ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ

  • Home
  • India
  • Pune
  • ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ

ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय - पालक ?

21/01/2026

*वॉकथॉन – मनापासून घडलेला अनुभव आणि एक प्रेरणादायी प्रवास*

वॉकथॉन हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर एक विचार होता — *संघटन, वाचन संस्कृती आणि आरोग्य म्हणजेच आरोग्यव्रत.*

या वॉकथॉनमध्ये जवळपास *२७००* पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. पण हा कार्यक्रम यशस्वी झाला तो आमच्यासोबत उभ्या असलेल्या *१५० पेक्षा जास्त टीम मेंबर्समुळे. मागील ३ ते ५ दिवस हे सगळे जण कुठेही न थांबता, कुठलीही तक्रार न करता, फक्त कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी झटत होते.*

*खरं सांगायचं तर, या १५० जणांचं कौतुक काही ओळींत करणं शक्यच नाही.*

वॉकथॉनची टीम अफाट होती. प्रत्येक जण आपापली जबाबदारी स्वतःहून घेत होता. कुणी पुढे दिसत होतं, कुणी शांतपणे मागे राहून सगळं सांभाळत होतं — पण सगळ्यांचा उद्देश एकच होता.

या *टीममधले लीडर्सही* खूप छान होते. फक्त सांगणारे नाही, तर स्वतः पुढे उभं राहून काम करणारे. त्यामुळे प्रत्येक टीम मेंबरला वाटत होतं की *“आपण सगळे एकत्र आहोत.”*

याशिवाय, काही टीम मेंबर्सना आम्ही अगदी शेवटच्या १–२ दिवसांत विनंती केली होती, आणि कोणताही विचार न करता त्यांनी होकार दिला आणि मदतीसाठी पुढे आले. एवढ्या कमी वेळेत येऊन पूर्ण मनापासून साथ देणं — यासाठी त्या सर्वांचे खास आभार. अशा लोकांमुळेच संघटना अजून मजबूत होते.

नोंदणी असो, रूट मॅनेजमेंट असो, पाणी, कॅटरिंग, टी-शर्ट वाटप असो — सगळं इतकं नीट झालं की *एकाही सहभागी कडून एकही प्रश्न किंवा तक्रार आली नाही.* हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं यश होतं.

*या संपूर्ण व्यवस्थेत देवळेकर सर यांचे मार्गदर्शन आणि सूचना आमच्यासाठी खूप उपयोगी ठरल्या.*

हा कार्यक्रम *पूर्णपणे मोफत* होता.
सर्व सहभागींसाठी *ग्रुप सुर्या (Group Surya)* यांच्या मदतीने *मोफत टी-शर्ट* देण्यात आले. यासाठी ग्रुप सुर्याच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार. त्यांच्या सपोर्टमुळे हा उपक्रम अजून खास झाला.

हा अनुभव आम्हा सगळ्यांसाठी खास होता, कारण *इथे लोक, टीमवर्क आणि एकमेकांवरचा विश्वास दिसला.*
अशी टीम, असं नेतृत्व आणि असा अनुभव मिळणं खरंच भाग्याचं असतं.

🙏 *आमच्या सगळ्या टीम मेंबर्सना, लीडर्सना, शेवटच्या क्षणी साथ देणाऱ्या स्वयंसेवकांना, सहभागीांना, पालकमहासंघाला आणि ग्रुप सुर्याला मनापासून धन्यवाद!*🙏

17/01/2026
07/01/2026
प्रिय पालक बंधू आणि भगिनी 🙏*निरोगी कुटुंब, सुखी कुटुंब 🙌*  यालाच अनुसरून ,नववर्षाची ऊर्जा घेऊन...याही वर्षी.....! आपण सर...
07/01/2026

प्रिय पालक बंधू आणि भगिनी 🙏

*निरोगी कुटुंब, सुखी कुटुंब 🙌*

यालाच अनुसरून ,
नववर्षाची ऊर्जा घेऊन...
याही वर्षी.....! आपण सर्वजण...
आपल्या कुटुंबासाठी.. परत एकदा
एक स्वास्थ्य संकल्प करूयात...
रोजच्याच चालण्याला नवा आयाम देत 'आरोग्य पाऊले' टाकुयात!!

पालक महासंघ घेऊन येत आहे... सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी

*✨आपल्या सर्वांच्या आवडीचा तसेच आरोग्य क्रीडा महोत्सवाच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक उपक्रम वॉकेथॉन 2026✨*

या उपक्रमाच्या निमित्ताने कुटुंबातील प्रत्येकाला एक आरोग्यपूर्ण नवीन सुरुवात करून देऊयात...
म्हणूनच घरातील प्रत्येकाला यात सहभागी करता येईल यासाठी या उपक्रमाची आखणी केली आहे.

*टप्पे?*
👉3 किमी
👉6 किमी

*कधी?*
18 जानेवारी , रविवार,
सकाळी 6:30 वा.

*कुठे?*
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.

*कसे सहभागी होऊ शकता?*
फक्त २ मिनिटांचा गूगल फॉर्म भरून

*👇नोंदणी अर्ज लिंक :*
https://forms.gle/U6RJJPFGxcwFTHsp7

*प्रवेश शुल्क :* संपूर्णपणे निशुल्क 🎉🎉

*मुख्य वैशिष्ट्ये*
- कुटूंबासहित सहभागी होणाऱ्यांचा सन्मान
- चिमुकल्या सहभागी स्पर्धाकांचे कौतुक
- प्रेरणादायी जेष्ठ स्पर्धाकांचा सन्मान
- आणि स्पर्धेदरम्यान विक्रम नोंदवणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष बक्षिसे

चला तर मग विक्रमी संख्येने सहभागी होऊयात...
🚶‍♀🚶🏻‍♀️🚶🏼🚶🏼‍♂️🏃‍♀️🏃🏿🏃‍♀️🚶🏻‍♀️🚶🏼‍♂️

Address

Sector 25, Pradhikaran, Nigdi
Pune
411044

Opening Hours

Monday 6am - 9pm
Sunday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ:

Shortcuts

Share