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.! आणि जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत  लक्षात ठेवा, अ...
02/05/2026

बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.!

आणि जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत लक्षात ठेवा, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे.!

हार मानू नका, लढा… कारण जिंकणे अजून बाकी आहे.!

मंगल देशा... पवित्र देशा...महाराष्ट्र देशा...!!प्रणाम घ्यावा माझाहा महाराष्ट्र देशा....!सर्वांना महाराष्ट्र आणि कामगार द...
01/05/2026

मंगल देशा... पवित्र देशा...
महाराष्ट्र देशा...!!
प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा....!

सर्वांना महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

भजनांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि समाजजागृतीची ज्योत पेटवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन.....
30/04/2026

भजनांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि समाजजागृतीची ज्योत पेटवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन..!

Address

Jarvari Society Opposite P. K. International School, Pimple Saudagar
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unnati Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Unnati Social Foundation:

Share