Koshti Matrimonial

Koshti Matrimonial For any enquiry about website issues kindly contact:-
Mr Sunil Dhage
Mobile-9423004828 / 9762314631
Email :- [email protected]

जय चौंडेश्वरी..🌸😊🙏काल दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी माझा वाढदिवस माझ्या सर्व कुटुंबाने अतिशय आनंदात आणि  उत्साहात साजरा के...
03/09/2025

जय चौंडेश्वरी..🌸😊🙏

काल दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी माझा वाढदिवस माझ्या सर्व कुटुंबाने अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला..

मी आपल्या सर्व समाज बांधवांच्या, मित्रांच्या, आप्तेष्ट आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या स्नेह, आशीर्वाद आणि सद्भावना मुळे आज वयाची 67 वर्षे पूर्ण करून 68 व्या वर्षात पदार्पण करीत आहे..🙏

माझ्यावर आपले असेच प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आणि कृपादृष्टी असू द्यावी.. ज्यायोगे मी उर्वरित आयुष्यातही शक्य त्याप्रमाणे समाजसेवा करू शकेल..

आपण प्रत्यक्ष भेटून, फोन द्वारे, समाज माध्यमाद्वारे मला माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्यात, आपले हे प्रेम मला पुढील आयुष्यात नक्कीच मार्गदर्शक ठरेल..

आपलाच समाज बांधव..
सुनील ढगे
उपाध्यक्ष
देवांग कोष्टी समाज पुणे

जय चौंडेश्वरी.. 🌹खुशखबर..महाराष्ट्रातील कोष्टी समाजाच्या गुणी गायक व नृत्य कलाकारांना सुवर्णसंधी…देवांग कोष्टी समाज पुणे...
03/09/2025

जय चौंडेश्वरी.. 🌹

खुशखबर..
महाराष्ट्रातील कोष्टी समाजाच्या गुणी गायक व नृत्य कलाकारांना सुवर्णसंधी…

देवांग कोष्टी समाज पुणे आयोजित कै. सौ अलकाताई मुसळे स्मरणार्थ संगीत रजनी 2025

समाजातील गायक/नृत्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी देवांग कोष्टी समाज, पुणे यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले श्री विवेकजी परांजपे यांच्या संगीत संयोजनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून जमा करावयाचा आहे. आलेल्या फॉर्म मधील सर्व कलाकारांना पुणे येथे ऑडिशन साठी बोलावण्यात येईल, संगीत क्षेत्रात तज्ञ असलेले पं. हृषीकेश महाले (गायक, संगीतकार, गीतकार) तसेच स्वरश्री मॅडम (गायिका, गीतकार) अशा दोन परीक्षकांच्या मार्गदर्शनातुन गायक कलाकारांची निवड केली जाईल तसेच निवड केलेल्या कलाकारांचा चांगला सराव घेऊन दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे या सर्व कलाकारांचा गायनाचा तसेच नृत्याचा कार्यक्रम होईल..

तरी गायन 🎤आणि नृत्य 💃 या कलेमध्ये पारंगत असलेल्या इच्छुक समाजबांधवांनी त्वरित खालील गुगल फॉर्म भरून पाठवावा..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdYWCEh-0YjI58afW6l9j1LVlLYZddyDCwUlm0S3xny0Mj-Ng/viewform?usp=sf_link

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 5 सप्टेंबर 2025

महत्वाची टिप :
# वयोमर्यादा - वय वर्ष 13 च्या पुढील.
# निवडीचे सर्वस्वी अधिकार परीक्षकास असतील.
# निवड झालेल्या कलाकाराला सरावासाठी यावे लागेल.
# ऑडिशन करता किंवा कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही.
याची कृपया नोंद घ्यावी..

ऑडिशन ची वेळ आणि ठिकाण एक दिवस आधी कळवण्यात येईल..
ऑडिशन दिनांक 07 संप्टें. 2025

# अधिक माहितीकरिता संपर्क :
सुनील ढगे
9423004828
सौ मंजुषा फासे
9423011022
सौ मेघमाला पांडकर
9923172878

सुनील ढगे
उपाध्यक्ष
देवांग कोष्टी समाज पुणे

Address

Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Koshti Matrimonial posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Koshti Matrimonial:

Share