22/09/2022
#किल्लेसंवर्धनमोहीम &
#किल्लेस्वच्छतामोहिम
#पावनखिंड येथे दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम ही दिनांक: १८ सप्टेंबर, २०२२ रोजी अगदी उत्साहात पार पडली. या मोहिमेत सह्याद्री फाउंडेशन, महाराष्ट्र आणि शिवशंभू सेना, कोल्हापूर या संस्थांमधून जवळपास ६० शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने आणि पावनखिंड लढविलेल्या त्या वीर मराठा शूरवीरांच्या जयघोषाने या मोहिमेस सुरुवात झाली. तसेच ज्ञात अज्ञात शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
व गडावरील उपस्थित सर्व भेट देणाऱ्या व्यक्तींना स्वच्छता राखण्यास आव्हान करण्यात आले.
🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी, जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
पुढील मोहिमेत सहभागी होण्यासाठी आम्हाला जॉईन व्हा.
.sarsenapati