17/05/2025
शिंपी समाजातील सर्व पोटजातींचा राज्यस्तरीय वधु वर महामेळावा
पुणे:- नामदेव समाजोन्नती शाखा पुणे शहर यांच्या वतीने समाजाने समाजासाठी घेतलेल्या उपक्रमांतर्गत शिंपी समाजातील सर्व पोटजातीचा राज्यस्तरीय वधु वर महामेळाव्याचे भव्य आयोजन रविवार दिनांक १८ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे येथे करण्यात आले असून इच्छुंक प्रथम व पुनर्विवाह वधू-वर आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके यांनी केले आहे.
शिंपी समाजातील नामदेव, भावसार, अहिर, वैष्णव, तेलगू, माहेश्वरी, रंगारी, दर्जी, शिपा, कोकणस्थ अशा शिंपी समाजातील सर्व पोट जातींसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये इंजिनिअर, डॉक्टर, वकील, सीए, व्यावसायिक, परदेशस्थ, पदवीधर, दहावी बारावी उत्तीर्ण, विना पदवीधर तसेच प्रथम विवाह घटस्फोट नाममात्र घटस्फोटीत, कल्याणी दिव्यांग या सर्वांना सहभाग घेता येणार आहे. समाजाच्या एकतेसाठी पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आणि सूसंस्कारित विवाह संशोधनासाठी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी केले आहे.
नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. संजय नेवासकर कार्यक्रमाचे अध्यक्ष तर स्वागताध्यक्ष श्रीमती स्मिता वस्ते व डॉ. सुनीता पाटसकर, निमंत्रक दिलीपकुमार वायचळ व एकनाथ सदावर्ते असून रणजित माळवदे असून विजय कालेकर यांचेसह नामदेव समाजोन्नती परिषद, पिंपरी चिंचवड शहर शाखेचे सहकार्य लाभत आहे अशी माहिती सचिव सुभाष मुळे यांनी दिली आहे.