डॉ के एस खराडे फाऊंडेशन,पारगाव तर्फे आळे.

  • Home
  • India
  • Pune
  • डॉ के एस खराडे फाऊंडेशन,पारगाव तर्फे आळे.

डॉ के एस खराडे फाऊंडेशन,पारगाव तर्फे आळे. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from डॉ के एस खराडे फाऊंडेशन,पारगाव तर्फे आळे., Non-Governmental Organization (NGO), PARGAON, Pune.

कै. डॉ. के. एस. खराडे... पारगाव तर्फे आळे व परिसरातील गावांच्या अनेक सक्षम पिढ्या घडविणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व. त्यांच्या विचारांने, पाठिंब्याने प्रेरित झालेल्या तरुणांनी संत तुकोबाराय, नामदेवराय, महर्षी चर्वाक, गौतम बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी एकरुप पावलेली डॉक्टरांची विचारधारा प्रमाण माणून विद्यार्थीकेंद्रीत, सर्वसामान्य माणूसकेंद्रीत सामाजिक विकासा

साठी ही संस्था स्थापन केलेली आहे.

संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य अाहे. शिवजन्माने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील दुर्गम गावांपासून फाऊंडेशनच्या कार्यास प्रारंभ होत आहे.

अभिनंदनबोरी खुर्द(साळवाडी) गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पनाताई वैभवकुमार काळे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी  त...
15/02/2026

अभिनंदन

बोरी खुर्द(साळवाडी) गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पनाताई वैभवकुमार काळे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी तसेच डॉ.के एस खराडे फाउंडेशनचे कार्याध्यक्ष,पारगाव गावचे सुपुत्र,उद्योजक श्री संभाजी शिवाजीराव चव्हाण यांची जुन्नर पंचायत समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ के एस खराडे फाउंडेशन विश्वस्तांच्या, सभासदांच्या वतीने हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या भावी राजकीय,सामाजिक वाटचालीस अनेक शुभेच्छा💐💐💐💐💐
https://www.instagram.com/p/DUyOTi8DHVm/?igsh=aWxpYWU5NjFmczh1

*डॉ.के.एस.खराडे फाउंडेशन चे विश्वस्त,* जगदंबा मोटर ड्रायव्हिंग स्कुल,पिंपरी चिंचवड चे सर्वेसर्वा *मा.श्री.दिनेशशेठ तट्टू...
16/11/2025

*डॉ.के.एस.खराडे फाउंडेशन चे विश्वस्त,* जगदंबा मोटर ड्रायव्हिंग स्कुल,पिंपरी चिंचवड चे सर्वेसर्वा *मा.श्री.दिनेशशेठ तट्टू* यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

त्यांच्या हातून समाजाची ,देशाची सेवा घडो हीच श्री कालभैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना.
-------------------------------------
*टीम-डॉ के एस खराडे फाऊंडेशन*

*सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत मोठ्या गटात गौरवी सचिन डुकरे तर लहान गटात घनश्याम गणेश येवले प्रथम*डॉ.के एस खराडे फाउंडे...
15/02/2025

*सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत मोठ्या गटात गौरवी सचिन डुकरे तर लहान गटात घनश्याम गणेश येवले प्रथम*

डॉ.के एस खराडे फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा पार पडली होती . या स्पर्धेत मोठ्या गटात गौरवी सचिन डुकरे हिने प्रथम ,सिद्धी प्रकाश डुकरे हिने द्वितीय तर श्लेषा शंकर भोर हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच लहान गटात घनश्याम गणेश येवले याने प्रथम ,शरयू भागवत नढे हिने द्वियीय व स्वराज तुषार येवले यांने तृतीय क्रमांक मिळविला.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्री समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ.दत्तात्रय चव्हाण यांच्या वतीने शालेय बॅग व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 100 प्रति ,व महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना 200 प्रति भेट देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दत्तात्रय चव्हाण होते. पारगाव तर्फे आळे गावच्या प्रथम नागरिक रेश्माताई बोटकर, उपसरपंच रामचंद्रशेठ डुकरे ,डॉ.के.एस खराडे फाउंडेशन चे अध्यक्ष भिकाजी चव्हाण,महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या, मेहेर मॅडम ,उद्योजक संभाजीशेठ चव्हाण,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शंकर भोर,वि.वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन सचिन डुकरे ,कैलास तट्टू, सर्व शिक्षक व पालक ,ग्रामस्थ तसेच फाउंडेशन सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मुलांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी तसेच स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न येतात ,याची ओळख व्हावी यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेचे हे पहिलेच वर्ष होते.

