04/02/2026
‘माझा वर्ग मूल्यवर्धित वर्ग’ उपक्रमातून विद्यार्थी गिरवताहेत मूल्यांचे धडे!
दि. २७ जानेवारी २०२६
जिल्हा परिषद शाळा, हादगाव (बु.) ता. पाथरी, जि. #परभणी या शाळेत #मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमांतर्गत ‘माझा वर्ग मूल्यवर्धित #वर्ग’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. यामुळे शिक्षक-विद्यार्थ्यांच्या सहभागातून वर्गात सकारात्मक वातावरणनिर्मिती होत असून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टी, जबाबदारी आणि मूल्यांची जाणीव दृढ होत आहे.
‘मराठा संदेश’ या स्थानिक दैनिकाने उपक्रमाची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली आहे.