Bharat Vikas Parishad South Pune branch

Bharat Vikas Parishad South Pune branch Bharat Vikas Parishad is non-Goverment nationwide organisation engaged in Sanskar & Seva projects th

02/08/2026

Visit our newly developed web site www.bvp-spct.org and give feedback. Thanks.

20/07/2026
20/07/2026

“राष्ट्रसेवा आम्ही फौजी लोकच करतो असे नाही तर भारत विकास परिषदे सारख्या सेवाभावी संस्थांचे कार्यकर्तेही करत असतात. त्यांच्या सेवेला जास्त महत्व आहे कारण आमच्यासारखा त्यांना सेवेचा मोबदला मिळत नसतो तरीही ते स्वतःचा वेळ, धन आणि मन समर्पित करत असतात.” असे मनोगत विशिष्ट सेवा पदक विजेते मेजर जनरल विजय व्ही. जोशी (निवृत्त) यांनी भारत विकास परिषदेच्या स्व-आधार या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने व्यक्त केले.
भारत विकास परिषदेच्या दक्षिण पुणे व पिंपरी चिंचवड शाखांच्या संयुक्त बीव्हीपी साउथ पुणे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सहकारनगर पुणे येथे चालवण्यात येणाऱ्या स्व-आधार या दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय व हात मोफत देण्याचे काम करणाऱ्या केंद्राच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त देणगीदार कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. एका वर्षात प्रदान केलेल्या ५३१ कृत्रिम पाय व हात केंद्रात बनवण्याच्या आधुनिक पद्धतीबरोबर विशेष दिव्यांगाना लागणाऱ्या अवयवांची माहिती देण्यात आली. या प्रसंगी केंद्रात काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा गौरव पदक देऊन सत्कार करण्यात आला.
सूरमणी पं. निनाद शुक्ला या दृष्टीहीन गीतरामायण गायकाच्या सुश्राव्य गायनाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात स्व-आधार या संस्थेबरोबरच भारत विकास परिषदेच्या दक्षिण पुणे व पिंपरी चिंचवड शाखांच्या विविध सेवाकार्यांची माहिती या वेळी दृकश्राव्य माध्यमाद्वारे देण्यात आली. यामध्ये संस्कार उपक्रमांतर्गत घेण्यात येणारे गुरुवंदन, राष्ट्रीय समूहगान व भारत को जानो या स्पर्धा तसेच वनवासी विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान, दिवाळी पॅकेट वाटप, अनिमिया मुक्ती, रक्तदान, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना मदत अशा अनेक सेवा कार्यांबद्दल देणगीदारांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात ट्रस्टच्या नविन संकेत स्थळाचे विमोचन करण्यात आले.(www.bvp-spct.org)
संस्थेच्या २५-२६ या आर्थिक वर्षातील विनियोग तसेच २६-२७ या वर्षासाठी निधीचे अंदाजपत्रक यांचा आढावा घेऊन हितचिंतकांना देणगीसाठी आवाहन करण्यात आले. सरतेशेवटी आतापर्यंतच्या देणगीदारांचे, लाभार्थ्यांचे, उपस्थितांचे, आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाखांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी अथक कष्ट घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामचंद्र एकबोटे यांनी व आभारप्रदर्शन डॅा. रामचंद्र आपटे यांनी केले.

जयंत जेस्ते,
पुणे
मोबाईल नंबर 9822510349

13/06/2026
योगी अरविंद मंच संचालित व्याख्यानमालेतील (२०२६) भाषणे- प्रायोजक भारत विकास परिषद दक्षिण पुणे शाखा
21/04/2026

योगी अरविंद मंच संचालित व्याख्यानमालेतील (२०२६) भाषणे- प्रायोजक भारत विकास परिषद दक्षिण पुणे शाखा

Share your videos with friends, family and the world

Address

Golvalkar Guruji Path
Pune
411009

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 9am - 5:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Vikas Parishad South Pune branch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share