Swanand Jankalyan Pratishthan

Swanand Jankalyan Pratishthan Swanand is working in the Fields of Value Education, Education, Skill Development & Public Health.

Swanand is non Government organisation working in the Field of Education, Women empowerment, Health, Social awareness, Waste Managment.

✨ समृद्धी प्रकल्प – गम्मत शिबीर वृत्त २०२६✨स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे वस्ती विभागातील ८ ते १४ वयोगटातील मुला-मुली...
07/06/2026

✨ समृद्धी प्रकल्प – गम्मत शिबीर वृत्त २०२६✨

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे वस्ती विभागातील ८ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी एक दिवसीय गम्मत शिबीर रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या शाळेत सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

🌱 *गटविभागणी व खेळ*
शिबिरास उपस्थित विद्यार्थ्यांची सुमारे २२ जणांच्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक गटासाठी दोन शिक्षिका व एक कार्यकर्त्यांची जोडणी करण्यात आली. लहान व मोठ्या गटांना सर्जनशीलता आणि प्राचीन शहरांची नावे देण्यात आली होती. सुमारे दीड तास विविध मैदानी व समूह खेळ घेण्यात आले. मुलांनी या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला.

🌱 *उद्घाटन सत्र*
उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम देशमुख (महापारेषण) आणि अधिराज गाडगीळ (समर्थ भारत) उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीरजी काळकर, विश्वस्त श्री. सचिनजी नागपुरे आणि समृद्धी वर्ग प्रकल्प प्रमुख सौ. वर्षा ताई देशपांडे तसेच इतर विश्वस्त आणि कार्यकर्ते यांची उपस्थित होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा ताई देशपांडे यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले.

🌱 *पहिले सत्र*
विद्यार्थ्यांची लहान व मोठ्या गटांमध्ये विभागणी करून विविध सर्जनशील उपक्रम घेण्यात आले. *लहान गटासाठी*. १. क्लेपासून विविध वस्तू तयार करणे - हे सत्र रुपाली बेदरकर यांनी घेतले २. कागदापासून मास्क तयार करणे - हे सत्र अंजलीताई पाटील व अश्विनीताई पाटील यांनी घेतले.

*मोठ्या गटासाठी*. १. कोस्टर पेंटिंग - हे सत्र अवंती ताई यांनी घेतले. २. मशीन मेकिंग - हे सत्र राधिकाताई शिंगणापूरकर व वर्षाताई देशपांडे यांनी घेतले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला वाव मिळाला.

🌱 *दुसरे सत्र*
दुसऱ्या सत्रात वैशालीताई जोशी यांनी संगीत कार्यशाळा घेतली. विद्यार्थ्यांनी गाणी, ताल आणि संगीताच्या माध्यमातून आनंददायी अनुभव घेतला. त्यानंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.

🌱 *दुपारचे सत्र*
दुपारच्या सत्रात अंबादास कनकट्टी यांनी ‘हास्यदर्पण’ या कार्यक्रमातून चार्लीचे पात्र साकारत मुलांचे भरभरून मनोरंजन केले.

यानंतर श्रीधर कुलकर्णी यांनी ‘गोष्टरंग’ या सत्राद्वारे विविध प्रेरणादायी आणि मनोरंजक गोष्टी सांगून विद्यार्थ्यांची संवाद साधला.

🌱 *शेवटचे सत्र*
शिबिराच्या शेवटच्या सत्रात मृणाल शिरशीकर ताई यांनी झुंबाचे सत्र घेतले. विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या ठेक्यावर उत्साहाने नृत्य करत या सत्राचा मनसोक्त आनंद लुटला.

🌱 *समारोप सत्र*
समारोप कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. रवींद्र शिंगणापूरकर आणि विश्वस्त श्री. सुरेश महल्ले, सारिका ताई उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांविषयी जाणून घेतले तसेच शिक्षिका आणि कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

दिवसभराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नैपुण्य वर्गातील शंकर मरगळे, किशोर दर्पण ची शारेन दमके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सारीकाताई वाघ यांनी केले. पसायदान सादर करून शिबिराची सांगता करण्यात आली.

🌱 *उपस्थिती*
*शिबिराची एकूण उपस्थिती: ५३४*

* ४१० विद्यार्थी
* ५० शिक्षिका
* २५ कार्यकर्ते
* नैपुण्य वर्गाचे १० विद्यार्थी
* किशोर दर्पणच्या २९ मुली
* १० समन्वयक
* स्वयंसेवक, हितचिंतक व मान्यवर
उपस्थित होते.

