Maharshi Karve Stree Shikshan Samstha_Official

Maharshi Karve Stree Shikshan Samstha_Official Maharshi Karve Stree Shikshan Samstha was established in 1896 by the great visionary and social worker Bharat Ratna Maharshi Dhondo Keshav Karve

Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune: – the 121-years-old institution is committed to “Empowerment of Women through Education”. The Institution works relentlessly towards educating the women and thereby making them self-reliant. The Samstha was established in 1896 by the great visionary and social worker Bharat Ratna Maharshi Dhondo Keshav Karve to provide shelter to destitute women, empower them with education and help them to be independent and self reliant, ultimately uplifting their condition .

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाकर्वेनगर, पुणे१७  सप्टेंबरमार्गशीर्ष-मुकुंदा चतुर्थी, सुभगा चतुर्थीमार्गशीर्ष' महिन्यात...
17/09/2026

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
कर्वेनगर, पुणे

१७ सप्टेंबर
मार्गशीर्ष-मुकुंदा चतुर्थी, सुभगा चतुर्थी

मार्गशीर्ष' महिन्यातील मुकुंदा चतुर्थी ही संकटांचे निवारण करून भक्ताला विजयाकडे आणि मोक्षाकडे नेते, तर सुभगा चतुर्थी ही जीवनात सुख, ऐश्वर्य आणि अखंड सौभाग्याची वृद्धी करते.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाकर्वेनगर, पुणे१६  सप्टेंबरकार्तिक-स्कंद चतुर्थी, बहुला चतुर्थीकार्तिक स्कंद' हे भगवान श...
16/09/2026

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
कर्वेनगर, पुणे

१६ सप्टेंबर
कार्तिक-स्कंद चतुर्थी, बहुला चतुर्थी

कार्तिक स्कंद' हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र 'कार्तिकेय' (भगवान मुरुगन) यांचे एक प्रमुख नाव आहे. कार्तिकेयांचा जन्म कार्तिक महिन्यात झाला होता, म्हणून या तिथीला 'स्कंद चतुर्थी' म्हटले जाते. बहुला' या शब्दाचा अर्थ "समृद्धी, विपुलता किंवा गाय" असा होतो. पौराणिक कथेनुसार, 'बहुला' हे द्वापरयुगातील एक अत्यंत सत्यवादी आणि धार्मिक गाईचे नाव होते, जिची परीक्षा स्वतः भगवान श्रीकृष्णाने घेतली होती. तिच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने तिला पूजनीय होण्याचा वर दिला होता.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाकर्वेनगर ,पुणे ५२परिवर्तनपथावर अग्रेसर!“समरसता”   #पंचपरिवर्तन  #सामाजिकपरिवर्तन    #स्...
16/09/2026

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
कर्वेनगर ,पुणे ५२
परिवर्तनपथावर अग्रेसर!
“समरसता”
#पंचपरिवर्तन #सामाजिकपरिवर्तन #स्वबोध
#कुटुंबप्रबोधन #समरसता

"हिंदुत्वाचे मोठे वर्तुळ न विसरता सामाजिक सद्भाव जपू ! - डाॅ. आनंद लेले(कर्वे संस्थेत सामाजिक रक्षाबंधन)दि. १२ सप्टेंबर ...
15/09/2026

"हिंदुत्वाचे मोठे वर्तुळ न विसरता सामाजिक सद्भाव जपू ! - डाॅ. आनंद लेले
(कर्वे संस्थेत सामाजिक रक्षाबंधन)

दि. १२ सप्टेंबर २६ - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने आज सामाजिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या नावलौकिकात जसा शिक्षक, प्राध्यापक, शाखाप्रमुख, प्राचार्य, संस्थाचालक यांचा वाटा आहे तसेच संस्थांतर्गत विविध सेवा देणारे कष्टकरी, सुरक्षाकर्मी यांचाही तितकाच महत्वपूर्ण वाटा आहे. अशा‌ सर्व सेवाकर्मींच्या प्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रकटीकरण म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. संस्थेत अशा सेवा देणारे सुमारे १८५ महिला व १३५ पुरुष कर्मचारी या कार्यक्रमासाठी निमंत्रित होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष डाॅ. आनंद लेले, व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती उमा जोशी, श्रीमती रेखा सोनुने, श्रीमती शुभांगी तांबट, सचिव डाॅ. पी. व्ही. एस. शास्त्री, उपसचिव श्रीमती कांचन सातपुते, मानद उपसचिव श्री. प्रदीप वाजे, आजन्म सेविका श्रीमती वैशाली पोतदार हे मान्यवर उपस्थित होते.

"संस्थेला भेट देणारे अनेक मान्यवर इथे असलेली स्वच्छता, सुरक्षा या गोष्टींचे कौतुक इथल्या पदाधिका-यांसमोर करतात. वस्तुतः या कौतुकाचे मानकरी आपणच आहात", अशा शब्दांत श्री. रवींद्र देव यांनी या कर्मचारी वर्गाचा गौरव आपल्या प्रास्ताविकात केला आणि अशा पुढील कार्यक्रमाचे संचालन कर्मचा-यांद्वारेच व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. डाॅ. शास्त्री यांनी आपल्या मनोगताद्वारे या संस्थेला आश्रम म्हणण्यामागे एक पवित्रतेचे अधिष्ठान असल्याचे विशेषत्वाने नमूद केले आणि कष्टकरी वर्गाच्या सर्व शैक्षणिक समस्या सोडविण्यास संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यानंतर सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी परस्परांना रक्षाबंधन केले. सर्वांना भेटवस्तू देऊन तसेच महिला कर्मचाऱ्यांना साड्या व हळदीकुंकू देऊन त्यांचा गौरव केला गेला. या वेळी श्रीमती महानंदा उभे, श्रीमती सुगंधा पवार व श्रीमती चंदा भोसले या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतांद्वारे संस्थेबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली. कोरोना काळ किंवा अन्य संकटकाळात संस्था अशा अनेक गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याने अनेक घरे सावरली असल्याचे या मनोगतांमधून पुढे आले.

