Udaan Foundation

Call Directions Website Contact the organization

Udaan Foundation Hands with Udaan Foundation: Make a Difference Today! Together, we can create a brighter future for India’s most vulnerable population.

Every contribution, no matter how small, brings hope, joy, and a better quality of life to those who need it most.

Care that adapts to your needs.we understand that every person requires a different kind of support. That’s why our care...
27/06/2026

Care that adapts to your needs.
we understand that every person requires a different kind of support. That’s why our caregivers are matched to each client based on their routines, preferences, and level of care needed.

Whether it’s post-surgery care, mobility help, or daily living assistance, we bring healthcare home—with a personal touch.

Now serving Pune with quick caregiver placements.

Looking for a safe, peaceful, and caring home for your loved ones? 🌿Welcome to Adharwad Old Age Home, Poyanje, Panvel - ...
16/06/2026

Looking for a safe, peaceful, and caring home for your loved ones? 🌿

Welcome to Adharwad Old Age Home, Poyanje, Panvel - where seniors enjoy comfort, dignity, companionship, and the beauty of nature every day.

🏡 Comfortable Accommodation
🍲 Nutritious Satvik Meals
❄️ Air-Conditioned Rooms
👨‍⚕️ 24×7 Care & Support
🧘 Yoga & Wellness Activities
🎵 Musical & Recreational Programs
🏥 Emergency Medical Assistance

💚 Surrounded by lush greenery, fresh air, and peaceful mountains, Adharwad offers a truly homely environment for senior citizens.

💰 Starting at Just ₹500 Per Day Per Person (All Inclusive)*

📞 Call Now to Enquire & Book a Visit

Give your loved ones the comfort, care, respect, and happiness they deserve.



Panvel NaviMumbai Poyanje SeniorLiving AssistedLiving ElderlyCare CareForSeniors HealthyAging RetirementLife SeniorCitizens OldAgeCare CareWithDignity NatureLiving PeacefulLiving NaviMumbaiCare Maharashtra SeniorWellness HomeAwayFromHome CaregiverSupport ElderSupport OldAgeHomeIndia SeniorCommunity RetirementInNature HealthcareForSeniors InstagramIndia

📍 Pune | 📞 Call Today for Admissions & Enquiries.@

16/06/2026
16/06/2026
01/05/2026

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ||
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ||

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


कोरोनाचा तो भयानक काळ. संपूर्ण जग जवळपास थांबले होते. प्रत्येकाच्या मनात या अनोळखी व्हायरस बद्दल भीती काठोकाठ भरलेली होत...
08/03/2026

कोरोनाचा तो भयानक काळ. संपूर्ण जग जवळपास थांबले होते. प्रत्येकाच्या मनात या अनोळखी व्हायरस बद्दल भीती काठोकाठ भरलेली होती. खरंतर धोक्यापेक्षा भीतीचा संसर्ग वेगाने फैलावत होता. त्याला कारणही तसेच होते कारण हा विषाणू जगासाठीच अनोळखी होता. विज्ञान व उपचराबाबत वैद्यकीय क्षेत्रही अनभिज्ञ होते. पुण्यात तर त्याची धग तीव्रतेने जाणवत होती. त्यावेळी शासनाने ससून रुग्णालयाची नवी कोरी बांधलेली ११ मजली इमारत समर्पित कोविड सेंटर म्हणून घोषित केली. ही इमारत सुरू करण्यात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांचा सिंहाचा वाटा होता. रुग्ण तर पटापट दाखल होऊ लागले. पण, त्यांची शुश्रूषा करण्यासाठी तीनही पाळ्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी असे मिळून जवळपास 1300 अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. मग शासनाने कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ घेण्याचे ठरवले. मात्र भीतीच इतकी की जे आधीपासून रुग्णसेवेत होते तेच जिवाच्या भीतीने सोडून जात असताना आता इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उभे करायचे कसे हा प्रश्न शासन व पुरवठादार यांच्या समोर होता. परंतू हे आव्हान पेलण्यासाठी एक महिलाच समोर आली आणि त्या म्हणजे उद्योजिका भाग्यश्री ठाकूर!

एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वृद्धाश्रम चालवणाऱ्या गावाकडुन रोजगाराच्या शोधात आलेल्या मुलांना पुण्यातील कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्याची कन्सल्टन्सी चालवत असलेल्या ठाकूर यांना खरंतर याआधी शासकीय कंत्राट घेण्याचा कोणतही अनुभव गाठीशी नव्हता. मात्र होती ती केवळ प्रचंड इच्छाशक्ती ती आव्हाने पेलण्याची अन समोर आलेल्या संकटांना भिडून, अविरतपणे कष्ट करून हाती घेतलेले काम फत्ते करण्याची. त्यांना ससूनला मनुष्यबळ पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले कारण मोठमोठ्या मनुष्यबळ पुरवठादारांनी पाठ फिरवली होती. आता प्रश्न होता मनुष्यबळ उभे करण्याचा. जाहिरातीवर जाहिराती दिल्या कोणी तयार होत नव्हते. मग सध्या आहे त्या पगारापेक्षा दुप्पट पगार, राहणे खाणे फ्री अशी (त्यावेळी शासन पुरवत होते) अशी जाहिरात दिली तेव्हा कोठे लोक येऊ लागले. परंतु त्यांच्यामध्येही भीती होती. अनेकजण कामावर जॉईन होऊनही सोडून जात. त्यावेळी ठाकूर यांनी त्यांच्यामध्ये 'तुम्ही जे काम करताय ते उदात्त हेतू असलेले व सेवेचे आहे' अशी प्रेरणा या कोविड योद्ध्यांमध्ये चेतविली. स्वतः कोविड पेशंट मध्ये फिरून विश्वास दिला. मग, हे परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यांनाही धीर आला अन अखेर ज्या कोविड रुग्णाकडे घरच्यांनीही पाठ फिरवली होती त्यांच्या सेवेसाठी ही फौज अखेर तयार झाली. पुढे या ससूनच्या माध्यमातून गंभीर सहा हजार रुग्णांची सेवा घडली. या सर्व अनुभवातूनच एक भावी उद्योजिका आकार घेत होती.

"तो काळ खरच खूप आव्हानात्मक व कसोटी पाहणारा होता" भाग्यश्री ठाकूर सांगतात. "शासकीय कंत्राट भरायला लागणारी अनामत रक्कम देखील नव्हती. कोणताही अनुभव नसताना दुसऱ्याकडून पैसे ऍडजस्ट करून यामध्ये उतरलो आणि त्यातून खूप काही शिकायला मिळाले. त्या पहिल्या अनुभवाच्या जोरावरच आज इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला" त्या सांगतात.

आज भाग्यश्री ठाकूर या 'करिअरझोन एल एल पी' च्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार पुरवत आहेत. ससून नंतर महावितरण सारख्या शासकीय संस्थापासून विविध खासगी कंपन्यांमध्ये त्यांचे मनुष्यबळ आहे. सोबत उडान फाउंडेशन च्या माध्यमातून वृद्धाश्रम देखील चालवतात. त्यामध्ये निराधार लोकांना स्वखर्चाने सांभाळतात. "त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला काही कमी पडत नाही" अशी त्यांची भावना.

खरे तर यशाच्या शिखरावर पोचल्यावर अनेकांमध्ये एक attitude येतो. नकळत मोठेपणाचा साज अंगावर चढतो. प्रोफेशनालिझम अदृश्य ओझे सांभाळत त्यांचे नैसर्गिक जीवन दबले जाते. पण ठाकूर त्याला अपवाद आहेत. कोणताही बडेजाव न आणता त्या सहज व मनमोकळ्यापणे संवाद साधतात. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट. पत्रकारितेच्या निमित्ताने झालेली ओळख व सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्या कायम संपर्कात असतात.

आज जागतिक महिला दिन. खरे तर महिलांचा दिन. महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. मात्र आज खरी गरज आहे ती हाताला काम देणाऱ्यांची. त्यामध्ये अनेक संकटांवर मात करत महिला पुढे जात आहे हे चित्र आशादायी आहे. उद्योजकतेचा कोणताही वारसा नसताना भाग्यश्री ठाकूर यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. सर्व महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...