*टीम,*
*स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान* 🌿

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित,गम्मत शिबिर २०२६गमतीचे खेळ खेळायला, भरपूर मज्जा करायला आणिकाही चांगल्या गोष्टी शिकायल...
18/05/2026

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित,
गम्मत शिबिर २०२६

गमतीचे खेळ खेळायला,
भरपूर मज्जा करायला आणि
काही चांगल्या गोष्टी शिकायला,
कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सशिवाय आणि आई-बाबांविना रहायला,

या वर्षीच्या गम्मत शिबिराला येताय ना ?

चला तर मग -
या वर्षीचं आपलं निवासी गम्मत शिबिर दि. ०६ आणि ०७ जून २०२६ या दोन दिवसात होणार आहे.

शिबिरात काय काय होणार ?
- कृती खेळ
- टाकाऊतून टिकाऊ,
- गमतीदार खेळ
- आणि बरंच काही..

याशिवाय इतिहासातील महापुरुष, क्रांतिकारक, संतपरंपरा यांच्या नवनवीन गोष्टीसुद्धा !

महत्वाचे -
शिबिराचा वयोगट - ८ ते १४ वर्ष (३री ते ८वी)
शुल्क - १९५०/-
स्थान - वनवासी कल्याण आश्रम वसतिगृह, माले गांव, ताम्हिणी घाट जवळ.
------------------
मग आता वाट कसली बघताय ?
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करुन आपला सहभाग निश्चित करा !

नोंदणी लिंक :- https://forms.gle/McQ9tgHLFPcDVaD17

शुल्क भरण्यासाठी लिंक - https://donate.swanandjan.org/donation/donate.aspx

अधिक माहितीसाठी
▪️संकेत देशमुख (शिबिरप्रमुख ) -७७५५९३१४९९
▪️वर्षा देशपांडे - ७२७६०४४११४
▪️राधिका शिंगणापूरकर -९९२२४०२९६६

--- टीम, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान

🚩🚩🚩 स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित :  स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला - वर्ष १५ वे 🚩🚩🚩दरवर्षी प्रमाणे स्व...
04/02/2026

🚩🚩🚩 स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला - वर्ष १५ वे 🚩🚩🚩

दरवर्षी प्रमाणे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित स्वा. सावरकर स्मृती व्याख्यानमाला २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान उत्साहात संपन्न झाली. चार दिवस सुरु असलेल्या या विचार मंथनात दररोज ८०० ते ९०० नागरिकांनी या व्याख्यानमालेस आपली उपस्थिती लावली.

व्याख्यानमाला उद्घाटन:
मुख्य कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमाता प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उदय (तात्या) जोगळेकर, प्रमुख वक्ते निलेशजी ओक, स्वानंदचे अध्यक्ष सुधीरजी काळकर, सिंहगड भागाचे सह संघचालक सचिनजी नागपुरे उपस्थित होते.
सुधीरजी काळकर सरांनी आपल्या प्रास्ताविकात स्वानंदच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ संघ प्रचारक श्री. उदय (तात्या) जोगळेकर यांनी आपल्या मनोगतात ही व्याख्यानमाला म्हणजे हिंदुत्वाचे एक श्रेष्ठ भाष्यकार म्हणून आणि स्वतंत्रता सेनानी म्हणून प्रातःस्मरणीय असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव धारण करणारा आणि हिंदू जीवन दर्शनाच्या विविध अंगोपांगाना स्पर्श करणारा ज्ञान यज्ञ असल्याचे उद्गार काढले आणि यंदाचं वर्ष हे या व्याख्यानमालेचे पंधरावे वर्ष असल्याचे विशेष कौतुक केले.

प्रथम पुष्प - वृत्त
प्रमुख वक्ते : निलेशजी ओक
विषय - रामकृष्णाच्या पाऊलखुणा

रामायण-महाभारताच्या ऐतिहासिकत्वावर शंका घेणारे लोक बाहेरच्या जगापेक्षा भारतातच अधिक आढळतात. त्यामुळे त्याच्या सत्यतेबद्दल शंका न ठेवता न्यायदर्शनामध्ये सांगितलेल्या पंच-अवयवांच्या आधारे आपण याबाबत संशोधन सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘कुठलेही संशोधन सुरू करताना आपली दिशा निश्चित करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे रामायण आणि महाभारतामधील खगोलशास्त्रीय संदर्भ मी प्रथम वेगळे काढले. रामायणात असे ६०० तर महाभारतात ३०० संदर्भ आढळले.

