15/09/2026
समाजकार्याची ओळख… एक वेगळं exposure visit
तेजस्विनी प्रकल्पातील Facilitators आणि Peer Leaders यांच्यासाठी ९ सप्टेंबर रोजी सांस फाउंडेशन, पुणे यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठी Exposure Visit आयोजित करण्यात आली.
या भेटीची सुरुवात झाली महात्मा फुले वाड्यापासून!
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यस्थळाला भेट देताना सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाच्या विचारांशी पुन्हा एकदा जोडले गेलो. फुलेंनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समुदायासाठी खुली केलेली विहीर पाहताना त्यांच्या समतेच्या विचारांची जाणीव झाली.
त्यानंतर सांस फाउंडेशनच्या विविध Community Learning Spaces ला भेट दिली. मुलांसाठी कौशल्यविकास, व्यक्त होण्याच्या संधी, अभ्यास आणि स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी दिले जाणारे प्रोत्साहन जवळून पाहता आले.
संगीत, वाद्यवादन, फॅशन डिझायनिंग आणि उत्स्फूर्त Jamming Session मध्ये तेजस्विनीच्या मुलींनी मनमुराद आनंद लुटला!
‘अजेन्सी कब अच्छी लगती है?’ या विषयावरील Opening Circle मध्ये सहभागी होताना मुलांच्या विचारांना आणि अनुभवांना ऐकण्याची संधी मिळाली. गप्पा, संवाद आणि नव्या मैत्रीने ही भेट आणखी खास झाली.
शिकणं केवळ पुस्तकांतून नाही, तर अनुभवांतूनही होतं…
अशाच भेटी होत राहो, नवनवीन अनुभव मिळत राहो!!!
#तेजस्विनी
#महात्माफुले #सावित्रीबाईफुले #फुलेवाडा