Annapurna Pariwar

Annapurna Pariwar Annapurna Pariwar is a group of Non-Govt. organizations working in Mumbai and Pune for the urban slum dwellers.

*Annapurna Pariwar – 33 Years of Women Empowerment*On 11 July 2026, Annapurna Pariwar proudly celebrated its 33rd Founda...
13/08/2026

*Annapurna Pariwar – 33 Years of Women Empowerment*

On 11 July 2026, Annapurna Pariwar proudly celebrated its 33rd Foundation Day, marking over three decades of empowering poor employed women and their families in 650 slums of Pune and 1200 slums of Mumbai.

The journey began in 1993 from a modest 8 × 8-foot room beneath the residence of Dr. Medha Purao Samant in Gopinath Nagar, Pune. With limited resources and no tables or chairs, a vision of economic and social empowerment took shape.

Today, the organization operates from its 30,000 sq. ft. headquarters, Suvastu Prestige, in Warje, Pune, along with its 5,000 sq. ft. Regional Office in the Vashi Commercial Complex, Navi Mumbai.

What started by supporting nine women vegetable vendors has grown into a professionally managed group of six sister organizations, serving 1.25 lakh shareholder members through 18 branches, with 300+ employees, 2.5 lakh insured members, 9 Day Care Centres, and the Vidyapurna Scholarship Programme, which supports 1,000 students every year.

Today, Annapurna Pariwar stands as a powerful symbol of sustainable women's empowerment, financial inclusion, and community development—transforming lives.

अन्नपूर्णा परिवार तर्फे सर्वांना क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
09/08/2026

अन्नपूर्णा परिवार तर्फे सर्वांना क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त अन्नपूर्णा परिवारा तर्फे त्यांना ...
01/08/2026

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त अन्नपूर्णा परिवारा तर्फे त्यांना विनम्र अभिवादन!!!

Annapurna Pariwar wishes everyone a very Happy Guru Pournima!!!
29/07/2026

Annapurna Pariwar wishes everyone a very Happy Guru Pournima!!!

डॉ  कुमार सप्तर्षी अलविदा !! 🙏🏼गेल्या अनेक वर्षांपासूनचे आपले मैत्र, स्नेह.हक्काने कॉल करून बोलावणे, " मेधा , अमुक कार्य...
20/07/2026

डॉ कुमार सप्तर्षी अलविदा !! 🙏🏼

गेल्या अनेक वर्षांपासूनचे आपले मैत्र, स्नेह.
हक्काने कॉल करून बोलावणे, " मेधा , अमुक कार्यक्रम/ तमुक आंदोलन आहे. तू यायला हवं"
तुमच्याशी तास दोन तास गप्पा मारल्या की इतक्या विषयांवर वेगळेच एंगल लक्षात यायचे...
मी कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशनच्या मुशीत घडलेली असून ही आपल्यामध्ये एक राजकीय, वैचारिक सामंजस्य होते.
ते सारे संपले.

आता उरले ते स्मरणातील हसरे प्रसन्न व्यक्तिमत्व, प्रखर बुद्धी तरी ही त्याचा गर्व न करता समोरच्याचे विचार समजून घेण्याची आपुलकी, सर्जनशीलता ..
युवक क्रांती दल च्या माध्यमातून तरुण वयात युवकांना एकत्र आणून सर्जनशील आणि संघर्षमय कार्यक्रम उभा करणारे डॉक्टर खरेच शेवट पर्यंत
"कुमार "
म्हणजे विचारांनी तरुण टवटवीत होते.
हिंसा कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही प्रकारची, करायची नाही , ही महात्मा गांधींच्या विचारांवरील ठाम निष्ठा तारुण्यापासून वार्धक्य पर्यंत डॉक्टरांनी जपली होती.
"येरवडा तुरुंगाला विद्यापीठ" दर्जा देणारे डॉक्टर
"सत्याग्रही विचारधारा" सारखे वैचारिक मासिक चालवत आणि त्याचे संपादकीय वाचलेच पाहिजे असे असायचे.

सद्य परिस्थितीत राजकीय विश्लेषण करण्याची भल्याभल्यांची ताकद राहिली नाही.
पण डॉक्टरांची बुद्धी आणि लेखणीची धार जराही बोथट झाली नव्हती.
गांधीभवन चे विश्वस्त झाल्या पासून त्यांनी आपल्या उपक्रमशीलतेने गांधीभवन गजबजून टाकले.
गांधी नावाचा ब्रँड पुन्हा ताजा करण्याचा आटोकाट प्रयत्न डॉक्टरांनी केला, तो बराचसा यशस्वी झाला.
डॉक्टरांचे आमंत्रण आले की मी वेळात वेळ काढून जाणार
आणि
मी अन्नपूर्णा परिवार च्या कोणत्याही कार्यक्रमात बोलावले की डॉक्टर आवर्जून येणार हे नक्की.
उर्मिला दिदी ना सुद्धा माझे आणि माझ्या कार्याचे खूप कौतुक.
आम्ही प्रकाशित केलेल्या, प्रा. आनंद मेणसे लिखित "गांधीजी" या पुस्तिकेची प्रस्तावना डॉ सप्तर्षी यांनी परदेशात मुलाकडे गेलेले असताना लिहून दिली आणि प्रकाशनात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अनिल अवचट ऊर्फ बाबा स्वतः हजर होता.
हा दुग्ध शर्करा योग कायम स्मरणात राहील.

डॉक्टर, तुमची उणीव महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटला वर कायम जाणवेल.
अलविदा !!

डॉ मेधा पुरव सामंत,
अन्नपूर्णा परिवार.

Every step towards Justice is a  step towards a better world. Annapurna Pariwar urges everyone to stand up for Justice, ...
17/07/2026

Every step towards Justice is a step towards a better world.

Annapurna Pariwar urges everyone to stand up for Justice, this International Justice Day..

Address

Suvastu Prestige, Behind R. M. D. Institute, Near Aditya Garden City, Off Service Road, Warje
Pune
411058

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annapurna Pariwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Annapurna Pariwar:

Shortcuts

Share