ते पुढे म्हणाले, ‘रामायणात चार सुळयांच्या हत्तींचा उल्लेख येतो, हे आजवर अशक्य वाटत होते. मात्र डार्विन उत्क्रांतीनंतर जगभरात जी अनेक उत्खनने झाली त्यात अशा प्रकारचा एक प्राणी १४००० वर्षांपूर्वी म्हणजेच रामायण काळात असल्याचे सिद्ध झाले आहे. ग्रीक इतिहासज्ञ मेगॅस्थेनिस याच्या इंडिका या ग्रंथात वर्णन केलेल्या प्रदीर्घ वंशावळीत श्रीकृष्णाचा उल्लेख अन्य नावाने येतो. तसेच हेरोडॉटस या ग्रीक इतिहासज्ञाच्या पुस्तकात अशाच प्रकारचे वर्णन श्रीरामाबाबत येते. स्थानिक भाषेच्या प्रभावामुळे नावे वेगळी वापरली असली तरी त्यांच्या वर्णनातून हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकते.

द्वितीय पुष्प - वृत्त
प्रमुख वक्ते : सौ. दिपाली पाटवदकर
विषय - भारतीय कथांचा जागतिक प्रवास - एक स्वबोध
संघशक्तिचा शतकोत्तर प्रवास समरसता, पर्यावरण, नागरी कर्तव्य, कुटुंब प्रबोधन आणि स्वबोध या पंचसूत्रीसोबत चालू आहे. आपल्याला स्वबोधापेक्षा इतरांचा अभ्यास अधिक असतो. मी कोण आहे, हे समजून घेणे महत्वपूर्ण. वस्तुतः युरोपियन लोक इथे राज्य करत असताना भारतदेश हा विश्वाच्या मातृस्थानी आहे हे त्यांना समजले होते. मात्र हे उघड होऊ नये यासाठी कपटाने आर्य आक्रमण सिद्धांत मांडला गेला. मात्र काळाच्या ओघात युरोपातीलच अनेक देश स्वतःची ओळख शोधू लागले. पाकिस्तान, ईराणसारखे देशही आपली ओळख शोधत आहेत.

तृतीय पुष्प - वृत्त
प्रमुख वक्ते : डॉ. भावार्थ देखणे
विषय - ज्ञानेश्वरी : सात शतकांचे विद्यापीठ
ग्रंथराज ज्ञानेश्वरी यावरती व्याख्यात्यांनी आपले मनोगत मांडताना ज्ञानेश्वरीमधील ओव्या व त्यांचे भावार्थ सादर केले. माणसाला माणूस म्हणून जगताना संतांनी दिलेली शिकवण मार्गदर्शक ठरते. आणि याच शिकवणीतून त्याचे कार्य कर्तृत्व घडतं असते.
एखाद्या विषयाची मांडणी करताना अंतरंग जितके महत्वाचे असते तितकेच महत्वाचे बाह्यरंगही असते. आणि जेंव्हा हे एकत्र येतात तेंव्हाच तो विषय समर्पकपणे मांडला जातो. ज्ञानेश्वरी हा विषय मांडताना आम्हाला प्रश्न पडतो कि ज्ञानेश्वरीने आम्हाला काय दिलं? त्यातून आम्हाला काय मिळालं? तिला विद्यापीठ म्हणून का संबोधाव?
पु. ल. देशपांडे यांनी लिहलेला संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील एक प्रसंग वक्त्यांनी सांगितला. या प्रसंगातून लक्षात येते कि वारकरी संप्रदाय हा कुणाला तोडण्यासाठी नाही तर समस्त विश्वाला जोडण्यासाठी आहे.

चतुर्थ पुष्प - वृत्त
प्रमुख वक्ते : पद्मश्री डाॅ. मिलिंद कांबळे
भारत : आर्थिक महासत्ता काल आज व उद्या

मुघल आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीत भारताचा बराचसा काळ गेला. तत्पूर्वी जगाच्या एकूण जीडिपीमध्ये भारताचे योगदान सुमारे २५℅ होते. ही उत्पादने ग्रामीण भागात होत असत. या उत्पादनांचा व्यापार करणारी एक व्यापारी वर्गाची रचना सुद्धा त्या वेळी कार्यरत होती. मात्र आक्रमकांनी इथे आपल्याला हवी ती व्यवस्था उभी केली. मुघल काळात कुशल कामगारांना धर्मांतरित केले गेले. व्यवस्थांमध्ये झालेले हे बदल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एम.ए. साठी लिहिलेल्या ग्रंथात करुन ठेवले आहे.