डाॅ. आनंद लेले यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना सर्व कर्मचा-यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत सामाजिक रक्षाबंधनाचा आशय उलगडला. ते म्हणाले, "परस्परांमधील आत्मीयता वाढीस लागणे हेच या सणाचे खरे प्रयोजन आहे. सामाजिक रक्षाबंधन म्हणजे समाजाचे रक्षण करण्याचे दायित्व. जो समाज आपल्या‌ रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असतो, तोच टिकून राहतो. आपला समाज संपन्न असल्याने‌ इथे मोठ्या प्रमाणावर आक्रमणे झाली. इथे अपरिमित लूट झाली असली तरी परस्परांबद्दलच्या सामाजिक दायित्वाचा भाव टिकून राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांनी यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश्यही हा भाव जागविणे हाच आहे."

"आपण सर्वजण इथल्या विद्यार्थिनींची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्या अर्थाने आपण सर्वच जण सुरक्षारक्षक आहोत. मात्र तरीही एका विशिष्ट गणवेषात आपला चेहरा विसरुन हे काम तुम्ही सर्वजण करत आहात आणि एका मोठ्या कामाशी जोडलेले आहात. आत्मीयतेने केलेल्या या कामाचे मोल होऊ शकत नाही. हे सर्व करत असताना आपल्याच बांधवांना आधारभूत होण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार, एकजिनसी समाज म्हणून शांतिपूर्ण राहण्यासाठी जातीपातींचा मनातून विसर, सर्व प्रकारच्या नागरी अनुशासनाचे कटाक्षाने पालन, पर्यावरणाचे संरक्षण या गोष्टी आपण आचरणात आणायला हव्यात. अमेरिका, चीन, रशियासारख्या देशांच्या अतिश्रीमंतीमागे हिंसेचा भयानक इतिहास आहे. मात्र भारत देश आज जो काही आहे, त्यामागे असा कुठलाही इतिहास नाही. कारण ती आपली प्रवृत्ति नाही. सामाजिक सद्भाव हीच आपली मूळ प्रकृति आहे", असे सांगून मतदार नोंदणी आणि जनगणना या अतिमहत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. हे कर्तव्य करताना 'आपण गर्दी नसून समाज आहोत' हे लक्षात घेऊन आपली हिंदुत्वाशी असलेली बांधिलकी या स्पष्टपणे मांडली पाहिजे, असे आग्रहाचे प्रतिपादन डाॅ. लेले यांनी केले.

श्री. प्रदीप वाजे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व श्रीमती उमा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. सामूहिक कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाकर्वेनगर, पुणे१५ सप्टेंबरआश्विन-वक्रतुंड चतुर्थीअश्विन मंदार' म्हणजे रुईचे झाड (Divine ...
15/09/2026

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
कर्वेनगर, पुणे

१५ सप्टेंबर

आश्विन-वक्रतुंड चतुर्थी

अश्विन मंदार' म्हणजे रुईचे झाड (Divine Coral Tree). भगवान गणेशाला मंदार (रुईची) फुले आणि पाने अत्यंत प्रिय आहेत. मंदार वृक्षाच्या मुळापासून तयार केलेल्या मूर्तीला 'मंदार गणेश' म्हणतात.दशरथ' या शब्दाचा अर्थ "ज्याचे दहाही दिशांना रथ धावू शकतात असा पराक्रमी" असा होतो. तसेच आध्यात्मिक दृष्ट्या, ज्याने आपल्या दहा इंद्रियांवर (५ ज्ञानेंद्रिये आणि ५ कर्मेंद्रिये) पूर्ण ताबा मिळवला आहे, तो 'दशरथ'.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाकर्वेनगर, पुणे१४  सप्टेंबरभाद्रपद-विनायक चतुर्थीभाद्रपद' या शब्दाची उत्पत्ती 'भद्र' (कल...
14/09/2026

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
कर्वेनगर, पुणे

१४ सप्टेंबर
भाद्रपद-विनायक चतुर्थी

भाद्रपद' या शब्दाची उत्पत्ती 'भद्र' (कल्याणकारी किंवा शुभ) आणि 'पद' (पाऊल किंवा स्थान) या शब्दांपासून झाली आहे. म्हणजेच, "कल्याणकारी पावले ठेवणारा किंवा समृद्धी आणणारा काळ".वरद' या शब्दाचा अर्थ होतो "वरदान देणारा". या दिवशी श्री गणेश आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून त्यांना सुख, समृद्धी आणि बुद्धीचे वरदान देतात, व शिव म्हणजे कल्याणकारी म्हणून या तिथीला 'वरदशिवा विनायक चतुर्थी' म्हटले जाते.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

12/09/2026

कर्मयोगी भाग १३

"मोठ्या कामाची मूळ सुरुवात!"

विशेष मार्गदर्शन: विनीता ताई देशपांडे - Research Department And Archives

#पंडितारमाबाई

11/09/2026

Address

Karve Nagar
Pune
411052

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

020 25313200

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharshi Karve Stree Shikshan Samstha_Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharshi Karve Stree Shikshan Samstha_Official:

Shortcuts

Share