Shree Sant Seva Sangha

Shree Sant Seva Sangha Arvindnath maharaj this is our ideal Dnyanparampara-Guruparampara."

Shree Sant Seva Sangha propagates the divine thoughts and ideas of saints among the people in the society with a pure objective of moulding their lives according to the divine principles from Shreemad Bhagwadgeeta and Shree Dnyaneshwari. order to carry the essence of bhartiya culture, Geeta, Dnyaneshwari, shivacharitra, among every individual in society, Shree Sant Seva Sangh implements different

projects like:
----------------------------------------------------------
• Grantharaj Shree Dnyaneshwari Pathyakram (first scholastic activity in Maharashtra)
• Free Residential Enlightenment Camps
• Aatmadnyan (A series of spiritual painting... An innovative medium, attracting the youth)
• Weekly Contemplation Classes (Chintan Varga)
• Grantharaj Shree Dnyaneshwari Aadhyatmik Sadhana Kendra
• Pravachan Seva
• spiritual music Cds/Cassetes
• Sadhana Dindi: Punyabhoomi Bharat Darshan
• Publication of a magazine after every four months
• Free Medical Camps for “Varkaris”
• Savyasachi gurukulam- training centre of indian martial arts
• Vagyadnya kulam- sankrut dnyanpeeth
• Giridhar Goshala
• Shamyapras Gurukul
• Anahat audio recording studio
• Jeevandarshan vyaspeeth
• Bhagavat srushti
The projects are implemented across different areas across of Bharat
--------------------------------------------------------------
"Lord Shree Krishna, Prabhu ShreeRamchandra, Maharshi Ved Vyas, Jagadguru Shreemad Adi Shankaracharya, Vishwaguru Shree Gorakshanath Maharaj , Sant shree Dnyaneshwar Maharaj, Jagadguru shree Tukaram maharaj, Chhatrapati shree Shivaji maharaj, p.poo.

*🚩🚩🚩श्री संत सेवा संघ*🚩🚩🚩🚩*ll  श्रावणमास सेवा* ll*ऐसी गर्जवू हे वैखरी  l केशवा मुकुंदा मुरारी* ll*श्री गजानन महाराज मंदि...
17/08/2026

*🚩🚩🚩श्री संत सेवा संघ*🚩🚩🚩🚩

*ll श्रावणमास सेवा* ll

*ऐसी गर्जवू हे वैखरी l केशवा मुकुंदा मुरारी* ll

*श्री गजानन महाराज मंदिर पिंपरी चिंचवड*

*पुष्प तिसरे*
*कालावधी* - १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२६
*विषय* - ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीतील अर्जुन
*व्याख्यात्या*- प्रतिभाताई घुबे

घरोघरी ज्ञानेश्वरीमुलांना आपण काय देतोय?घर… प्रॉपर्टी… उत्तम शिक्षण… सुख-सुविधा…हे सगळं देताना त्यांच्या मनाला शाश्वत वि...
16/08/2026

घरोघरी ज्ञानेश्वरी

मुलांना आपण काय देतोय?
घर… प्रॉपर्टी… उत्तम शिक्षण… सुख-सुविधा…

हे सगळं देताना त्यांच्या मनाला शाश्वत विचारांचा ठेवा देतोय का?

कारण संपत्ती मिळवता येते, शिक्षण घेता येते;
पण शुद्ध चारित्र्य, संस्कार आणि विवेक घडवावा लागतो.
शुद्ध चारित्र्य हीच खरी संपत्ती!
आपल्या मुलांना भौतिक संपत्तीबरोबर
ज्ञानेश्वरीच्या शाश्वत विचारांचा वारसाही द्या.... आजच संपर्क साधा व संच मागवा.
संपर्क - +91 90960 60917

भारताच्या वैभवाचे दर्शन घडविणारा एक अनुकरणीय उपक्रम! 🇮🇳आज श्री संत सेवा संघातर्फे ‘आत्मज्ञान चित्रमालिके’चे प्रदर्शन एका...
15/08/2026

भारताच्या वैभवाचे दर्शन घडविणारा एक अनुकरणीय उपक्रम! 🇮🇳

आज श्री संत सेवा संघातर्फे ‘आत्मज्ञान चित्रमालिके’चे प्रदर्शन एका अत्यंत सुंदर, प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण कार्यक्रमाचा भाग म्हणून संपन्न झाले.

