05/06/2022
दि. ५ जुन २०२२ - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे ची राष्ट्रीय सेवा योजनेची टीम, स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, सामाजिक वनीकरण, नऱ्हे पुणे येथे जागतिक पर्यावरण दिननिमित्त १०० झाडे लावण्यात आली.
या प्रसंगी लाईफ त्री संस्थेचे संस्थापक श्री. संजय परोडकर सर आणि सदस्य श्री.
सुभाष नशिने सर, श्री. कुशल मिसाळ सर उपस्थित होते. त्याचप्रमाणें हॉटेल Blue Diamond HRhead आशा सुवर्णा मॅडम यांनी १०० देशी झाडे दिली. यावेळी हॉटेल चा सर्व स्टाफ देखील आला होता. त्याचबरोबर लोकमत चे पत्रकार श्री. अवतडे सर उपस्थित होते..
यावेळी API कणसे साहेब व API कवठेकर साहेब यांनी सुध्दा झाडे लावली..!