Violence No More

Violence No More "Violence No More" is a resolute message dedicated to empowering women and eradicating violence.

04/01/2024
Happy New Year All #2024
01/01/2024

Happy New Year All

#2024

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस.
20/12/2023

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस.

10/12/2023

महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण राजरोसपणे पाहत असतो. घरगुती हिंसाचार असो, बाहेर होणारे अत्याचार असो वा कामाच्या ठिकाणी होणारं दमन असो., आपल्यापैकी बहुतांश सर्वांनीच अशा घटना पाहिल्या, ऐकल्या वा अनुभवल्या आहेत. महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्यासाठी काय करता येईल, याबाबत कित्येक जण केवळ बोलतात. मात्र, त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचा विचार अगदी कमीच होतो. यामुळेच संयुक्त राष्ट्र महिला संघटनेने लिंग- आधारित हिंसेविरुद्ध 16 दिवस सक्रियता या मोहिमेची घोषणा केली आहे. काय आहे ही मोहीम? याची सुरुवात कशी झाली? आणि तुम्ही यामध्ये कसा सहभाग नोंदवू शकता? जाणून घेऊया.
लिंग-आधारित हिंसेविरुद्ध 16 दिवस सक्रियता, ही संयुक्त राष्ट्रांची एक वार्षिक आंतरराष्ट्रीय मोहीम आहे. महिलांवरील हिंसा निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस असणाऱ्या 25 नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू होते. पुढे 10 डिसेंबर, म्हणजेच मानवी हक्क दिनापर्यंत ही मोहीम चालते. जगभरातील लोक आणि संघटनांकडून महिला आणि मुलींवर होणारा हिंसाचार रोखणे, आणि त्याच्या निर्मूलनाचे आवाहन करणे यासाठी उपाययोजना करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती.

1991 साली वुमेन्स ग्लोबल लीडरशिप इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. याच्या उद्घाटनप्रसंगी 16 दिवस सक्रियता मोहिमेची सुरूवात करण्यात आली होती. पुढे 2008 साली संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांनी UNITED या दुसऱ्या एका मोहिमेची घोषणा केली. महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी घोषित केलेली ही मोहीम 16 दिवसांच्या सक्रियता मोहिमेसोबतच राबवली जाते.
यंदाची थीम
दरवर्षी UNITED हे कॅम्पेन एका विशिष्ट थीम, म्हणजेच विषयावर काम करते. यावर्षीची थीम आहे - “युनाईट! इनव्हेस्ट टू प्रिव्हेंट व्हायलेंस अगेन्स्ट वुमेन अँड गर्ल्स”. महिलांवरील हिंसाचार-मुक्त जग निर्माण करण्यासाठी आपण काय पावलं उचलत आहोत हे लोकांनी सांगावं. तसंच, महिला आणि मुलींवरील हिंसाचार थांबवण्याची आपल्याला किती काळजी आहे हे नागरिकांनी दाखवून द्यावं असं आवाहन यातून करण्यात आलं आहे. केवळ नागरिकांनीच नाही, तर जगभरातील देशांच्या सरकारांनी लिंग-आधारित हिंसाचार रोखण्यासाठी काय पावलं उचलली, कशा प्रकारे गुंतवणूक केली हेदेखील सर्वांना सांगण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलं आहे.
यूएन वुमेनचं कार्य
संयुक्त राष्ट्रांच्या या मोहिमेमधील सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी यूएन वुमेनने 2009 साली ‘से नो-युनाईट’ अभियान सुरू केले. पीडित महिलांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणि महिलांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हे एक जागतिक व्यासपीठ ठरलं, आणि अजूनही ठरत आहे. या अभियानात ऑनलाईन याचिका, सोशल मीडिया मोहीम, राष्ट्रीय जनजागृती उपक्रम, जगभरातील विविध संघटनांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये राबवलेले उपक्रम, देशांच्या सरकारांनी राबवलेले ठोस निर्णय अशा बऱ्याच गोष्टी दिसून आल्या.
यूएन वुमेनच्या ‘कमिट’ उपक्रमात युरोपियन युनियन आणि 63 राष्ट्रांनी सहभाग नोंदवला. यामध्ये महिला आणि मुलींवरील हिंसाचार रोखण्यासाठी विशिष्ट उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. या उपाययोजनांमध्ये कायदे पारित करणे वा सुधारणे, आंतरराष्ट्रीय करारांना मान्यता देणे, जनजागृती मोहिमा राबवणे, (महिलांना) सुरक्षित घरे उपलब्ध करून देणे किंवा विनामूल्य हॉटलाईन सेवा पुरवणे, पीडित महिलांना मोफत कायदेशीर मदत पुरवणे, लँगिक रुढी आणि लैंगिक हिंसेबाबत जनजागृती करणारे शिक्षण कार्यक्रम राबवणे अशा गोष्टींचा समावेश होता.
कोरोना कालावधीमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. यामुळेच 2020 साली संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी सर्व देशांच्या सरकारांना आपल्या महामारी प्रतिसाद योजनेत एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रमुख भर देण्यास सांगितले. ही गोष्ट म्हणजे - महिला आणि मुलींवरील हिंसाचार रोखणे आणि त्यांचे निवारण करणे. यासाठी निधी, प्रतिबंध, प्रतिसाद आणि संकलन अशा चार प्रमुख क्षेत्रांभोवती वचनबद्धता आणि धोरणात्मक कृती करण्याचे आवाहन सर्व सरकारांना करण्यात आलं. या आवाहनाला 146 सदस्य देश आणि ऑब्जर्वर्स यांनी पाठिंबा दिला.

04/12/2023

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पोस्टर सौजन्य - पूजा ठाकूर आणि गायत्री लेले
17/10/2023

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

पोस्टर सौजन्य - पूजा ठाकूर आणि गायत्री लेले

Address

-
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Violence No More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share