छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती

  • Home
  • India
  • Pune
  • छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती

छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर च्या विकास कामांसाठी अहोरात्र काम करणारी एक संघटना

21/08/2026

पेण शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले परंतु तो पुतळा असा होता की त्यामधे छत्रपती संभाजी महाराज आहेत की नाही हे समजत नव्हते, कारण ते एक माँडर्न शिल्प होते, आणि हा तर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा प्रकार आहे, येणाऱ्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांची कोणती प्रतिमा दाखवणार आहात ?
पेण नगरपरिषदेला विनंती आहे की झालेली चुक दुरुस्त करून लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुळ स्वरूपात स्मारक उभारण्यात यावे म्हणून छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून आयुक्तांना छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती रायगड जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले...

आज २७ जुलै महाराणी येसुबाईं (राजमाता राजाऊ) यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा, विनम्र अभिवादन..!स्वराज्यावर आले...
27/07/2026

आज २७ जुलै महाराणी येसुबाईं (राजमाता राजाऊ) यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा, विनम्र अभिवादन..!

स्वराज्यावर आलेल्या अतिबिकट प्रसंगी स्वत: कैदेत जाऊन स्वराज्य वाचवले ,
फक्त वाचवलेच नाही तर स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात करण्याची प्रेरणा दिली...

अशा थोर त्यागमुर्ती महाराणी येसूबाई साहेब यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! 🧡🙏

#श्रीसखीराज्ञीजयती 👑🚩

२५ जुलै १६२९महापराक्रमी राजे लखुजीराव जाधव यांची ३९७ वि पूण्यतिथी छत्रपती शिवाजीमहाराजांचे आजोबा व राजमाता जिजाऊसाहेबांच...
25/07/2026

२५ जुलै १६२९
महापराक्रमी राजे लखुजीराव जाधव यांची ३९७ वि पूण्यतिथी छत्रपती शिवाजीमहाराजांचे आजोबा व राजमाता जिजाऊसाहेबांचे वडील राजेलखुजीराव जाधव यांचा आज स्मृतिदिन, राजे लखुजीराव जाधव यांच्या हत्येसंबंधी काही साधनांमधून माहिती मिळते त्यात जेधे शकावली, पातशाहनामा व भाट कवने इत्यादी साधने आहेत. त्यावरून स्पष्ट होते की राजे लखुजीराव जाधव यांचा दबदबा खुप वाढत होता. त्यात २४००० हजार शिपाई आणि १५००० घोड़दळ तसेच ५२ चावड्याचे वतन त्यांच्याकडे होते. १६२९ साली राजे लखुजीराव जाधव हे सिंदखेडला आले तेंव्हा हि बातमी निजामशहास कळाली...
हा सरदार आपण हातचा सोडला. तो अत्यंत कावेबाज होता त्याचा दरारा मोठा होता तसेच स्वामिनिष्ठ होता परंतु स्वखुशीने तो आता आपल्याकडे येणे शक्य नाही. मोगल निजामशाहीच्या गादीला केंव्हा धोका पोहचवतील याचा नेम नाही. राजे लखुजीराव जाधव यांच्याशी युद्ध करणे जय मिळवणे याची आशा नाही हा विचार करत लखोजीराजे यांना कपटाने मारावे हा निर्णय निजामशहाने घेतला. राजे लखुजीराव जाधव यांना निजामशहाने मुलाबाळासह दौलताबाद येथे बोलावले. लखुजीराव जाधव आपल्या मुलांसह दरबारात गेले असता विश्वासघाताने दगाबाजी करून निजामशहाने राजे लखुजीराव जाधव त्यांची दोन मुले अचलोजीराजे व राघोजीराजे आणि नातू यशवंतराव या चौघांची २५ जुलै १६२९ रोजी कपटाने हत्या करण्यात आली...

राजे लखुजीराव जाधव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा त्रिवार मुजरा..!!!

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, १...
18/07/2026

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, १ प्रवासवर्णन, शेकडो लावण्या, छकडी आणि गाणी लिहून त्यांनी वास्तवाची जाणीव करून देत शोषितांचे आयुष्य जगासमोर मांडले. इतकेच नव्हे तर आपले साहित्य साता समुद्रापार देखील त्यांनी पोहोचविले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. मजूर, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी ते रस्त्यावर उतरून लढले.

#अण्णाभाऊ #साठे #पुण्यतिथी #अभिवादन
#छत्रपती_संभाजी_महाराज_सेवा_समिती

राज नाय नका म्हणू मावळ जवा पराक्रम करून येत्यात त्यासणी त्यांच्या बायका, पोरी ओवाळतात...राज आम्हा नाव्ह्याला बी एक संधी ...
12/07/2026

राज नाय नका म्हणू मावळ जवा पराक्रम करून येत्यात
त्यासणी त्यांच्या बायका, पोरी ओवाळतात...

राज आम्हा नाव्ह्याला बी एक संधी द्याना
राज हजारो शिवा कशीद जन्माला येतील पण शिवाजी राजा दुसरे होणे नाही..
जन्माला शिवा कशीद म्हणून आलो, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मारणार, येवढ भाग्य माझ्या पदरात घाला, आस म्हणणाऱ्या शिवा काशीद यांचा आज स्मूती दिन त्या निमित्ताने वीर शिवा काशिद यांना छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तर्फे मानाचा मुजरा...

09/07/2026

कैवल्य साम्राज्ञी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा २०२६

राम कृष्ण हरी 🙏.

09/07/2026

आज स्वतः इंद्रायणी मातेने माऊलींना वाट दिली, गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये खूप पाऊस पडत होता इंद्रायणी नदीला पूर आलेला होता. आळंदी ला जाणारे चारही पूल पाण्याखाली गेले होते. एक वेळ असं वाटत होतं की इंद्रायणीच्या फुलावरून माऊलींना जाता येणार नाही. परंतु शेवटी चमत्कार घडला आणि माऊली सुखरूप आळंदीतून बाहेर पडले...

राम कृष्ण हरी 🙏.

समुद्रातील छत्रपती शिवाजी म्हणून ओळखले जाणारे, आपल्या पराक्रमाने आणि स्वकर्तुत्वाने समुद्रावर अधिराज्य करत तब्बल २७ वर्ष...
04/07/2026

समुद्रातील छत्रपती शिवाजी म्हणून ओळखले जाणारे, आपल्या पराक्रमाने आणि स्वकर्तुत्वाने समुद्रावर अधिराज्य करत तब्बल २७ वर्ष कोकण सागरी किनारा परकीय सत्तांपासून सुरक्षित ठेवणारे मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐

(ऑगस्ट १६६९ - ४ जुलै १७२९)

Address

At. Post-Tulapur Tal-Haveli. Dist. Pune-412207
Pune
412207

Telephone

+919822669696

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती:

Shortcuts

Share