Maharashtra Sahitya Parishad, Pune

Maharashtra Sahitya Parishad, Pune मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसार करणारी संस्था.

मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. त्या दृष्टीने म.सा.प.ही ज्येष्ठ आणि प्रातिनिधिक साहित्य संस्था आहे. १९०६ साली पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात या संस्थेची स्थापना झाली. त्या पूर्वी साहित्य प्रसाराचे काम सार्वजनिक ग्रंथालयांमार्ङ्गत चालत असे. एकोणिसाव्या शतकाच्या दुसर्यात दशकात

आपल्या येथे इंग्रजी राजवट सुरु झाली आणि विविध ज्ञान शाखांची ओळख आपल्याला झाली. मुद्रण कला, आधुनिक शिक्षण, विद्यापीठे, रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, छापखाने, वृत्तपत्रे, ग्रंथ छपाई इ. नवीन उपक्रमांची ओळख जनतेला झाली. नव शिक्षितांची पिढी नव्या जोमाने तयार झाली. मुंबईचे बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, दादोबा पांडुरंग, विष्णुबुवा ब्रह्मचारी इ.विद्वान आणि पुण्यातील लोकहितवादी, महात्मा फुले, चिपळूणकर पितापुत्र, न्यायमूर्ती रानडे, टिळक, आगरकर अशांसारखे समाजधुरीण नव विचार घेऊन पुढे आले. मराठी ग्रंथ प्रसाराच्यादृष्टीने मोलाचे काम गोपाळ हरी देशमुख आणि न्या.महादेव गोविंद रानडे यांनी निष्ठेने केले. लोकहितवादींनी पूना नेटिव जनरल लायब्ररी (सध्याचे लक्ष्मी रोड वरचे पुणे नगर वाचन मंदिर) ची स्थापना १८४८ साली केली. त्यापूर्वी अहमदनगरला मिशनर्यांानी महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय सुरू केले होते. मुंबई, नाशिक, रत्नागिरी, ठाणे इथेही एकोणिसाव्या शतकात ग्रंथालये सुरू झाली होती. छापखान्याची कला माहीत झाल्याने पुस्तकेही प्रकाशित होऊ लागली. त्यांपैकी ठळक पुस्तके सांगायची झाल्यास, यमुना पर्यटन बाबा पदमनजी (१८६३), ल.मो.हळबे कृत मुक्तामाला (१८६१), मोरोबा कान्होबा कृत घाशिराम कोतवाल (१८६३) गो.ना.माडगावकर कृत मुंबईचे वर्णन (१८६३) अशी सांगावी लागतील.

Address

Tilak Road
Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 12pm
4:30pm - 8pm
Tuesday 9am - 12pm
4:30pm - 8pm
Wednesday 9am - 12pm
4:30pm - 8pm
Thursday 9am - 12pm
4:30pm - 8pm
Friday 9am - 12pm
4:30pm - 8pm
Saturday 9am - 12pm
4:30pm - 8pm

Telephone

020-24475963

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Sahitya Parishad, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Sahitya Parishad, Pune:

Share