Yashwardhini GMSS, Ambegaon

Yashwardhini GMSS, Ambegaon ग्रामीण महिलांचे तालुका पातळीवरील संघटन

22/04/2026

*"पगार 20 हजार आणि खिशात फोन एक लाखाचा*
*(मिडल क्लासची 'भिकार' लक्षण)*

*आजच्या सोशल मीडियाच्या युगात 'मी कोण आहे?' यापेक्षा 'मी कसा दिसतो?' याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे*
*"पगार २० हजार आणि हातात १ लाखाचा फोन... ही श्रीमंती नाही, तर ही भिकार लक्षणं आहेत." हे वाक्य वाचायला जहाल वाटत असले, तरी ते आजच्या वास्तवाचे विदारक चित्रण आहे. आपण अशा काळात जगत आहोत जिथे माणसाची किंमत त्याच्या कर्तृत्वावरून नाही, तर त्याच्या खिशातील फोनच्या ब्रँडवरून ठरवली जात आहे*

*१. 'ईएमआय' (EMI) - आधुनिक गुलामगिरीचे पाश*
*पूर्वीचा मध्यमवर्ग 'अंथरूण पाहून पाय पसरावेत' या तत्त्वावर जगायचा. पण आजच्या पिढीने अंथरूण लहान असले की ते ओढून ताणून फाडण्याचे धोरण स्वीकारले आहे*
*२०-२५ हजार पगार असणारा तरुण जेव्हा ८-९ हजार रुपयांचा हप्ता भरून आयफोन घेतो, तेव्हा तो फक्त फोन विकत घेत नाही, तर तो स्वतःचे स्वातंत्र्य गहाण ठेवतो*
*ज्या बापाने आयुष्यभर फाटलेला बनियन घालून मुलाला शिकवले, ज्या आईने स्वतःच्या साडीला ठिगळ लावून घराचा गाडा हाकला, त्यांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी मुलाने प्रगती करणे अपेक्षित असते. मात्र, त्याच कष्टाच्या पैशातून किंवा स्वतःच्या तुटपुंज्या पगारातून केवळ 'स्टेटस'साठी महागडे गॅझेट्स घेणे हा निव्वळ निर्लज्जपणा आहे*

*२. घसारा (Depreciation) विरुद्ध गुंतवणूक (Investment)*
*आर्थिक साक्षरतेचा अभाव हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे. आपण हे विसरतो की इलेक्ट्रॉनिक वस्तू ही 'मालमत्ता' (Asset) नसून ती एक 'खर्च' (Liability) आहे*
*उदाहरण: आज घेतलेला १ लाखाचा फोन दोन वर्षांनी ४० हजारालाही विकला जाणार नाही*
*तुलना: तेच १ लाख रुपये जर LIC Insurance,सोन्यात, म्युच्युअल फंडात किंवा चांगल्या शेअर्समध्ये गुंतवले असते, तर ५-१० वर्षांत त्याचे मूल्य कित्येक पटीने वाढले असते*
*आपण 'डेप्रिसिएटिंग असेट्स'वर पैसा खर्च करून श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे आपण कधीच खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ शकणार नाही*

*३. 'कॉफी आणि स्टोरी'ची संस्कृती*
*स्टारबक्समध्ये ३०० रुपयांची कॉफी पिऊन त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकणे ही आजची फॅशन झाली आहे. पण विचार करा त्या ३०० रुपयांत घराचे दोन दिवसांचे किराणा सामान येऊ शकते. टपरीवर १० रुपयांचा चहा पिऊन उरलेले २९० रुपये वाचवणारा माणूस कंजूस नसतो, तर तो 'स्मार्ट' असतो. कारण त्याला पैशाचे मूल्य आणि भविष्यातील संकटांची जाणीव असते. 'इन्स्टा स्टोरी' २४ तासांत गायब होते, पण बँक बॅलन्स संकटाच्या काळात आयुष्यभर साथ देतो*

