हाटकर सरदार मंडळ

हाटकर सरदार मंडळ तमाम परिचित आणि अपरिचित हाटकर वीरांन?

होलकरशाही इतिहासावर समाज माध्यमात आताशी कुठे मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला सुरुवात होतेय,महाराजा ए हिंद पुस्तकाचे लेखक ...
12/02/2025

होलकरशाही इतिहासावर समाज माध्यमात आताशी कुठे मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला सुरुवात होतेय,
महाराजा ए हिंद पुस्तकाचे लेखक मयूर सुळ यांची महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनचरित्रावरील ही पॉडकास्ट..
सर्वांनी जरूर ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया,अभिप्राय जरूर कळवा..

भविष्यातील वाटचालीसाठी होलकरशाहीवर अभ्यास करणाऱ्या सर्व इतिहास प्रेमींना शुभेच्छा...

#होळकरशाही
#महाराजा_यशवंतराव_होळकर
#राजराजेश्वर

In this episode of Itihas Yatra Podcast, we explore the legendary life of Maharaja Yashwantrao Holkar, the only Indian ruler to defeat the British in battle....

प्रतिकांच राजकारण...मागच्याच आठवड्यात पुण्यातील सुभेदार तुकोजीराव होळकर यांचं स्मारक राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात...
26/12/2024

प्रतिकांच राजकारण...

मागच्याच आठवड्यात पुण्यातील सुभेदार तुकोजीराव होळकर यांचं स्मारक राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलं आणि इतिहास प्रेमींमध्ये एकच आनंदाची लाट उसळली.सुरुवातीपासून समाधी स्मारकाचा विषय मार्गी लावणाऱ्या हर एक इतिहास अभ्यासक,होळकर प्रेमी,राजकारणी यांचं मनस्वी अभिनंदन.

मुळात आपल्या प्रतिकांविषयी आपण कमालीच सत्व न जपणारी लोक/समाज..पण हळूहळू वाफगाव च प्रकरण मार्गी लागलं.
किल्ल्याचं संवर्धनाच काम ज्या प्रकारे चालू आहे,त्याच्याकडं समाज मन म्हणून आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.आपली स्मारक दिमाखात उभी राहतायत,आपण पण त्यासाठी आपला उत्साह समाज माध्यमांसोबत ,किल्ल्याला वरच्यावर भेटी देऊन सुध्दा दाखवला पाहिजे. शेवटी वाफगाव सुद्धा आपलं शक्तीपीठंच...

ह्या सगळ्यात भूषणसिंहराजे होळकर यांचा सिंहाचा वाटा आहे हे आपण खुल्या दिलाने मान्य करून,सर्व प्रकारचे भेदाभेद विसरून त्यांच्या मागे सर्व शक्तीनिशी उभं राहिलं पाहिजे.प्रत्येक जण आपल्या पद्धतीने काम करत असतो,कुणाचंच नाव घेतल नाही याचा अर्थ त्यांचं महत्व कमी नाही होत पण त्याच वेळी जी नेते मंडळी आपलं राजकीय वजन वापरून विषय मार्गी लावतायत त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.आणि त्यांच्यामागे सर्व ताकदीने उभं राहायला हव...
जय शिव ,जय मल्हार....

#प्रगल्भ_धनगर_राजकारण

Shrimant Bhushansiha Raje Holkar महाराज साहेब..

17/12/2024

पडळकर जी तुम्ही हे ओळखायला हवं होतं...

इंदापुरात तुमच्यावर चप्पल फेकली गेली त्यावेळी भाजप चा डुक्कर पोलार्ड ,तुमच्या बाजूने बोलायला आला नाही त्याच वेळी तुम्ही ओळखायला हवं होतं की,पक्षासाठी निष्ठा वाहण्यात अर्थ नाही..

क्रांतिकारक बापाचा वारसा सांगणाऱ्या तुमच्याच जिल्ह्यातील तितकाच नीच,तितकाच जातीवादी ,तितकाच कपटी जंतू आपल्या माणसांना पुढं घालून तुमच्यावर हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी एकही। खाजपा चा कुत्रा तुमच्या बाजूने बोलला नाही..

तुमचा पक्ष पवारांशी जुळवून घेत असताना तुम्ही मात्र टोकाचा विरोध करून परतीचे दोर कापून ठेवले आता देवा गोडबोले पण नालायक लोकांना सोबत घेऊन तुम्हाला शहाणपण शिकवतायत..

संसदीय लढाया आपल्या लोकांना जमत नाही... हे पक्ष दाखवत असतात पण तुम्ही पक्ष निष्ठा पक्ष निष्ठा करत बसला आज हाती काय आलं..

