Bhavatal - भवताल

Bhavatal - भवताल भवताल / Bhavatal
हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा !

भवताल ही पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने काम करणारी एक सकारात्मक चळवळ आहे. आधुनिक काळातील गरजा व व्यवधाने लक्षात घेऊन शाश्वतता कशी टिकवता येईल, हा विचार त्यामागे आहे.
निसर्ग, पाणी, हवामान, पर्यावरण या विषयांशी संबंधित विविध मुद्दे हाती घेणे, त्याबाबत जनजागृती करणे, त्यावर उपाय सुचवणे, ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करणे.. हा त्याचा उद्देश आहे. हा उद्देश तडीस नेण्यासाठी या कार्यात आपला सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे.

07/08/2026

Glimpses of Vietnam

अधिक माहितीसाठी:
https://bhavatal.com/Ecotours/vietnam_sept2026

संपर्क:
9545350862

#भवताल #व्हिएतनाम #पर्यटन #प्रवास #शांतता

06/08/2026

पावसाच्या शाळेत येताय ना?

"पावसाची शाळा" या एकदिवसीय कार्यशाळेत मुलं स्वतः पर्जन्यमापक तयार करतील, हवामानाचं निरीक्षण करतील, पावसाचे अंदाज समजून घेतील, पावसाळ्यातील जैवविविधतेचा शोध घेतील आणि पाऊस, शेती, आरोग्य व पर्यावरण यांचा सुंदर संबंध अनुभवतील.

ही केवळ कार्यशाळा नाही, तर मुलांच्या मनात निसर्गाविषयी कुतूहल आणि विज्ञानाविषयी प्रेम जागवणारा अनुभव आहे.

आपल्या मुलांसाठी आजच नोंदणी करा!
https://bhavatal.com/event-registration/75

रविवार, ९ ऑगस्ट २०२६
सकाळी १० ते सायंकाळी ५

ठिकाण: ज्ञान प्रबोधिनी शाळा, पुणे
(ऑनलाइन वर्कशॉप देखील उपलब्ध)

संपर्क:
84216 03929

व्हिएतनाम... एकदा तरी अनुभवावा !• येत्या सप्टेंबर मध्ये तारखा राखून ठेवाव्हिएतनाम... एक छोटा देश. या देशावर चीन, जपान, फ...
17/07/2026

व्हिएतनाम... एकदा तरी अनुभवावा !
• येत्या सप्टेंबर मध्ये तारखा राखून ठेवा

व्हिएतनाम... एक छोटा देश. या देशावर चीन, जपान, फ्रान्स, अमेरिका अशा अनेक आक्रमणांचे ओझे आणि स्थानिक राजवटीचा काही वारसा. असा काही हजार वर्षांचा इतिहास. हा देश भारतानंतर पंचवीस-तीस वर्षांनी स्वतंत्र झाला. तेव्हापासून आजपर्यंत घट्ट कम्युनिस्ट राजवट. पण आता तो आर्थिकदृष्ट्या खुला झाला आहे. पर्यटनात मोठी झेप घेतली आहे. या देशात फिरताना तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती, भौगोलिक रचना, इतिहास-वारसा, मानवनिर्मित भव्य-दिव्य गोष्टी... या सर्वांचे उत्तम दर्शन घडते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेल्या या चिंचोळ्या देशातील विविधता मनाला भावते. तिथले लोक मुळातच अगत्यशील आणि हसतमुख. त्यामुळे सेवासुद्धा चांगल्या मिळतात.

तिथं आवर्जून पाहाव्यात अशा गोष्टी म्हणजे -
• अमेरिकेच्या बलाढ्य सत्तेला गुडघ्यावर आणणारे कु ची टनेल्सचे जाळे
• प्राचीन व्यापाराचे केंद्र असलेले, सुखद दिव्यांनी झगमगणारे हो-यान
• निन्ह-बिन्ह चे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक पॅगोडा, नैसर्गिक गुहा, बोटीची सैर
• बाना-हिल्स येथील अफलातून फ्रेंच व्हिलेज, केबल कार, भव्य स्थापत्य
• हेलाँग-बे येथील असंख्य छोटी-छोटी बेटं आणि आलिशान क्रूझची सैर
• दनांग जवळील कोकोनट फॉरेस्ट आणि तिथल्या धमाल बास्केट बोट
• सा पा जवळील रोमांचक साहसी अॅक्टिव्हिटीज् आणि बरेच काही...