*४. 'दिसणे' विरुद्ध 'असणे'*
*आजकालच्या मुलांना आरशासमोर उभे राहून आयफोनचा लोगो दिसेल असा सेल्फी काढण्यात धन्यता वाटते. पण हे विसरू नका की, फिल्टर लावून आलेले रूप आणि ईएमआयवर केलेली हवा पावसाच्या पहिल्या सरीसारखी असते; ती कधीही धुवून निघू शकते. खरे सौंदर्य आणि खरे 'स्टेटस' हे तुमच्या ज्ञानावर, तुमच्या वागणुकीवर आणि तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असते*
*जगाला तुमची 'रिंगटोन' ऐकण्यात रस नाही. ज्या दिवशी लोक तुमची 'यशाची कहाणी' (Success Story) ऐकायला उत्सुक असतील, तो दिवस तुमचा खरा ब्रँड असेल*
*टाटा, अंबानी किंवा एलन मस्क हे त्यांच्या महागड्या फोनमुळे ओळखले जात नाहीत, तर त्यांनी निर्माण केलेल्या साम्राज्यामुळे ओळखले जातात*

*५. मध्यमवर्गीयांनी काय बदलावे?*
*मध्यमवर्गीय असणे ही काही वाईट गोष्ट नाही, पण 'भिकार मानसिकतेचा मध्यमवर्ग' असणे ही धोक्याची घंटा आहे*
*गरज आणि चैन यातील फरक ओळखा: फोनची गरज ही संवाद साधण्यासाठी आणि कामासाठी असते, मिरवण्यासाठी नाही*
*ब्रँडच्या मागे धावणे सोडा: कपडे साधे असले तरी चालतील, पण तुमचे चरित्र आणि तुमची कमाई 'ब्रँडेड' असावी*
*वडिलांच्या कष्टाचा आदर करा: वडिलांनी आयुष्यभर कमावलेली 'इज्जत' ही तुमच्या कोणत्याही आयफोनपेक्षा महाग आहे. ती शाबूत ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे*

*निष्कर्ष:-*
*तरुण मित्रांनो, गॅझेट्स अपग्रेड करण्यापेक्षा स्वतःची 'औकात' (क्षमता) अपग्रेड करा. जेव्हा तुम्ही स्वतःला सक्षम बनवता, तेव्हा महागड्या वस्तू तुमच्या मागे येतात, तुम्हाला त्यांच्या मागे धावावे लागत नाही. ज्याच्या खिशात स्वतःच्या हक्काची कमाई आहे आणि डोळ्यात आई-वडिलांच्या स्वप्नांची चमक आहे, तोच खरा 'श्रीमंत'*
*बाकी सगळं 'चायनीज आयटम' आहे, आज आहे, उद्या नाही. त्यामुळे, आरशात सेल्फी पाहण्यापेक्षा आरशातल्या माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य द्या.....*🙏🙏🙏

09/03/2026

"डिंभे बु येथे जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा महोत्सव
सुमारे ७५०महिलांच्या उपस्थितीत सामाजिक संदेश देणारी रॅली संपन्न "