शिक्षण प्रसारक मंडळी, पवित्र फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात रक्तदान शिबिर, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि सेवाभावी कार्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण कार्यक्रमातून केवळ विविध उपक्रमांचे दर्शन झाले नाही, तर भारतभूमीचे महत्त्व, भारतीय संस्कृतीची समृद्धता, आपली संस्कारपरंपरा, सेवाभाव आणि जीवनाकडे पाहण्याचा भारतीय विचार यांचेही सुंदर दर्शन घडले.
विशेषतः भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून साकारलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ सांगणारा ठरला. राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हे, तर संस्कृती, संस्कार, सेवा, कला, ज्ञान आणि मूल्यांची अखंड परंपरा आहे, याची जाणीव या उपक्रमातून झाली.
या कार्यक्रमामध्ये श्री संत सेवा संघाच्या ‘आत्मज्ञान चित्रमालिके’चे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. भारतीय अध्यात्मातील गहन तत्त्वज्ञान आणि आत्मज्ञानाचे विचार चित्ररूपातून मांडणाऱ्या या चित्रमालिकेला उपस्थितांकडून अतिशय उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेकांनी चित्रांचे बारकाईने अवलोकन करून त्यामागील भारतीय तत्त्वज्ञान आणि विचार जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली.
सेवा, शिक्षण, संस्कार, कला, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा असा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
आज भारत आपल्या अमृतमय सांस्कृतिक वारशासह जगासमोर उभा आहे. हा वारसा केवळ सांगितला न जाता कृतीतून, उपक्रमातून आणि समाजजीवनातून सर्वदूर प्रकट झाला पाहिजे. त्या दृष्टीने हा कार्यक्रम एक आदर्श आणि अनुकरणीय उदाहरण ठरतो.
भारताचे हे वैभव, ही संस्कृती, हे संस्कार आणि हा जीवनविचार देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचविणाऱ्या अशा उपक्रमांची आज नितांत आवश्यकता आहे.
या सुंदर आणि अर्थपूर्ण आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे, पवित्रम् फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे या तिन्ही संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक कौतुक!
अशा उपक्रमांतून भारताचे सांस्कृतिक वैभव अधिकाधिक उजळत राहो आणि ‘संस्कारित, समर्थ व समृद्ध भारत’ घडविण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळो, हीच सदिच्छा! 🇮🇳🌿

*१५ ऑगस्ट २०२६*🇮🇳 *भारतीय स्वतंत्रता दिवस**हम करें राष्ट्र-आराधन, हम *करें राष्ट्र-आराधन,**तन से, मन से, धन से, *तन-मन-ध...
15/08/2026

*१५ ऑगस्ट २०२६*
🇮🇳 *भारतीय स्वतंत्रता दिवस*

*हम करें राष्ट्र-आराधन, हम *करें राष्ट्र-आराधन,*
*तन से, मन से, धन से, *तन-मन-धन जीवन से*
*हम करें राष्ट्र आराधन ।।*

सहस्रावधी वर्षांपासून संपूर्ण विश्वाला *वसुधैव कुटुम्बकम् l* च्या मायेने सांभाळणारी आपली मातृभूमी - भारतमाता!

जी, केवळ एक भूखंड नसून ही प्राचीन आध्यात्मिक परंपरेचे वहन करणारी नित्य प्रेरणा आहे. जिच्या, सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने वेदांत आणि पाश्चिमात्य विज्ञान यांचा समन्वय साधून , श्रद्धा आणि आत्मविश्वास अंतःकरणात बाळगून, स्वतंत्र बुद्धीने आपल्या प्राचीन ज्ञानशाखांचा अभ्यास करण्याची व ते आदर्श जीवनात उतरविण्याची अपेक्षा आहे.

*माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्याः।* अशी पुत्रसुलभ भावना जिच्यामुळे सहजच उत्पन्न होते आणि जी आपल्या प्रत्येक पुत्राला कठोर कर्तव्याचरणाची सतत प्रेरणा देत असते, ती आपली मातृभूमी - आपली भारतमाता!

ज्यांची जीवनचरित्रे अखिल विश्वाला सर्वकाळ ललामभूत ठरतील, असे अनेकानेक विप्र - संत - ऋषी - मुनी - जपी - तपी - योगी - वीर - सम्राट - योद्धे - क्रांतिकारक - शास्त्रज्ञ - तत्त्वज्ञ - राजनीतिज्ञ - संशोधक - कलावंत - महापुरुषांची जन्मभूमी - कर्मभूमी - मातृभूमी - आपली भारतमाता!

