Suhrud - Shridhar Vasudeo Samak Memorial Foundation

  • Home
  • India
  • Pune
  • Suhrud - Shridhar Vasudeo Samak Memorial Foundation

Suhrud - Shridhar Vasudeo Samak Memorial Foundation We aim to support the underprivileged, to be self-dependent in all sense.

‘किमयागार २०२६’ छायाचित्रण स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ - गौरव सर्जनशीलतेचा‘किमयागार २०२६’ या छायाचित्रण स्पर्धेचा पार...
20/06/2026

‘किमयागार २०२६’ छायाचित्रण स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ - गौरव सर्जनशीलतेचा

‘किमयागार २०२६’ या छायाचित्रण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. १३ जून २०२६ रोजी पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात स्पर्धक, मान्यवर अतिथी आणि कलाप्रेमींनी एकत्र येऊन सहभागी स्पर्धक छायाचित्रकारांपैकी कुशल छायाचित्रकारांचा व त्यांच्या कलाकृतींचा गौरव केला. ‘किमायागार २०२६’ या स्पर्धेसाठी यंदाचा विषय ‘आपली माती आपली माणसं (Unexplored Bharat)’ असा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेला छायाचित्रकारांकडून मोठ्या संख्येने प्रवेशिका (entries) प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये एकाच विषयावरील विविध दृष्टिकोन छायाचित्रांमध्ये दिसून आले. स्पर्धेचे परीक्षण मा. श्री. सौमित्र इनामदार आणि मा. श्री. अभय कानविंदे यांनी केले.

कार्यक्रमात प्रथम परीक्षकांतर्फे श्री. सौमित्र इनामदार यांनी आपले मनोगत मांडले आणि स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या सोहळ्याला प्रसिद्ध छायाचित्रकार आणि अभ्यासक श्री. मिलिंद ढेरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. त्यांनी विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान केली. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि स्पर्धेत सहभागी होता असताना देखील कोणाशीतरी किंवा स्वतःशी सुद्धा स्पर्धा करण्यापलीकडे आपलं काम हेच आपलं लक्ष्य असलं पाहिजे, असे आवाहन केले. आपल्या कामातल्या आनंदाबरोबर त्यातल्या तांत्रिकअचूकतेचे भान राखले पाहिजे. कोणतीही कलासाधना ही सोपी नाही आणि त्यासाठी सजग परिश्रमाला पर्याय नाही, असे सांगत त्यांनी स्पर्धकांना विविध स्पर्धांमध्ये सातत्याने भाग घेत राहण्याचा सल्ला दिला. तसेच, ‘किमयागार २०२६’ या छायाचित्रण स्पर्धेच्या आयोजनासाठी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर येथील “शरद पाटील” यांना ‘श्रीधर वासुदेव सामक स्मृती – किमयागार २०२६’ या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले.

द्वितीय क्रमांकाचे ‘वासुदेव केशव सामक स्मृती पारितोषिक’ राहुल बुलबुले यांना
आणि

तृतीय क्रमांकाचे ‘लक्ष्मी वासुदेव सामक स्मृती पारितोषिक’ ऐश्वर्या खामकर यांना प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र, रोख पारितोषिक आणि विजेत्या छायाचित्राची फ्रेम असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

तसेच, ‘विशेष उल्लेखनीय छायाचित्र’ या श्रेणी अंतर्गत ज्येष्ठ छायाचित्रकार कुमार गोखले स्मृती पारितोषिक आणि ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे स्मृती पारितोषिक अनुक्रमे अनुप कुलकर्णी आणि ऋग्वेद सोमण यांना देण्यात आले.

सुहृद आयोजित किमयागार २०२६पारितोषिक वितरण समारंभ अवश्य भेटूया!
11/06/2026

सुहृद आयोजित

किमयागार २०२६

पारितोषिक वितरण समारंभ

अवश्य भेटूया!