नमस्कार, *‘उडान – द लीप ऑफ ड्रीम्स फाउंडेशन’* ने ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सुविधांनी युक्त निवासस्थान सुरू केले आहे. येथ...
22/02/2026

नमस्कार,

*‘उडान – द लीप ऑफ ड्रीम्स फाउंडेशन’* ने ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सुविधांनी युक्त निवासस्थान सुरू केले आहे. येथे ज्येष्ठांची यथोचित काळजी घेतली जाते. त्याचबरोबर त्यांना आरामदायी सुविधा, सन्मानपूर्वक वागणूक आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणारे पूरक वातावरण देखील आहे.

ज्यांना आमच्या सेवांचा लाभ होऊ शकतो असे कोणी ज्येष्ठ नागरिक असल्यास किंवा आमच्या या उदात्त उपक्रमाला आपण कुठल्याही प्रकारे सपोर्ट करू इच्छित असल्यास कृपया ही माहिती आपल्या संपर्कातील वर्तुळामध्ये शेअर करा. आपला पाठिंबा आणि आपला संदर्भ आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. धन्यवाद.

*उपलब्ध सेवा- सुविधा 😗

-ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्धांची योग्य देखभाल
- शस्त्रक्रियापश्चात वैद्यकीय सेवा
- डिमेन्शिया, अल्झायमर व पार्किन्सन असलेल्या रुग्णांसाठी सुविधा
- नर्सेस व आयसीयू नर्सिंग सेवा
- 'एनआरआय' च्या पालकांसाठी देखभाल व सेवा
- फिजिओथेरपिस्ट, डॉक्टरांची घरपोच सुविधा
- वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, पॅलिएटिव्ह व अतिदक्षता सेवा केंद्र
- अंथरूणावर खिळलेल्या व अतिदक्षता रुग्णांसाठी सुविधा
- शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन सेवा केंद्र

*पत्ता:*
प्लॉट क्रमांक 41, निरोलॅक पेंट गोडाऊन समोर, समर्थ मिसळ शेजारी, भुकूम, चांदणी चौकपासून 10 मिनिटांच्या अंतरावर.
संपर्क क्रमांक: +91 86258 84595

नमस्कार,*‘उडान – द लीप ऑफ ड्रीम्स फाउंडेशन’* तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे निवासस्थान सुरू...
21/02/2026

नमस्कार,

*‘उडान – द लीप ऑफ ड्रीम्स फाउंडेशन’* तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे निवासस्थान सुरू करण्यात आले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येक ज्येष्ठाला प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान मिळावा, या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. येथे ज्येष्ठांची मनापासून काळजी घेतली जाते तसेच त्यांना सुरक्षित, आरामदायी आणि आनंदी वातावरण उपलब्ध करून दिले जाते. वैद्यकीय देखरेख, पौष्टिक आहार, स्वच्छता आणि मानसिक आधार यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

आपल्या परिचयातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला या सेवांचा लाभ होऊ शकतो असे वाटत असल्यास, किंवा आमच्या या सामाजिक आणि उदात्त उपक्रमाला आपण कोणत्याही स्वरूपात सहकार्य करू इच्छित असल्यास, कृपया ही माहिती आपल्या संपर्कातील व्यक्तींमध्ये जरूर शेअर करा. आपला प्रत्येक पाठिंबा आणि प्रत्येक संदर्भ आमच्यासाठी अनमोल आहे.

धन्यवाद.

पत्ता: प्लॉट क्रमांक 41, निरोलॅक पेंट गोडाऊन समोर, समर्थ मिसळ शेजारी, भुकूम, चांदणी चौकपासून 10 मिनिटांच्या अंतरावर.
संपर्क क्रमांक: +91 86258 84595

Address

Office No. 47, Bhosle Shinde Arcade, Deccan Gymkhana, India
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udaan Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Udaan Foundation:

Shortcuts

Share