डाॅ. मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी या दोघांसोबतही मी काम केलेले असल्याने त्यांच्यातील फरक मला स्पष्ट दिसतो. २०१४ नंतर आपली आर्थिक दृष्टी खूपच विस्तारित झाली आहे. आज निर्मला सीतारमन यांनी मांडलेले बजेट ५३ लाख कोटी रुपयांचे आहे. इकाॅनाॅमिक्स मोजण्याचे सर्व निकष विकसित होताना दिसत आहेत. भारत म्हणजे वेगाने विकसित होणारी इकाॅनाॅमी असल्याचे मत आता जगभरातील अर्थतज्ज्ञांचे आहे.

या चार दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून अनुक्रमे श्री. उदय तथा तात्या जोगळेकर, श्री. गणेश सोनुने, श्री. संजय नहार, श्री. विंग कमांडर विनायक डावरे हे होते. तसेच या वर्षीच्या व्याख्यानमालेचे वैशिष्टे म्हणजे या चारही दिवसांच्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा परिचय आपल्या सेवा वस्तीमधील विद्यार्थ्यांनी करून दिला. या संपूर्ण व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमाला प्रमुख श्री. राघवेंद्र देशपांडे, पदाधिकारी व इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. या व्याख्यानमालेत दरदिवशी सुमारे ८०० ते ९०० नागरिकांनी सहभाग घेतला.

टीम,
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानआयोजित १५ वी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला २०२६🗓️ दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवार...
19/01/2026

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान
आयोजित

१५ वी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला २०२६

🗓️ दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६
⏱️ रोज सायंकाळी ७ वाजता
📍 आनंदक्षण, सनसिटी रस्ता

आपला वेळ राखून ठेवावा व इतरांनाही सांगावे.
... टीम स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान

12/12/2025
⚜️ स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान🎭🎊 वार्षिक स्नेहसंमेलन – 2025 : अहवाल 🎊🎭🌸डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त...
12/12/2025

⚜️ स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान
🎭🎊 वार्षिक स्नेहसंमेलन – 2025 : अहवाल 🎊🎭

🌸डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आयोजित करण्यात आले. वस्ती विकास प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या अंगभूत प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले.

🌸या वर्षी वंदे मातरम् शतकोत्तर सुवर्णमहोत्सव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष आणि पंच परिवर्तन या संकल्पनांना अनुसरून सामाजिक समरसता, पर्यावरणपूरक जीवनशैली, स्वबोध, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर सर्व वर्गांनी विषयानुरूप उत्कृष्ट सादरीकरणे सादर केली.

🌸कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त प्राची जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष श्री. सुधीरजी काळकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव रविंद्रजी शिंगणापूरकर व विश्वस्त सुरेशजी महल्ले मान्यवर म्हणून उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

🌸विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, पर्यावरण संरक्षण, महाराष्ट्राची लोककला, महिला सुरक्षा-सबलीकरण, नागरिक कर्तव्य, शेतकरी प्रश्न आणि आधुनिक भारतातील पर्यावरण हानी आदी विषयांवर नृत्य, नाटक, पथनाट्य अशा विविध कलाप्रकारांतून प्रभावी संदेशमूल्य सादरीकरणे सादर केली. पालकांनी उपस्थित राहून मुलांचे मनोबल वाढवले.

🌸मुलांची शिस्त, तयारी आणि शिक्षिकांच्या मार्गदर्शनाचे प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. शांतीमंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला व सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

एकूण उपस्थिती :

विद्यार्थी – 420
पालक – 180
शिक्षिका – 65
कार्यकर्ते व हितचिंतक – 25+
एकूण उपस्थिती : 650+

टीम, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान

🔅स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान🔅🌸विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर🌸☘️आरोग्य प्रकल्पांतर्गत सिंहगड रोड परिसरातील प्रगती विद्याल...
09/12/2025

🔅स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान🔅
🌸विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर🌸

☘️आरोग्य प्रकल्पांतर्गत सिंहगड रोड परिसरातील प्रगती विद्यालय, ज्ञानसाधना विद्यामंदिर आणि चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय या तीन शाळांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

☘️या शिबिराचे उद्घाटन शुक्रवार, दि. 21/11/2025 रोजी प्रगती विद्यालय, आनंद नगर येथे संपन्न झाले. याकार्यक्रमास स्वानंद चे सचिव श्री. रविंद्र शिंगणापूरकर आणि प्रगती विद्यालयाच्या अध्यक्षा सौ. लता शहा उपस्थित होत्या.

