Aastitva

Aastitva Aastitva is a non profit organisation based out of Pune, Maharashtra. It took its form in the year 2017.

It was formed with the aim of providing a guiding light to those striving to make an identity and to help build a socially conscious tomorrow.

10/10/2025
अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने लोकवर्गणी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ता. पाथरी, जिल्हा परभणी मधील गोदावरी नदीकाठच्या पूरग्...
09/10/2025

अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने लोकवर्गणी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ता. पाथरी, जिल्हा परभणी मधील गोदावरी नदीकाठच्या पूरग्रस्त गावांमध्ये आवश्यक मदत पोहोचवण्यात आली.

गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर आला होता. अनेक कुटुंबांचे घर, शेती व दैनंदिन उपजीविकेचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर अस्तित्व फाउंडेशनने तात्काळ मदतीचा उपक्रम हाती घेतला.

या उपक्रमांतर्गत खालील गावांना मदत पोहोचवण्यात आली –
▪ बाभूळगाव फाटा
▪ लोनी
▪ गुंज
▪ गौंडगाव
▪ उमारा

या गावांमध्ये २५० राशन किट, कपडे, तसेच शालेय उपयोगी वस्तू यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक किटमध्ये तांदूळ,पीठ, डाळ, तेल, साखर,रवा, साबण व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य देण्यात आले.

लोकवर्गणी आणि लोकसहभागातून जमा झालेल्या निधीच्या आधारे ही संपूर्ण मदतकार्य योजना राबविण्यात आली. सर्व साहित्याचे पॅकिंग, वाहतूक आणि वितरण हे कार्य स्वयंसेवकांनी श्रमदानातून पूर्ण केले.

मदतकार्याच्या वेळी संस्थेच्या सदस्यांनी गावांमधील बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी सांगितले की, “आपल्या छोट्याशा योगदानातून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हातभार लावला, हीच खरी सामाजिक एकजूट आहे.”

या मदत उपक्रमाचे नियोजन आणि वाटपाचे समन्वय पाथरी येथील श्याम धर्मे, प्रल्हादराव गिराम, आणि विठोबा आगरकर यांनी केले.
तसेच अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने राधाकिसन मगार, अरुण कदम, खुशाल काळे, प्रशांत देशमुख, सुनील महाजन, आणि ऋतिक जगताप यांनी गावांमध्ये जाऊन श्रमार्पण (श्रमदान) करून मदतकार्य यशस्वी केले.

अस्तित्व फाउंडेशनतर्फे सर्व दाते, स्वयंसेवक, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून संस्था पुढेही समाजोपयोगी कार्य लोकसहभागातून राबविण्याचा संकल्प व्यक्त करते.

Saidham Society
03/08/2025

Saidham Society

Utkarsh Classes
03/08/2025

Utkarsh Classes

Matru Vidyalaya
03/08/2025

Matru Vidyalaya

Nano Homes
03/08/2025

Nano Homes

Kalpataru Exquisite
03/08/2025

Kalpataru Exquisite

📍 K-Ville Society
03/08/2025

📍 K-Ville Society

🩸 रक्तदान शिबिर – २७ जुलै २०२५🩸आस्तित्व फाउंडेशन आणि विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने📅 रविवार, २७ जुलै २०२५⏰ वेळ: ...
21/07/2025

🩸 रक्तदान शिबिर – २७ जुलै २०२५🩸
आस्तित्व फाउंडेशन आणि विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने

📅 रविवार, २७ जुलै २०२५
⏰ वेळ: सकाळी ९ ते दुपारी २
📍 ठिकाण: संबंधित सोसायटी / संस्थेचे सभागृह

🩷 तुमच्या एका रक्ताच्या युनिटमुळे ३ जीव वाचू शकतात!
चला रक्तदान करूया, आशा पेरूया आणि प्राण वाचवूया! 🙏

📌 कृपया सहभागी होण्यासाठी हा फॉर्म भरा: https://forms.gle/X2cUkU19tjqqySyN6

अस्तित्व फौंडेशन
7720001488

Address

Panchataranagar, Akrudi
Pune
411035

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aastitva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aastitva:

Share