राजकीय भान बाळगा...
कार्यकर्ते फक्त जत नाही तर सातारा ,सांगली,सोलापूर सगळीकडचे मोठे करा, इतर नेत्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्या तशा तुम्ही करू नका.

जत चा गावागावातील माणूस पाठ करा,सोसायटी,सरपंच,सदस्य शाळा मास्तर,शेतकरी,उद्योजक ते गोर गरिबांच् पोर ज्याला शक्य असेल त्याला बळ द्या..
मनगट मजबूत करा आणि प्रस्थापितांच्या छाताडावर थया थया नाचायच,एवढं ध्यानात असू द्या..

सगळ्या पक्षांचे दरवाजे उघडे राहतील एवढीच टीका करा...
आपल्याला कामा शिवाय पर्याय नाही कारण आपण उभं असलो की लोक जात बघतात हे वास्तव आहे...

#प्रगल्भ_धनगर_राजकारण

Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर
Ram Shinde साहेब
Dattatray Bharane

बदल घडवा,बदल करा,...राजनीती बदला

आमदार संख्या आणि दबावाच राजकारण 2024 च्या महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेचा निकाल लागला..अनेक भागातील लोकांनी त्यांच्या...
25/11/2024

आमदार संख्या आणि दबावाच राजकारण

2024 च्या महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेचा निकाल लागला..
अनेक भागातील लोकांनी त्यांच्या नेत्याचं राजकारण फसल तरी आमचेच लोक जास्त कसे निवडून आले अश्या पोस्ट करत एक दबावाच राजकारण सोशल मीडियावर करायला सुरुवात केली.
अर्थात त्या अकड्यांमगिल फोल पणा दखवण्यासाठी सदरील पोस्ट हटकर सरदार च्या माध्यमातून आपण करत आहोत...

ओबीसी नि एकजुटीने दबावाच राजकारण झिडकारल आणि बहुसंख्याकवादाची चिरफाड या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निकालात केली...तर आता अकडेवारीकडे वळूया

एकूण विधानसभा मतदार संघ : 288
Sc अनुसूचित जाती साठी आरक्षित : 29
St अनुसूचित जमाती साठी : 25

वरील आरक्षित 54 जागा सोडून, काही मोठया जात समूहाचे आकडे खालील प्रमाणे
१. धनगर आमदार 4 (जानकर,कांबळे आणि लवटे हे खाटीक धन4 असून आरक्षित जागेवरून निवडून आल्यामुळे ह्यात पकडले नाहीत)
2. वंजारी आमदार - साधारण 7 ते 10
3. बंजारा आमदार - 5 ते 7
4. माळी आमदार - 7 ते 10
5. तेली आमदार -साधारण 7
6. लिंगायत आमदार - अंदाजे 4 ते6
7. पडमशाली आमदार - 3 (सोलापूर जिल्हा फक्त,इतर कल्पना नाही)
8. आगरी कोळी आमदार - 8 ते 10
9.जैन आमदार - 7
10. सीकेपी आणि ब्राम्हण - साधारण 10 ते 12
11. मुस्लिम आमदार - 10
12. मुंबई मधील परप्रांतीय आमदार - ही संख्या सुद्धा 6 ते 8 च्या घरात असेल (कमीत कमी)
13. इतर बारीकसारीक जातसमूह - 5

म्हणजे sc st चे 54 आमदार आणि वरील यादीतील किमान संख्या पकडता 80 इतर समाजातील आमदार तर ही एकूण संख्या जातेय 135 पर्यंत ,म्हणजे 288 वजा 135 ,150 ते 153 उरलेला मराठा समाज...

थोडक्यात हे गणित बघता साधारण 130 च्या घरात मराठा +कुणबी आमदार असू शकतात.

वरील सर्व आकडेवारी देण्याचं एकच कारण की,आपल्या लोकसंख्यच्या भागीदारीत आपली राजकीय हिस्सेदारी मिळवा.
तुमच्यवर झालेलं राजकीय अतिक्रमण मोडून काढा, तरच राजकीय भान जपलं जाईल आणि पोतराज,वासुदेव,कडकलक्ष्मी वाल्यांपासून ते शेतकरी ,नोकरवर्ग सगळ्यांचेच प्रश्न विधानसभेत न संसदेत मांडले जातील..

फुले शाहू आंबेडकरांचं पुरोगामीत्व आणि प्रबोधनकार,सावरकर वगैरेंच हिंदुत्व जपण्या आधी तुमचा राजकीय हिस्सा घ्या आणि इतरांचं राजकीय आक्रमण मोडा मग धर्म,पुरोगामीत्व ह्यावर जा...

