पुणे महानगरपालिका कामगार युनियन - मान्यताप्राप्त

  • Home
  • India
  • Pune
  • पुणे महानगरपालिका कामगार युनियन - मान्यताप्राप्त

पुणे महानगरपालिका कामगार युनियन - मान्यताप्राप्त Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from पुणे महानगरपालिका कामगार युनियन - मान्यताप्राप्त, Labor Union, 101, Shramik Bhavan, Dengale Pool, Pune.

शिक्षण हेच खरे मुक्तीचे शस्त्र आहे हे कृतीतून दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले.आजच्या काळातही त्यांचे विचार तितकेच धारदार आणि...
03/01/2026

शिक्षण हेच खरे मुक्तीचे शस्त्र आहे हे कृतीतून दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले.
आजच्या काळातही त्यांचे विचार तितकेच धारदार आणि गरजेचे आहेत. जयंतीनिमित्त कृतज्ञ अभिवादन.




२००५ नंतर पुणे महानगरपालिकेत कायम झालेल्या सर्व संवर्गातील सेवकांना निवृत्तीनंतर सी.एच.एस. योजना लागू करण्याचा ऐतिहासिक ...
15/12/2025

२००५ नंतर पुणे महानगरपालिकेत कायम झालेल्या सर्व संवर्गातील सेवकांना निवृत्तीनंतर सी.एच.एस. योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय स्थायी समितीने घेतल्याबद्दल, पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) आणि पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन यांच्या संयुक्त वतीने पुणे महानगरपालिका भवन येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे तसेच नम्रता चंदनशिव यांचा सत्कार करून या दूरदृष्टीपूर्ण व कामगारहिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

नोव्हेंबर 2005 नंतर पुणे मनपात कायम झालेल्यासर्व संवर्गातील सेवकांना निवृत्तीनंतरसीएचएस योजना लागू होणार आहे!आपल्या एकजु...
11/12/2025

नोव्हेंबर 2005 नंतर पुणे मनपात कायम झालेल्या
सर्व संवर्गातील सेवकांना निवृत्तीनंतर
सीएचएस योजना लागू होणार आहे!

आपल्या एकजुटीमुळे ही महत्त्वाची कामगिरी साध्य झाली.
आपली एकजूट अभेद्य ठेवा.

लाल बावटे की जय 🚩🚩

पुणे महानगरपालिका कामगार युनियनचा (मान्यताप्राप्त) ८२ वा वर्धापन दिन संपन्नपुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या ८२ व्या व...
10/12/2025

पुणे महानगरपालिका कामगार युनियनचा (मान्यताप्राप्त) ८२ वा वर्धापन दिन संपन्न

पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार पुतळ्यास अभिवादन करून प्रभातफेरी आणि भव्य मेळावा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना आणि सेवेत असताना मृत्यू झालेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी कामगारांनी हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. तर अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी नवीन श्रमकायद्यांमुळे कामगारांना धोका निर्माण झाल्याचे सांगत संघर्षाची गरज अधोरेखित केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी तर समारोप कॉ. मधुकर नरसिंगे यांनी केला.

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) या संघटनेचा आज ८२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. 🚩🚩श्रमाच्या किमतीचा सन्...
10/12/2025

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) या संघटनेचा आज ८२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. 🚩🚩

श्रमाच्या किमतीचा सन्मान, कामगारांच्या हक्कांचे रक्षण आणि सामाजिक सुरक्षेची हमी यासाठी गेल्या अनेक दशकांपासून ही युनियन सतत लढत राहिली आहे. एकजुटीच्या मशालीने उजळलेली ८२ वर्षांची ही क्रांतीकारी वाटचाल केवळ संघर्षाची कथा नाही, तर विश्वासाचा, हक्काचा आणि कामगारांच्या सामूहिक शक्तीचा ठसा आहे. कामगारांच्या हितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे, संघटनेने उभारलेल्या विश्वासामुळे आणि प्रत्येक सदस्याच्या निष्ठेने आज ही युनियन दृढपणे उभी आहे.

कामगार शक्तीच्या अभेद्य सामर्थ्याला लाल सलाम करत, संघटनेच्या अथक प्रयत्नांना व चिकाटीला मनापासून अभिवादन. युनियनचा ८२ वा वर्धापन दिन चिरायू होवो आणि संघटनेचे हे सशक्त पाऊल पुढील अनेक वर्षे कामगार बांधवांच्या कल्याणासाठी यशस्वी ठरो हीच सदिच्छा.

श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ तसेच हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे ज्येष्ठ समाजस...
08/12/2025

श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ तसेच हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे 95 व्या वर्षी निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली..

महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही. तो विचारांना जागं करणारा क्षण आहे. अंधश्रद्धेच्या काळोखावर ज्ञानाचा दीप ला...
06/12/2025

महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही. तो विचारांना जागं करणारा क्षण आहे. अंधश्रद्धेच्या काळोखावर ज्ञानाचा दीप लावणाऱ्या महामानवांना आज विनम्र अभिवादन. न्याय, समता आणि बंधुतेचे बीज त्यांनी पेरले. त्याचे वृक्ष आजही उभा आहे आणि पुढच्या पिढ्यांना सावली देतो आहे. ज्या समाजात प्रत्येकाला मूल्य आहे, तिथे परिवर्तन हे स्वप्न नसून वास्तव ठरते.

समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित...
28/11/2025

समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.🚩



केंद्र सरकारने कामगार, शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या हक्कांना बाधा आणणाऱ्या 4 श्रमसहिंता लागू करण्याच्या निर्णयाचा तीव्र न...
27/11/2025

केंद्र सरकारने कामगार, शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या हक्कांना बाधा आणणाऱ्या 4 श्रमसहिंता लागू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध म्हणून कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या संयोजनाने आयोजित करण्यात आलेले निदर्शन काल, बुधवार २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे यशस्वीपणे पार पडले.

या निदर्शनात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ आणि पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमिक हितांचे मुद्दे ठामपणे मांडले.

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!भारतीय संविधान हे फक्त कायद्यांचे संकलन नाही.हे आपल्या राष्ट्राची दृष्टी, मूल...
26/11/2025

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
भारतीय संविधान हे फक्त कायद्यांचे संकलन नाही.
हे आपल्या राष्ट्राची दृष्टी, मूल्ये आणि भविष्यासाठीची दिशादर्शक तत्वे आहेत.
संविधानाने दिलेला प्रत्येक हक्क आपल्या स्वातंत्र्याची हमी आहे.
आणि प्रत्येक कर्तव्य देशासाठी आपली जबाबदारी सांगते.
या दिवसाचा उद्देश फक्त स्मरण नव्हे, तर संविधानाने दाखवलेला मार्ग पुन्हा एकदा आत्मसात करणे आहे.

Address

101, Shramik Bhavan, Dengale Pool
Pune
411005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुणे महानगरपालिका कामगार युनियन - मान्यताप्राप्त posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category