12/08/2026
🌟 दूरदृष्टीचे वैज्ञानिक, संस्थानिर्माते आणि भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक — डॉ. विक्रम साराभाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🇮🇳🚀
भारतीय विज्ञानाला नवी दिशा देताना डॉ. विक्रम साराभाई यांनी केवळ अवकाश संशोधनाची पायाभरणी केली नाही, तर संशोधन, व्यवस्थापन, शिक्षण आणि विज्ञानप्रसारासाठी सक्षम संस्थांची उभारणी केली.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) उभारणीत त्यांचे नेतृत्व, तसेच Physical Research Laboratory (PRL), IIM अहमदाबाद, CEPT विद्यापीठ आणि Community Science Centre यांसारख्या संस्थांच्या निर्मितीत त्यांचे योगदान भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा भक्कम पाया ठरले.
त्यांची दूरदृष्टी, संस्थानिर्मितीची क्षमता आणि विज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करण्याचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो.
विज्ञानातून स्वावलंबी आणि सक्षम भारत घडविण्याच्या त्यांच्या स्वप्नाला पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली!
विज्ञान भारती, पश्चिम महाराष्ट्र
#विक्रमसाराभाईजयंती
Vijnana Bharati .ioit Vigyan Bharati Vidarbha