आणि हे सारं “भवताल इकोटूर्स” सोबत म्हणजे कधीही विसरता न येणारा अविस्मरणीय अनुभव... म्हणूनच,
व्हिएतनाम... एकदा तरी अनुभवावा!

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी:
https://bhavatal.com/Ecotours/vietnam_sept2026

संपर्क:
9545350862
[email protected]

- भवताल इकोटूर्स

#व्हिएतनाम #भवताल #सापा #हेनॉय #हेलाँग_बे #दनांग #पर्यटन #इकोटूर्स #व्हिएतनामयुद्ध #इतिहासआणिसंस्कृती #कुची_टनेल्स

उद्याचे 'क्लायमेट सायंटिस्ट' घडवणारी, “पावसाची शाळा”• "भवताल"चा अनोखा उपक्रमपाऊस मोजणे, हवामानाची - निसर्गाची निरीक्षणं ...
15/07/2026

उद्याचे 'क्लायमेट सायंटिस्ट' घडवणारी, “पावसाची शाळा”
• "भवताल"चा अनोखा उपक्रम

पाऊस मोजणे, हवामानाची - निसर्गाची निरीक्षणं करणे, त्यांचे विश्लेषण करून त्यांचा विविध गोष्टींसाठी उपयोग करणे आणि हे सारे करत असताना उद्याचे "क्लायमेट सायंटिस्ट" घडवणे... या उद्देशाने "भवताल" तर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचं नाव आहे, “पावसाची शाळा”!
इयत्ता ७ वी ते ९ वी च्या निवडक विद्यार्थ्यांसाठी हा एक नाविन्यपूर्ण 'सिटीझन्स सायन्स' उपक्रम तयार करण्यात आला आहे. त्यात मान्सूनच्या हंगामाचा वापर प्रत्यक्ष शाळेच्या वर्गासारखा केला जातो. हा उपक्रम शालेय मुलांना पाऊस, हवामान, जैवविविधता, शेती आणि आरोग्य या विषयांचे जवळून निरीक्षण करायला शिकवतो. तसेच, त्यांना अभ्यासक्रमातील विज्ञान आणि प्रत्यक्षातील पर्यावरणीय वास्तव यांच्याशीही जोडतो.
मुलांना पर्यावरण पूरक आणि "क्लायमेट सायंटिस्ट" बनवण्यासाठी या उपक्रमात यांचा सहभाग निश्चित करा.
अधिक माहिती आणि सहभागासाठी लिंक:
https://bhavatal.com/pavsachishala

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

🛠️ पुस्तकरहित शिक्षण, DIY उपकरणे आणि मजेशीर ॲक्टिव्हिटीजची कार्यशाळा.

💻 मान्सून, जैवविविधता, शेती, आहार आणि आरोग्याचा परस्परसंबंध ओळखण्यासाठी ऑनलाईन वर्ग.

🏕️ हवामान विभाग यंत्रणा, पाणी व्यवस्थापन आणि जलपरिसंस्था समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी.

📒 प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी निरीक्षण आणि वैज्ञानिक नोंदीसाठी पॉकेट गाईडस, नोंद वही आणि बरेच काही…

• मुलांनी का सहभागी व्हावे?
🌍 भविष्यातील 'पर्यावरण साक्षर' आणि 'जागरूक नागरिक' बनवण्यासाठी!
🔬 विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल आणि गणित अशा सर्वसमावेशक आणि लवचिक अभ्यासक्रमाचा एकाच वेळी आनंद घेण्यासाठी
🧠 मुलांची चिकित्सक विचारसरणी (Critical thinking) आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य (Problem-solving) वाढविण्यासाठी

येणाऱ्या पर्यावरणीय आव्हांनाना सामोरे जाताना या पावसाच्या शाळेतील शिकवणूक त्यांना नक्कीच कामी येईल. चला, 'पावसाची शाळा' ला पाठिंबा देऊया आणि एका जाणकार, तार्किक व जबाबदार पिढीमध्ये गुंतवणूक करूया!

नोंदणीसाठी शेवटची तारीख:
२८ जुलै २०२६

संपर्क:
8421603929 (व्हाट्सअप)
[email protected] (ई-मेल)

#पाऊस #पावसाचीशाळा #मान्सून #भवताल #क्लायमेट_सायंटिस्ट #शाळा #शालेय_उपक्रम #निसर्ग #भिजूया_मोजूया

Address

Pune

Telephone

9545350862

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhavatal - भवताल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhavatal - भवताल:

Shortcuts

Share