☘️या शिबिरात डोळे तपासणी, रक्त तपासणी (HB/CBC), दंत तपासणी तसेच विविध प्राथमिक तपासण्या तज्ज्ञ वैद्यकीय टीमच्या उपस्थितीत करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे आरोग्यस्थितीचे प्राथमिक निदान करून गरजेनुसार योग्य मार्गदर्शन शाळा व पालकांना देण्यात आले, ज्यामुळे अनेक लपलेल्या आरोग्य समस्यांचे लवकर निदान होण्यास मदत झाली.

☘️तिन्ही शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची तपासणी पुढीलप्रमाणे झाली👇🏻

– प्रगती विद्यालय – 318 विद्यार्थी
– ज्ञानसाधना विद्यामंदिर – 221 विद्यार्थी
– चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय – 803 विद्यार्थी

☘️या तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आजारावर शिबीर ठिकाणीच उपचार करण्यात आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना रक्त तपासणी अहवालाच्या आधारे उपचार व मागर्दर्शन करण्यात येणार आहे.

☘️एकूण 1342 विद्यार्थ्यांची तपासणी करून स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने समाजोपयोगी कार्याची ठोस व प्रभावी पावले उचलली आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित शिक्षण वातावरण उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.

टीम,
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, पुणे

💫स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान💫🎭वार्षिक स्नेहसंमेलन - २०२५🎭    🔖स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान च्या विविध प्रकल्पातील विद्यार...
30/11/2025

💫स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान💫
🎭वार्षिक स्नेहसंमेलन - २०२५🎭

🔖स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान च्या विविध प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, आपले अंगभूत असलेले गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

🔖या कार्यक्रमात मुले समूहगीत, समूहनृत्य, कथाकथन, नाटक, वेशभूषा, मुलांचे मनोगत असे उपक्रम सादर करणार आहेत. तरी स्वानंदच्या देणगीदार, कार्यकर्ते यांना विनंती आहे कि त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवावा...

📆दिनांक: रविवार, ७ डिसेंबर २०२५
🕙वेळ: सकाळी ९.३० ते दु. १.३० वा.
📍स्थळ: सुहासिनी मंगल कार्यालय, त्रिमूर्ती हॉस्पिटलच्या मागे, धायरी फाट्याजवळ, सिंहगड रोड, पुणे.
🌐लोकेशन: https://maps.app.goo.gl/basAkyJbxJqER5pX9

टीम,
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान

नैपुण्य वर्ग प्रकल्प आणि किशोर दर्पण प्रकल्प     🔅 करिअर कल चाचणी वृत्त🔅रविवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी नैपुण्य वर्...
03/11/2025

नैपुण्य वर्ग प्रकल्प आणि किशोर दर्पण प्रकल्प
🔅 करिअर कल चाचणी वृत्त🔅

रविवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी नैपुण्य वर्गातील विद्यार्थी व किशोर दर्पण प्रकल्पातील विद्यार्थिनी यांची ब्रेनबर्ग फाउंडेशन च्या माध्यमातून एकत्रित ६३ विद्यार्थ्यांची करिअर कल चाचणी घेण्यात आली.

कल चाचणी घेण्यासाठी आलेले किरण दरवडे सर, अक्षय देसाई सर यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनतर टेस्ट संबंधित सूचना देऊन चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आले.

कल चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील नैसर्गिक क्षमता, विचारशक्ती, विश्लेषण कौशल्य, तर्कशक्ती, गणिती विचार आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता यावर आधारित प्रश्नांच्या माध्यमातून २ तासांची कल चाचणी घेण्यात आली.

आज झालेल्या चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांची भविष्यातील करिअर ची दिशा कोणती असू शकेल, कोणत्या क्षेत्रात ती करिअर करू शकेल या बाबतची प्राथमिक माहिती समजण्यास मदत होणार आहे. या आधारे विद्यार्थी व पालक यांचे एकत्रित समुपदेशन सत्र होणार आहे. आवश्यकता असेल त्यांना वैयक्तिक समुपदेशन सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे.

एकूण उपस्थित संख्या
मुलं:- २७
मुली :- ३६
एकूण विद्यार्थी - ६३

टीम:- स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान

Address

Flat No. 4, Mayura Apartment, Ram Nagar Road, Manikbaug, Sinhgad Road
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm
Sunday 10am - 6:30pm

Telephone

+917666875654

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swanand Jankalyan Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swanand Jankalyan Pratishthan:

Share