15/12/2023
नमस्कार,
आपल्या स्नेहांकुर द रे ऑफ होप संस्थेतर्फे आज आपण बारी मधील शाळेला भेट दिली तसेच भोर मधील एका शाळेला एक संगणक भेट दिला . त्या शाळेत अजूनपर्यंत संगणक नव्हता. त्यामुळे मुलांना ह्याचा खूपच फायदा होईल असे सरांनी सांगितले तसेच संगणक काळाची गरज असल्याने मुलांना आजच्या काळाबरोबर चालणे सोपे जाईल असे ही मत व्यक्त केले.
तसेच भोर मधीलच एका गुरुकुलास एक लॅपटॉप भेट दिला.
व मोठ्या शाळेस 10 च्या विद्यर्थ्यांना 21 अपेक्षित चे संच दिले. 21 अपेक्षित ची विचारणा त्या शाळेतील सरांनी केली होती आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे सेट आपण दिले
उत्तम स्थितीतील संगणक व लॅपटॉप आपल्याला आपल्या हितचिंतकांनी मुलांना शाळेला भेट देण्यासाठी म्हणून दिले होते.
खरोखर गरज आहे तिथेच ह्या वस्तू पोचल्या व पुन्हा एकदा मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
खरेतर आजचा दिवस परीक्षा पहाणारा ठरला , सकाळी टोल सोडल्यावर गाडीचा प्रॉब्लेम झाला व बहुतेक आता पुन्हा माघारी फिरावे लागेल असे वाटले. पण खरोखर ईश्वर इच्छा बलीयसी , म्हणतात ते खरच आहे, शनिवार असल्याने शाळा सकाळी असतात त्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो. एवढ्या सकाळी मेकॅनिक उपलब्ध होऊन त्याने प्रॉब्लेम वेळीच सॉल्व्ह करून दिला. व आज आम्ही थोडेसे उशिरा का होईना पण साहित्य पोच करू शकलो. परमेश्वराचे खूप खूप आभार।।।
उपक्रमास ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली अश्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ।।
पुन्हा एकदा प्रचिती आली आपण फक्त निमित्तमात्र सगळे तो घडवतो.
अभिजीत जयप्रकाश दातार
संस्थापक सचिव
स्नेहांकुर द रे ऑफ होप