#प्रगल्भ_धनगर_राजकारण

23/11/2024

साल 2019,
पक्षाने युती धर्म पाळायचा म्हणून बारामतीतुन तिकीट दिल 30 हजार मत मिळून मानहानीकारक पराभव समोर दिसत होता,तरी लढले....

साल 2024
आज परत घरचा मतदारसंघ सोडून पलीकडे हाच माणूस 40 हजारच्या लीड न आलाय...
आपल्या सारख्या घराणे शाहीचा बॅक अप नसलेल्या अनेक ओबीसींसाठी हा निर्णायक विजय आहे...
जयंत पाटील न विषवजीत कदम विशाल पाटील सारखे कट्टे विरोधक एकत्र येऊन जातीवाद करत असताना पडळकर कर्तृत्व दाखवून निवडून आलेत...

आता कॅबिनेट आणि पालक मंत्री देऊन योग्य सम्मान करावा हीच अपेक्षा..

गोरगरीब आणि असंख्य विस्थापित विजयी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा,हक्काची भागीदारी मिळालीच पाहिजे...

धनगर समाज ,ST आरक्षण आणि फसत चाललेलं राजकारण...धनगर समाज आणि ST आरक्षण चळवळीला समाजातील नेत्यांपासून,राज्यकर्त्यांपर्यंत...
05/11/2024

धनगर समाज ,ST आरक्षण आणि फसत चाललेलं राजकारण...

धनगर समाज आणि ST आरक्षण चळवळीला समाजातील नेत्यांपासून,राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मागच्या 30 35 वर्षात चोथा करून टाकलेलं आपल्याला दिसून येत.मुळात चळवळीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या कोणत्याच धनगर नेत्याला st आरक्षणाच्या तरतुदी, आर्टिकल 341 अन्वये असणारे शासनाचे अधिकार हे कशाशी खायचं ह्याची बऱ्याच लोकांना कल्पना नसते.
फक्त र चा ड झाला या पलीकडे आजवर एकाही धनगर नेत्याने धाव मारलेली नाही.

आरक्षणाच्या मूलभूत नियमांमबद्दल समाजात उदासीनता असताना,नुसत्या एकाच जातीवर राजकारण होत नाही हे मात्र समाजाला अजून उमगलेल नाही.

राजकारणात एखादं नवं नेतृत्व आलं रे आलं की त्याला जातीय बंधनात अडकवून टाकायचं..इतकं अडकवायच की जे सत्तेत वर्षाणू वर्षे मलिदा खात बसलेत ते पक्षातील वरिष्ठ नेते म्हणून ,धनगर नेत्यांना बोलायला मोकळे की जातीत तरी तुमचं स्थान आहे का?

मग ह्याच नेत्यांना एकमेकांविरोधात सभा घ्याव्या लागतात.तेव्हा आपलाच समाज बालिश मतं मांडतो की अमक्या विरुद्ध तमक्या धनगर नेत्याने प्रचार करू नये असं बालिश विधान करत असत.

आरक्षण आणि राजकारण ह्याला धनगर समाज जोपर्यंत वेगळं महत्व देणार नाही तोवर ना तुमचे मागच्या पोस्ट मध्ये म्हणल्याप्रमाणे 20 25 आमदार, 3खासदार येणार आहेत ना तुमचे प्रश्न मांडले जाणार आहेत.

आता आरक्षण चळवळ ज्यांना चालवायची आहे त्यांनी राजकारण्यांची अंतस्थ मदत घ्यावी,पण ह्यातून इतर समाजाकडून बोध घेऊन,संसद चालवायला पात्र लोकांना निव्वळ जातींमुळे घरी बसायला लागू नये याची काळजी घ्यावी. समाजातील ज्या नेत्यांना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून नाव ठेवता,हसता त्यापेक्षा भंगार कॅरेक्टर ची किमान 100 लोक विधानसभेत त्यांच्या जातीच्या जोरावर गेलेत हे विसरू नका.

#प्रगल्भ_धनगर_राजकारण

भाग 1 : धनगर समाज लोकसंख्या: अर्धवट माहिती , फाजील आत्मविश्वास आणि गाफील समाज.    मित्रानो,प्रत्येक 5 वर्षांनी लोकसभा वि...
30/10/2024

भाग 1 : धनगर समाज लोकसंख्या: अर्धवट माहिती , फाजील आत्मविश्वास आणि गाफील समाज.

मित्रानो,प्रत्येक 5 वर्षांनी लोकसभा विधानसभा निवडणूक लागले की समाज माध्यमातून 2 नंबरची लोकसंख्या म्हणून धनगर समाजाच्या लोकसंख्येबद्दलची आकडेवारी फिरत असते.यातून प्रत्येक समाज बांधव लोकसंख्येच्या आकडेवारीत न जाता नुसतं मोकळ्या हवेतल्या गप्पा मारतो आणि समाजातील सामान्य लोकांसोबत ,सुशिक्षित पण फक्त वॉट्सप च्या ज्ञानाने जागे झालेले अर्धवटराव त्या आकडेवारीचा बेस धरून ,उंटावरून शेळ्या हाकत असतात.