*सत्यं परं धीमहि ।* याच दृष्टीने सृष्टीतील परमसत्याच्या मार्गाने जाताना मनुष्यात देवत्व पाहाणाऱ्या सकल कल्याणकारी उत्तर मीमांसकांपासून ते अगदी स्वतःच्या देहालाच सर्वस्व मानणाऱ्या चार्वाकवाद्यांच्या मतालादेखील *दर्शनाचे* स्थान देणारी - प्रत्येकाचे - आपली उपासना पद्धती, जीवन रीत निवडण्याचे व त्यानुसार आचरण करण्याचे स्वाभाविक स्वातंत्र्य अबाधित राखणारी समस्त पृथ्वीवरील एकमेवाद्वितीय दिव्यभूमी - आपली भारतमाता!

आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य निरंतर अबाधित, सार्वभौम राखण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येक हुतात्म्याचे आठवणीने पुण्यस्मरण करत, सदैव कर्तव्यरत राहाण्याचा संकल्प करत, स्वतः रोज ' नव्याने ' विकसित होऊन यथा शक्ती आपली वेळ - तन - मन - धन - जीवन देऊन राष्ट्र कार्यात समर्पित होऊया.

ध्येयनिष्ठ , धैर्यवान , प्रज्ञावान होऊन अंतःप्रेरणेने, खऱ्या देशप्रेमाने *धन्य: अस्मि भारतत्वेन ।* याचे भान राखत स्वातंत्र्यदिन साजरा करूयात...

७९वा भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..!!

*आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा..!!*🇮🇳

श्रावण मास प्रवचनेऐसी गर्जवू हे वैखरी । केशवा मुकुंदा मुरारी ।।श्री संत सेवा संघ
13/08/2026

श्रावण मास प्रवचने
ऐसी गर्जवू हे वैखरी । केशवा मुकुंदा मुरारी ।।
श्री संत सेवा संघ

१३ ऑगस्ट २०२६ - 🚩 *शिवयोगिनी, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी*🙏🏻🌹छत्रपती श्रशिवाजी महाराजांना आदर्...
13/08/2026

१३ ऑगस्ट २०२६ - 🚩 *शिवयोगिनी, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी*🙏🏻🌹

छत्रपती श्रशिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांची 'सुराज्य' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्यभर झटलेल्या आणि त्यामुळे इतिहासात छत्रपती महाराजांप्रमाणेच नित्य स्मरणीय ठरलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर.

पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा प्रचलित असतानाही ईश्वरीय अधिष्ठानाच्या प्रेरणेने त्यांनी अतिशय प्रजाहितदक्षतेने राज्यकारभार केला. त्यांनी केलेली अनेकानेक लोककल्याणकारी कामे आजही त्यांच्या या प्रजाहितदक्षत्वाचीच साक्ष देत आहेत.

'उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः l' या न्यायाने आपल्या कार्याचा आवाका त्यांनी संपूर्ण भारतभर पसरवत नेला आणि सर्वत्र आपल्या न्यायी आणि धर्मपरायण अशा चारित्र्याचा ठसा उमटवला.

आपण आज ज्यांचा अभिमान बाळगतो आहोत, अशा अनेक तीर्थक्षेत्रांच्या पुनर्निर्माणाचे महत्कार्य त्यांनी केले. काशी विश्वनाथाच्या मंदिरासह १२ ज्योतिर्लिंग मंदिरे, सप्तपुरी, चार धाम, विष्णुपद मंदिर (बिहार), उज्जैन, कांचीपुरम्, मथुरा, अयोध्या, हरिद्वार, वाराणसी, चौंडी, इंदोर, महेश्वर, नाशिक, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर येथील मंदिरे व घाट, यांसह इतर अनेक प्राचीन मंदिरे व घाट यांचे पुनरुज्जीवन तर त्यांनी केलेच, शिवाय त्यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था लावून देऊन जणू आजच्या व येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठीचा वारसा जतन करून ठेवला. त्यांचे अनंत उपकार आपल्या व येणाऱ्या पिढ्यांवर नेहमीच राहतील..