फुलवडे, ता ९ :डिंभे बु; (ता.आंबेगाव) सध्याच्या सोशल मीडियाच्या गतिमान युगात बचत गटातील महिलांनी परिचित किंवा अपरिचित व्यक्ती मार्फत पुढे येणाऱ्या कमी वेळात जास्त फायदा करून देणाऱ्या मनाला भुरळ घालणाऱ्या फसव्या योजनांच्या अमिषाला बळी पडू नये यामध्ये आर्थिक फसवणूक होऊ शकते असे प्रतिपादन घोडेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर पवार यांनी केले ते डिंभे बु येथे यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं सिध्द संघ आंबेगाव यांच्या मार्गदर्शनातून औदुंबरेश्वर महिला स्वयंसहाय्यता विभाग डिंभे बु; येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यशवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून सबल व सक्षम केले जात आहे हि अभिमानाची बाब आहे . संघ आपणासाठी करत असलेल्या कामाची पोचपावती भर उन्हातही आपल्या उपस्थितीवरून दिसत आहे अशा शब्दात महिलांना त्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच शंकरशेठ मिलखे, ग्रामविकास अधिकारी आशा मुंढे, यशवर्धिनी संघाचे कार्यकारी अधिकारी कुमार घोलप, अध्यक्षा योगिता बोऱ्हाडे, सचिव अलका घोडेकर, , प्रा माणिक बोऱ्हाडे,संघ पदधिकारी अलका डोंगरे, ललिता वर्पे ,उज्वला सोनवणे, संगिता कोळप, सविता चिखले, सुरेखा लोहकरे, हौसाबाई बांगर,लता उतळे, मंगल वाजे, सविता मुंढे, चंद्रभागा सुपे , शुभांगी रोकडे , शांताबाई थोरात, स्वाती जाधव, आशा बोऱ्हाडे, स्वाती मिलखे, संध्या डोंगरे राधा आरगीलवार, लक्ष्मी नीसाद,बिल्कस उबाळे यांच्यासह यशवर्धिनी संघाच्या लेखापाल कल्पना एरंडे,संघ कार्यकर्ते सुहास वाघ हरीभाऊ गेंगजे शिवाजी शेटे यांच्यासह भिमाशंकर पासून ते घोडेगाव पर्यंतच्या बचत गटांतील सुमारे ७५० महिला यावेळी उपस्थित होत्या.
याप्रसंगी महिला शक्तीला वंदन करताना अपेक्षा मुदगुण हि विद्यार्थिनी म्हणाली आम्ही नारी जगात भारी. त्या कळीला पण हक्क आहे जगण्याचा अगर फुल ही नहीं रहे धरतीपर फल काहाॅसे लोओगे और आपणा वंश तुम कहासे बढाओगे !
तत्पूर्वी शिवार फेरीतून संपूर्ण परिसर गजबजून गेला होता ढोल लेझीमच्या तालात फुल नहीं चिंगारी है हम भारत की नारी है,, महिला शक्तिचा.यशवर्धिनी संघाचा विजय असो घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी महिलांनी हातात घेतलेले स्वच्छता , पाण्याच्या काटकसरीने वापर, महिला अन्याय अत्याचार प्रतिबंध, प्लास्टिकचा कमी वापर इत्यादी सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले.
याप्रसंगी मंचर गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ दीप्ती साळी यांनी स्त्रीरोग गर्भाशय व स्तनांचे कॅन्सर निदान उपचार पद्धती व आरोग्य विषयक शासकीय योजनांची माहिती देऊन काही ग्रामीण भागातील महिलांच्या काही तपासण्या मोफत करण्याविषयी आश्वासित केले.
यावेळी यशवर्धिनी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या विविध उप्रकांची माहिती संघाचे कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी दिली. महिलांचे तालुका पातळीवरील संघटन एकजुटीमुळे ३५०० महिलांपर्यंत पोहचले असून त्या सर्व महिला विविध उद्योग व्यवसाय व शेतीपूरक जोड धंद्याच्या माध्यमातून वार्षिक ३० ते ४० कोटी रुपये पर्यंतची आर्थिक उलाढाल बचत गटाच्या माध्यमातून करत आहेत या नारी शक्तीला यावेळी सर्व उपस्थितांनी सलाम केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्रपाली साळवे होत्या तर सुत्रसंचलन व आभार अर्चना डोंगरे यांनी केले.

दैनिक लोकमत
20/12/2025

दैनिक लोकमत

आरी वर्क व आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कळंब
17/12/2025

आरी वर्क व आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कळंब

2002 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चँपियनशिपच्या स्पर्धेत अनिता अल्वारेझ या अमेरिकेच्या कलात्मक जलतरणपटुने पाण्या...
16/10/2025

2002 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चँपियनशिपच्या स्पर्धेत अनिता अल्वारेझ या अमेरिकेच्या कलात्मक जलतरणपटुने पाण्याखालचा एक अचुक, सुंदर, ग्रेसफुल परफॉर्मन्स दिला आणि एकदम शांतता पसरली. परफॉर्मन्स संपल्यावर ती नेहमीसारखी पाण्याबाहेर आली नाही. पाण्याखाली असतानाच अनिता बेशुद्ध झाली होती. काही सेकंद तिचं शरीर तरंगलं आणि नंतर हळूहळू बुडायला लागलं. हे सगळं तिला टाळ्यावाजवुन चिअरअप करणार्या प्रेक्षकांच्या आणि स्मित करणार्या जजेसच्या नजरेतून सुटलं.

ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीच्या लक्षात आली ती म्हणजे अनिताची कोच ऍंड्रिया फ्युएन्टेस. ती अनिताला चांगलं ओळखत होती त्यामुळे तिला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आणि क्षणाचाही विलंब न करता तिने नेसत्या कपड्यानिशी आणि बूट घातलेल्या अवस्थेतच पाण्यात उडी घेतली. जलतरण तलावाच्या तळाशी पोहोचून तिने अनिताचे निःचेतन शरीर वर काढले आणि अनिताचे प्राण वाचवले.

ऍंड्रियाने हे तिचं कर्तव्य म्हणून नाही तर अनिताला पूर्ण ओळखत असल्याने एका अंतःप्रेरणेने तिच्या काळजीपोटी केलं. यामुळे एका प्रश्नाने मन झपाटून जातंय: आपल्या आयुष्यात असं आपल्याला पूर्ण ओळखणारं कोण आहे की सगळं आलबेल आहे असं वर वर दिसत असताना तुम्ही बुडत आहात हे ज्याच्या लक्षात येईल?

अतिदुर्गम डोंगराळ भागात बचत गटातील सखुबाईचे श्री स्वामी समर्थ किराणा जनरल स्टोअर्स "बचतीचा गट तो हवा गं साथीला  एक एक रु...
04/10/2025

अतिदुर्गम डोंगराळ भागात बचत गटातील सखुबाईचे श्री स्वामी समर्थ किराणा जनरल स्टोअर्स

"बचतीचा गट तो हवा गं साथीला एक एक रुपया हवा गं साठवाया असा सखुबाई गेंगजे यांनी संदेश यावेळी ग्रामीण भागातील गरीब व गरजू बचत गटांतील महिलांना दिला आहे"

फुलवडे,ता३"गोहे बु"पाचेवड(ता.आंबेगाव) येथे यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं सिध्द संघ आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखालील क्रांतीज्योती महिला स्वयंसहाय्यता विभागातील चेडोबा महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील सखुबाई गेंगजे यांनी पुढाकार घेत सुरू केले छोटेसे श्री स्वामी समर्थ किराणा जनरल स्टोअर्स.
गोहे बु; च्या उंच डोंगरावर वसलेले पाचेवड येथे अत्यंत दुर्गम भाग जीवनावश्यक वस्तू खरेदी साठी नेहमीच तारेवरची कसरत करत डिंभा शिनोली घोडेगाव येथे जावे लागते अशावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बचत गटांतील महिलांनी गट मिटिंगमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार आपल्या गटातील महिलेने किराणा जनरल सुरू केले तर त्यामधून त्या महिलेला स्वयंरोजगार ही मिळेल आणि गटातील महिलांनाचीही धावपळ कमी होईल यासाठी आपल्याच गटातील महिलेच्या जनरल स्टोअर्स मध्येच चहा साखर तेल मीठ बिस्किट इत्यादी वस्तू आपल्या गटाच्या महिलेच्या छोट्याशा जनरल स्टोअर्स घेतल्या तर त्या महिलेला ही स्वयंरोजगार मिळेल शिवाय जीवनावश्यक वस्तू साठी करावी लागणारी तारेवरची कसरत काही प्रमाणात कमी होईल .
यावेळी यशवर्धिनीचे कार्यकारी अधिकारी कुमार घोलप लेखापाल कल्पना एरंडे संघ कार्यकर्ते सुहास वाघ हरीभाऊ गेंगजे शिवाजी शेटे यांच्यासह बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.

संघ वार्षिक सभा 21 वी
02/10/2025

संघ वार्षिक सभा 21 वी

दुःख सारे विसरून जाऊ,गोड-गोड बोलून आनंदाने राहु,नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..शुभ मकर संक्...
14/01/2025

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती..!

16/12/2024
चला पर्यावरणाला साथ देऊ या आपली छोटीशी कृती खूप मोठा बदल घडवू शकते
01/12/2024

चला पर्यावरणाला साथ देऊ या
आपली छोटीशी कृती खूप मोठा बदल घडवू शकते

माझी पोषण परसबाग
10/10/2024

माझी पोषण परसबाग

Address

Ghodegaon
Pune
412408

Telephone

+919075223344

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwardhini GMSS, Ambegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yashwardhini GMSS, Ambegaon:

Share