यापुढील काळातही फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक ,व आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातील असे फाउंडेशन चे शैक्षणिक उपक्रमाचे प्रमुख निवृत्त प्राध्यापक सुभाष चव्हाण सर ,निलेश येवले सर यांनी सांगितले.

*डॉ.के एस खराडे फाउंडेशन* यांच्या वतीने दि.01/02/2025 रोजी महात्मा गांधी विद्यालय येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा पार...
13/02/2025

*डॉ.के एस खराडे फाउंडेशन* यांच्या वतीने दि.01/02/2025 रोजी महात्मा गांधी विद्यालय येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा पार पडली होती .स्पर्धेत *लहान गट व मोठा गट मिळून 300 मुलांनी* सहभाग नोंदवला होता .

*मुलांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी तसेच स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न येतात ,याची ओळख व्हावी यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते* या परीक्षेचे हे पहिलेच वर्ष होते. फाउंडेशन च्या वतीने निवृत्त शिक्षक प्रा.सुभाष चव्हाण सर ,प्रा.निलेश येवले सर यांनी काम पाहिले तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक, व सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.

उत्तीर्ण झालेल्या *दोन्ही गटातील पहिल्या 3 विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून शालेय बॅग व आकर्षक ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहे यासाठी श्री समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ.श्री.दत्तात्रय चव्हाण सर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 100 प्रति तसेच महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना 200 प्रति श्रीमद भगवतगीता भेट दिल्या आहेत*

*सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2024-25 बक्षीस वितरण समारंभ तसेच श्रीमद भगवतगीता वाटप सोहळा शनिवार दि.15/02/2025 रोजी सकाळी 9 वाजता महात्मा गांधी विद्यालय येथे आयोजित केला आहे सर्व ग्रामस्थांना ,पालकांना विनंती आहे आपण अवश्य या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.*

धन्यवाद
*टीम डॉ के एस खराडे फाउंडेशन.*

शिवनेरी मॅरेथॉनचे हे तिसरे पर्व आहे. आगामी शिवजन्मोत्सवात, रविवार, १६ फेब्रुवारी २५ हा दिवस राखून ठेवायला, मॅरेथॉन मध्ये...
25/10/2024

शिवनेरी मॅरेथॉनचे हे तिसरे पर्व आहे. आगामी शिवजन्मोत्सवात, रविवार, १६ फेब्रुवारी २५ हा दिवस राखून ठेवायला, मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायला आणि त्यासाठी आत्ताच सवलतीत नोंदणी करायला विसरू नका मित्रांनो.

आपणा सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, क्रिडाप्रेमी धावपटूंच्या सहकुटुंब सहमित्रपरिराच्या स्वागतासाठी आणि आपल्याला सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी टीम शिवनेरी ट्रेकर्स व शिवजन्मभूमीतील सर्व मावळे सज्ज आहोत.

स्वराज्याच्या जोशात...
जय जिजाऊ, जय शिवराय च्या घोषात...
अस्सल जुंद्री पाहूणचारात...
एकदा धावून तर पहा...
जुन्नर ला एकदा येवून तर पहा...

Online event Registration & ticketing page of Shivneri Marathon 2025. Buy Tickets for this Junnar Event organized by Shivneri Trekkers.

Address

PARGAON
Pune
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ के एस खराडे फाऊंडेशन,पारगाव तर्फे आळे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share