अशा कणखर आणि संयमी अशा कर्तव्यदक्ष भारतीय नारीचे सच्चे प्रतीक - कुशल प्रशासक, वीरांगना, शेकडो मंदिरे, धर्मशाळा आणि जनकल्याणकारी रचना निर्माण करणाऱ्या शिवयोगिनी, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

09/08/2026

श्रुती स्मृतींचे अर्थ । आपण होऊनिया मूर्त । अनुष्ठाने जगा देत.....

काल दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी *महर्षि डॉ मो.स. गोसावी सर* यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती...
08/08/2026

काल दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी *महर्षि डॉ मो.स. गोसावी सर* यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान,नाशिक द्वारा आयोजित स्मृतीव्याख्यानासाठी पू.श्रीसंजयगुरुजींना *"विश्व स्वधर्म"* याविषयावर व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुण्याच्या फल ज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पं. विजय जकातदार यांच्या ज्योतिर्विज्ञान संशोधन खंड १, २ व ३ या ग्रंथांचे प्रकाशन देखील झाले.
पू. श्रीसंजयगुरुजींनी फार सुंदर पद्धतीने पसायदानातील माउलींनी सांगितलेला विचार , धर्म या शब्दाचा अर्थ मनुष्यासाठी कर्तव्य म्हणून कसा घ्यावा , श्रीमद्भगवदगीतेत भगवंतांनी सांगितलेली चातुर्वण्य व आश्रम व्यवस्था, स्वधर्माचरण असा विषय मांडला.
या कार्यक्रमास *आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार पू. श्री चारुदत्तबुवा आफळे, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे, प्रधान विश्वस्त श्री शैलेश गोसावी, सचिव श्री कल्पेश गोसावी* ,संस्थेच्या विविध महाविद्यालयातील शिक्षकवृंद व सभासद उपस्थित होते.🙏🙏🙏

📖 घराघरात ज्ञानेश्वरी... प्रत्येकाच्या हातात ज्ञानेश्वरी!श्री संत सेवा संघ व कोणार्क ग्लोबल प्रस्तुतश्रीमद्भगवद्गीतेचा अ...
07/08/2026

📖 घराघरात ज्ञानेश्वरी... प्रत्येकाच्या हातात ज्ञानेश्वरी!
श्री संत सेवा संघ व कोणार्क ग्लोबल प्रस्तुत
श्रीमद्भगवद्गीतेचा अमृतार्थ — श्रीज्ञानेश्वरी
१८ अध्याय • १८ स्वतंत्र पुस्तिका • संपूर्ण ज्ञानेश्वरी संच
"७५० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेले जीवनतत्त्वज्ञान आजही तितकेच जिवंत, तितकेच आवश्यक!"
✨ प्रत्येक ओवीखाली सोपा व समर्पक अर्थ
✨ प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी आजच्या काळाशी जोडणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना
✨ विद्यार्थी, युवक, पालक, शिक्षक आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त
✨ स्वाध्याय, प्रवचन, संस्कारवर्ग व दैनंदिन वाचनासाठी आदर्श
आज प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी का हवी?
✔ मनाला स्थैर्य देण्यासाठी
✔ मुलांना संस्कार देण्यासाठी
✔ युवकांना योग्य दिशा देण्यासाठी
✔ कुटुंबात विचारांचा संवाद वाढवण्यासाठी
✔ भारतीय ज्ञानपरंपरेचा अभिमान जपण्यासाठी
ह्या केवळ पुस्तिका नाहीत...
ही तुमच्या कुटुंबासाठी विचारांची, संस्कारांची आणि उज्ज्वल भविष्यातील अमूल्य गुंतवणूक आहे.
आजच आपल्या घरी ज्ञानेश्वरीच्या ह्या पुस्तिका आणा...!
ज्ञानातून व्यक्तिनिर्माण • व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण
संपर्क -9096060917

02/08/2026

तुमचे मनही प्रत्येक गोष्टीला चिकटून तुकडे-तुकडे होत आहे का?
मन प्रत्येक आकर्षणाला चिकटताना स्वतःचाच काही भाग गमावत जाते. म्हणून ते क्षणभंगुर गोष्टींमध्ये अडकवू नका; भगवंताच्या चरणी स्थिर करा. जिथे मनाला खरी शांती, समाधान आणि पूर्णत्व मिळते. 🙏
#मन
#मन:शांती Mindfulness Bhakti Vitthal HariNaam MarathiQuotes SpiritualThoughts DailyWisdom InnerPeace SanatanDharma IndianSpirituality Motivation

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Sant Seva Sangha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree Sant Seva Sangha:

Shortcuts

Share