Suhrud - Shridhar Vasudeo Samak memorial foundation आयोजित किमयागार २०२६ (फोटोग्राफी competition)We are extending our la...
09/04/2026

Suhrud - Shridhar Vasudeo Samak memorial foundation आयोजित
किमयागार २०२६ (फोटोग्राफी competition)

We are extending our last date for registration and submission of photos.
Now last date of registration and submission is 9 May 2026.

If you have not already registered, hurry up and register yourself to showcase your talent!!

Follow the link for registration
https://forms.gle/AoietcZEb4uAsUp56

22/03/2026

कोणतीही स्पर्धा हे एक उत्तम निमित्त असतं... आपल्या कल्पना मांडून पाहण्यासाठीचं...

असंच आणखी एक निमित्त.... म्हणजे ही छायाचित्रण स्पर्धा....
सोबत सगळा तपशील जोडला आहे.

नक्की सहभागी व्हा!

आणि आपल्या परिचयातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत या स्पर्धेविषयीची माहिती अवश्य पोहोचवा!



"कसला भारी फोटो काढलाय! कुठला कॅमेरा वापरता तुम्ही?"

हे असं वाक्य बऱ्याच वेळेला कानावर पडतं. असा प्रश्न लोक अगदी सहजपणे विचारताना दिसतात. आणि या निरागस प्रश्नावर काय उत्तर द्यायचं असा विचार करून फोटोग्राफर फक्त छानपणे हसतात.

तर नुसताच कॅमेरा चांगला असून भागत नाही, फोटोग्राफरचं कौशल्य, संवेदनशीलता आणि दृष्टिकोन या सगळ्याच्या तरल मिलापाचं उत्तर म्हणजे चांगलं छायाचित्र असतं.

Photography is the story I fail to put into words. - DESTIN SPARKS

आपल्या नजरेतून पाहिलेली कथा सांगण्याची आणखी एक संधी...

'सुहृद' आयोजित

किमयागार २०२६
छायाचित्रण स्पर्धा...

संपूर्ण नियमावली, स्पर्धेचा विषय आणि प्रवेश अर्जासाठी सोबतच्या पोस्टरमध्ये दिलेला तपशील कृपया पहावा.

किंवा

खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.
https://forms.gle/AoietcZEb4uAsUp56

(Link is in Bio as well)

धन्यवाद!

"कसला भारी फोटो काढलाय! कुठला कॅमेरा वापरता तुम्ही?"हे असं वाक्य बऱ्याच वेळेला कानावर पडतं. असा प्रश्न लोक अगदी सहजपणे व...
20/03/2026

"कसला भारी फोटो काढलाय! कुठला कॅमेरा वापरता तुम्ही?"

हे असं वाक्य बऱ्याच वेळेला कानावर पडतं. असा प्रश्न लोक अगदी सहजपणे विचारताना दिसतात. आणि या निरागस प्रश्नावर काय उत्तर द्यायचं असा विचार करून फोटोग्राफर फक्त छानपणे हसतात.

तर नुसताच कॅमेरा चांगला असून भागत नाही, फोटोग्राफरचं कौशल्य, संवेदनशीलता आणि दृष्टिकोन या सगळ्याच्या तरल मिलापाचं उत्तर म्हणजे चांगलं छायाचित्र असतं.

Photography is the story I fail to put into words. - DESTIN SPARKS

आपल्या नजरेतून पाहिलेली कथा सांगण्याची आणखी एक संधी...

'सुहृद' आयोजित

किमयागार २०२६
छायाचित्रण स्पर्धा...

संपूर्ण नियमावली, स्पर्धेचा विषय आणि प्रवेश अर्जासाठी सोबतच्या पोस्टरमध्ये दिलेला तपशील कृपया पहावा.

किंवा

खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.
https://forms.gle/AoietcZEb4uAsUp56

(Link is in Bio as well)

धन्यवाद!

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919322203720

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhrud - Shridhar Vasudeo Samak Memorial Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share