ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Pune
  • ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान मराठी शाळा आणि मराठी भाषा यांच्याप्रती बांधिलकी असलेली ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था

09/04/2026

मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व !

ज्यांची मातृभाषा कच्ची असते,
त्यांच्या सर्वच भाषा कच्च्या राहतात!

आपण सर्वजण पाहत आहोत, इराणी मिडिया सांगतोय, अमेरिका इराण युद्धबंदी साठी इराणचे मुद्दे पाकिस्तानने चुकीच्या पद्धतीने मांडले आहेत, याचे कारण स्पष्ट आहे, पाकिस्तानकडे असलेले भाषिक दारिद्र्य.

पाकिस्तानमध्ये लहानपणापासून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवले जाते. ज्यामुळे त्यांना उर्दू जमत नाही, उर्दू न जमल्याने इंग्रजी किंवा इतर भाषांचे आकलनसुद्धा उत्तमरित्या होत नाही.

अजून एक उदा. म्हणजे, क्रिकेटपटू बाबर आझम! बाबर आझम उर्दूमधून सुद्धा धड बोलू शकत नाही आणि असे अनेक पाकिस्तानी खेळाडू आहेत. आपण कायम आपल्या मातृभाषेतून विचार करतो आणि इंग्रजीतून आपले विचार मांडत असतो. मातृभाषेतूनच व्यवस्थित बोलता न आल्यास इंग्रजीची सुद्धा बोंबच असते.

पाकिस्तानचेच उदा. घ्या, वासिम अक्रम, इम्रान खान. हे खेळाडू उत्तम उर्दू, पंजाबी बोलतात आणि इंग्रजीत सुद्धा अतिशय उत्तम व्यक्त होतात.

तुम्हाला परकीय भाषांचे आकलन व्हायचे असेल तर मातृभाषेत निपुण असणे नितांत गरजेचे आहे. असे न केल्यास, कोणत्याच भाषेवर प्रभुत्त्व मिळवता येत नाही, हे आम्ही नाही युनेस्कोने सांगितले आहे.

Admin

24/05/2025

#आजचेकोडे - १

सूर्य नाही, पण उष्णता देतो,
चंद्र नाही, पण प्रकाश देतो.
स्पर्श केला तर जळताल,
पण स्वतः कधीच जळत नाही.
सांगा पाहू, कोण आहे हा?

प्रत्येकाने आपल्या पहिल्या शाळेचे आणि पहिल्या शिक्षकांचे नाव सांगा. #आठवणीतली_शाळा_आणि_शिक्षक
24/05/2025

प्रत्येकाने आपल्या पहिल्या शाळेचे आणि पहिल्या शिक्षकांचे नाव सांगा.

#आठवणीतली_शाळा_आणि_शिक्षक

27/02/2025

|| मराठी भाषा गौरव दिन ||

सर्व मराठी जनांना, हार्दिक शुभेच्छा.

आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐

मित्रांनो नमस्कार,दरवर्षीप्रमाणे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे २०२४दिवाळी ई विशेषांक आज प्रसिद्ध होत आहे.मराठी भाषेला ...
31/10/2024

मित्रांनो नमस्कार,

दरवर्षीप्रमाणे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे २०२४
दिवाळी ई विशेषांक आज प्रसिद्ध होत आहे.

मराठी भाषेला अर्थात आपल्या माय मराठीला नुकताच अभिजात दर्जा मिळालेला आहे याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन! परंतु केवळ एवढ्यावर थांबायचे नसून, अभिजात भाषेला अजून समृद्ध करण्यासाठी आपल्याला भाषेच्या विविध पैलूंवर अविरतपणे काम करून, विविध विषयात अधिकाधिक दर्जेदार भर घालायची आहे.

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने कायमच मराठी भाषेला अभिजात तसेच ज्ञानभाषा मानून, मराठी शाळांसाठी कार्य केलेले आहे हे वेगळे नमूद करण्याची गरज नाही.

या वर्षीच्या ई-दिवाळी अंकाचा विषय आहे ' कथा ' आणि नेहमीप्रमाणे अंकात सुप्रसिद्ध कथालेखक, नवोदित लेखक व तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य भाषाप्रेमींच्या लिखाणाला प्रसिद्धी देण्यात आलेली आहे.

आपण नक्की वाचा आणि आमच्या ईमेल आयडीवर आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवा. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट बघत आहोत.

अंक डाउनलोड करायची लिंक - https://drive.google.com/file/d/1gbeKClXqLTk7Hi9OmULEspbqjaZfv44x/view?usp=drivesdk

Email - [email protected]

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#दिवाळी_अंक

17/09/2024

ई- दिवाळी अंक- लेखन साहित्य आवाहन

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार यासाठी कटिबद्ध असणारी संस्था आहे. संस्थेमार्फत मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. संस्थेमार्फत दरवर्षी प्रकाशित होणारा ई- दिवाळी अंक हा याच उपक्रमाचा एक भाग आहे.

यंदाचा ई-दिवाळी अंक कथा विशेषांक असेल.

अंकासाठी इच्छुकांनी आपले कथा साहित्य 30 सप्टेंबर पूर्वी आमच्याकडे पाठवावे, ही विनंती.

विशेष टीप
१) कथा स्वलिखित व अप्रकाशित असाव्यात.
२) या कथांसाठी विषयाचे बंधन नाही. तुम्ही बोली, प्रमाणभाषा वापरू शकता.
२) अंकासाठी कथांची निवड करण्याचा अधिकार संपादक मंडळाकडे असेल.
३) सर्व वयोगटातील लेखक/ लेखिका आपल्या कथा पाठवू शकता.
४) सर्व साहित्य word मध्ये युनिकोड स्वरूपात पाठवावे.

लेख पाठवण्याची अंतिम तारीख- दिनांक ३० सप्टेंबर २०२३.

आपले लेख कृपया पुढील क्रमांकावर पाठवावेत

मृणाल पाटोळे- 7506919816

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#संपादकमंडळ

Address

Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान:

Share