28/11/2025
*संविधान उद्धेशिकेचे वाचन करत संविधान दिन उत्साहात साजरा*
वालचंदनगर ता.इंदापूर येथे दलीत पँथर (पद्मश्री नामदेव ढसाळ) व शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनांच्या कार्यकर्त्या समवेत दलीत पँथर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.पँथर हर्षल वाघमारे यांच्या “सोनबा निवास” या निवासस्थानी जेष्ठ नेते मा.रमेशभाई पारध्ये व राज गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 26 नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान वालचंदनगर येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व शामराम कुलकर्णी यांच्या हस्ते संविधान उद्देशिका प्रतिमेचे पूजन करण्यात आले व श्रीमती अनुसया वाघमारे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला हर्षल वाघमारे यांच्या मातोश्री सौ सुरेखा कुमार वाघमारे व त्यांच्या काकी सौ वंदना दिलीप वाघमारे यांच्याकडून संविधान उद्देशिकेचे मोठ्याने वाचन करण्यात आले व संविधान मूल्यांबाबत जागरूकता वाढविण्यासाठी शालेय,महाविद्यालयीन तरुण तरुणींना संविधान उद्देशिका प्रत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन हर्षल वाघमारे यांनी केले होते याप्रसंगी माजी ग्रा. पं.सदस्य दिलीप धांडोरे, विजय वीर, दयासागर जाधव ,सावित्रीबाई चंदनशिवे, सोनू माने,आदित्य चितारे आदी मान्यवरांबरोबर शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व दलीत पँथर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.