अनेक जिल्ह्यांच्या ब्रिटिशकालीन गॅझेट वरून धनगर समाज एकवेळ संपत्ती धारणेत पहिल्या 2,3 जातसमूहात येत असला ;तरी लोकसंख्येने कधीही तो सम्पूर्ण महाराष्ट्रात 2ऱ्या क्रमांकाची जात असल्याची आकडेवारी दिसून येत नाही.यामुळे समाजबांधवांपुढे मांडली जाणारी आकडेवारी बऱ्याचदा अवास्तव वाटते. साधारण 6 ते 8 टक्के जरी लोकसंख्या धरली तरी विधानसभेच्या 288 आणि विधानपरिषदेच्या 66 + 12 (राज्यपाल नियुक्त) अश्या एकूण 366 जागांपैकी किमान 22 ते 25 जागांवर समाजाने ,लोकसंख्येच्या प्रमाणांत हक्क सांगायला हरकत नाही.

आपण आपल्या लोकसंख्येच्या बाबतीतच एवढे गाफील आहोत की,आधार नसलेल्या अकड्यांवरून आपण कल्पनेचे इमले बांधतोय पण यातून समाजात आत्मविश्वास तयार होत नाही.कारण 1,2 आमदारांवरून 35 40 आमदारांचे आकडे समाजाला झेपत नाही आणि समाजबांधव हात हलवत बसतो.

उगाच 10 ते 12 टक्के आकडा,ज्याचा काडीचाही बेस नाही, 14 कोटीतील 1.5कोटी धनगर पकडून फसव्या आकड्यांच्या प्रलोभणात न पडता समाजाने निदान 22 ते 25 जागांच्या खाली प्रतिनिधी असतील तर आपण राजकीय दृष्ट्या दळभद्री आहोत असे समजून आपली हक्काची हिस्सेदारी घेण्यासाठी भविष्यात तयार रहावं आणि त्यासाठी कोणताही किंतु परंतु मनात ठेवण्याचं कारण नाही.

साधारण 6ते 8% लोकसंख्या धरली तरी अपेक्षित उमेदवारांची आकडेवारी ही खालीलप्रमाणे असावी,
विधानसभा - 288 पैकी किमान 18 अनिवार्य
विधानपरिषद - 78 पैकी 5
लोकसभा - 48 पैकी किमान 2 ते 3

हा अनुशेष भरून निघाला तरच हे प्रतिनिधी धनगर समाजासोबत इतर समाजाचेही मुद्दे प्रभावीपणे मांडतील आणि राज्यासोबत देशाचाही राज्यकारभार उत्तमपणे हाकतील, नाहीतर 4 ,4 पिढ्यांच्या पालखी चे भोई होऊन तुमचे मणके मोडतील पण तुमच्या अवस्थेत केसाचा फरक पडत नसतो.
राजकीय प्रतिनिधित्वात जातीय समतोल असला तरच राजकारणाचा दोर नीट हाताळला जाइल,आणि हेच अंतिम सत्य आहे . आपल्याला या लेखमालेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा जातीवाद करायचा नाही,आणि तसा प्रयत्न किंवा उद्देश ही नाही. पण आपले प्रतिनिधींत्व असले तरच वेगवेगळे मुद्दे सभागृहात मांडले जातील जे इतराना कधीही शक्य नसेल.

लेखन साभार - #प्रगल्भ_धनगर_राजनेता

उद्याच्या भागात - धनगर आरक्षण,अर्धवट माहिती आणि समाजाचे अल्पज्ञान

29/10/2024

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, हटकर सरदार मंडळ पेज च्या माध्यमातून धनगर जातसमूहाचे राजकारणाबाबतीत असलेलं मतप्रवाह, ज्याचा मुख्यत्वे आजपर्यंत धनगर जात समूहाला तोटाच होत आलेला यावर एक लेखमालिका सुरू करीत आहे. इथले लेख हे थोडक्यात आणि एक एक मुद्द्याला धरून असतील.हे सर्व लेख तुम्ही सोशल मीडियावर #प्रगल्भ_धनगर_राजकारण या नावाने शेअर करू शकता आणि कमेंट मध्ये आपले मत नोंदवून काही दुरुस्ती,अभिप्राय असतील तर जरूर कळवा.

#प्रगल्भ_धनगर_राजकारण

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हाटकर सरदार मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share