Unique Medical Foundation Pune 16

Unique Medical Foundation Pune 16 Charitable Trust (NGO) Registered Under 80G & 12A,CSR, Darpan, E- Anudan located in Janwadi, Gokhlenagar Pune16 sience 2007.

For Donate us see the details:
Bank:- Central Bank of India,
Branch :-Shivaji Nagar, Pune
Account no:- 3791953132
IFSC code:- CBIN0280656
MICR code:- 411016009

तिसरा श्रावणी सोमवार, दिनांक ३१/८/२०२६ रोजी "युनिक मेडिकल फौंडेशन" पुणे १६ तर्फे जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी, कोल्हापूर ...
03/09/2026

तिसरा श्रावणी सोमवार, दिनांक ३१/८/२०२६ रोजी "युनिक मेडिकल फौंडेशन" पुणे १६ तर्फे जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी, कोल्हापूर येथे नगर प्रदक्षिणेला आलेल्या भाविकांना पौष्टिक लाडूंचे, तसेच खारे शेंगदाण्यांच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच डोंगरावरील एका गरजूला औषधे व अन्नदान करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष -डॉ.सागर लोखंडे, उपाध्यक्ष सुभेदार -श्री मोहन शेलार, कार्याध्यक्ष- डॉ.राहुल लोखंडे, खजीनदार- सौ.मानसी लोखंडे, सहसचिव-सौ.सोनाली लोखंडे, कु.वासंती कोयाळीकर, सौ.शुभदा लोखंडे तसेच कु.स्वरा लोखंडे, सौ. मिना त्रिपुटे यांनी यात भाग घेतला व भाविकांबरोबर १६ किलोमीटर पायात चप्पल न घालता, खाली न बसता घालता ८ पवित्र कुंड (अष्टतिर्थ) आणि १२ ज्योतिर्लिंग दर्शन करीत नगर प्रदक्षिणा पूर्ण केली.

“प्रत्येक सणावर हक्क असतो प्रत्येक नात्याचा, आणि रक्षाबंधन असतो हक्क भावा-बहिणीच्या नात्याचा, रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्व...
28/08/2026

“प्रत्येक सणावर हक्क असतो प्रत्येक नात्याचा, आणि रक्षाबंधन असतो हक्क भावा-बहिणीच्या नात्याचा, रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!”

श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, जीवन सुख-समृद्धीने भरून जावो, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!जय श्री राम||
26/03/2026

श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, जीवन सुख-समृद्धीने भरून जावो, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!जय श्री राम||

"आंतरराष्ट्रीय योग दिवस" २१ जून २०२५ रोजी "युनिक मेडिकल फौंडेशन" पुणे १६ तर्फे साजरा करण्यात आला. या वर्षीची थिम होती "ए...
02/07/2025

"आंतरराष्ट्रीय योग दिवस" २१ जून २०२५ रोजी "युनिक मेडिकल फौंडेशन" पुणे १६ तर्फे साजरा करण्यात आला. या वर्षीची थिम होती "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग".
आजच्या या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले शरीर तंदरूस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करतात येतात. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खुप गरजेचे आहे. यासाठी जनवाडी येथे लहान मुलांच्या उपस्थितीत तसेच संस्थेच्या काही सभासदांनी मिळून योग दिवस साजरा केला.

जागतिक दुध दिन (मिल्क डे ) २२ एप्रिल २०२५ चे निमित्त साधून सामाजिक बांधिलकी जपत युनिक मेडिकल फौंडेशन पुणे १६ मार्फत या व...
28/06/2025

जागतिक दुध दिन (मिल्क डे ) २२ एप्रिल २०२५ चे निमित्त साधून सामाजिक बांधिलकी जपत युनिक मेडिकल फौंडेशन पुणे १६ मार्फत या वर्षीच्या थिम अंतर्गत "प्रत्येक ग्लास दूध हे उद्याच्या निरोगी दिशेने एक पाऊल आहे". यासाठी मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो हा या दिवसाचा मुख्य उद्देश होता.त्या साठी संस्थेतर्फे जनवाडी येथे १५ मुलांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला प्रत्येकाला एक दुधाची पिशवी व बिस्कीट पुडा, व कॅडबरी देण्यात आली त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

28/06/2025
'वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर' *"युनिक मेडिकल फौंडेशन पुणे १६"* गेली १८ वर्षे पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांना पुणे...
25/06/2025

'वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर'
*"युनिक मेडिकल फौंडेशन पुणे १६"* गेली १८ वर्षे पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांना पुणे व सासवड येथे मोफत औषधोपचार करीत असून, *शनिवार* (दि. २१-०६-२०२५) या दिवशी जनवाडी येथील विर बाजीप्रभू प्रशाला दिंडी क्र २४, कर्वेनगर येथील महालक्ष्मी मंदिर दिंडी क्र २८०, व दत्तवाडी येथील त्रिमूर्ती निवास व *सोमवार* (दि.२३-०६-२०२५) सासवड येथील संत सोपान काका समाधी मार्गावरील जगताप बंधू यांच्या येथे पंढरीच्या वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच संस्थेमार्फत वारकऱ्यांना चहा व बिस्किट खाद्यपदार्थ याचे वाटप करण्यात आले

या वर्षी १,६०० वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला यात एकूण १,२०० वारकऱ्यांना इंजेक्शन देण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सागर लोखंडे, उपाध्यक्ष सुभेदार श्री मोहन शेलार, कार्याध्यक्ष डॉ.राहुल लोखंडे, खजीनदार मानसी लोखंडे, सचिव श्री नारायण फणसे, सहकार्याध्यक्ष डॉ.सुप्रिया लोखंडे, डॉ.दिनेश हेडगिरे, डॉ.गणेश खाडे, डॉ.ओमकार थेटे, डॉ.शिखा शर्मा, डॉ.प्रणाली मेमाने, डॉ.माधुरी जगताप, डॉ प्रियांका प्रतिक मेमाने, वैशाली खंडागळे, वासंती कोयाळीकर, अक्षय नागरगोजे, श्री. केदार गोंजारी, रोहन किणिकर, संण्डे क्लब तर्फे सुनील भांडवलकर आणि त्यांची टीम, *सैनिक शाळा सातारा माजी विद्यार्थी संघटनेचे* अध्यक्ष श्री प्रकाश कदम यांनी उपयोगी औषधांची तसेच पेन किलर मलमांची मदत केली, श्री जयवंत कुंभार यांचे आयुष फार्मा,व विरपत्नी योगिता गिरीगोसावी यांचे कुणाल मेडिकल यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.

बृहनमहाराष्ट्रात जिल्हा विभाग, प्रांत विभाग, क्षेत्र संघटनमंत्री *श्री महेंद्र नथुराम वेदक (दादा वेदक)* या नावाने संघ परिवारात देशभरात परिचीत अशा व्यक्तीची सदिच्छा भेट सासवडच्या मेडिकल कॅम्पला झाली. त्यांनी स्वतः थांबून वारकऱ्यांना सेवा दिली व संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.

Earth Day 22 April 2025
22/04/2025

Earth Day 22 April 2025

"युनिक मेडिकल फाउंडेशन" पुणे १६, तर्फे सेंट. क्रिस्पिनज मराठी चर्च नळ स्टॉप, एरंडवणे पुणे ४ येथे अनाथाश्रमातिल मुलींची २...
26/03/2025

"युनिक मेडिकल फाउंडेशन" पुणे १६, तर्फे सेंट. क्रिस्पिनज मराठी चर्च नळ स्टॉप, एरंडवणे पुणे ४ येथे अनाथाश्रमातिल मुलींची २५ मार्च २०२५ रोजी, सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते, यात सर्वांचे हिमोग्लोबिन चेक करून गरजेनुसार रक्त वाढिसाठी गोळ्या देण्यात आल्या, सर्वांना जंतनाशक (डेव्हर्म) गोळ्या देण्यात आल्या, तसेच किरकोळ आजारासाठी (सर्दी, ताप, खोकला, खाज) इत्यादींसाठी एकुण १०८ मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये डॉ सागर लोखंडे, डॉ राहुल लोखंडे, डॉ ओमकार तिठे, डॉ शिखा शर्मा, नर्स संगिता शिल तसेच डॉ गणेश खाडे, यांनी याचे नियोजन केले. सौ.अलका चांदोरीकर वॉर्डन, व पुजा मोकर नर्स यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

*जागतिक जल दिनानिमित्त* पाण्याचे महत्त्व जाणा, पाण्याचा गैरवापर टाळापाणी वाचवा, स्वतःला वाचवा
22/03/2025

*जागतिक जल दिनानिमित्त*
पाण्याचे महत्त्व जाणा, पाण्याचा गैरवापर टाळा
पाणी वाचवा, स्वतःला वाचवा

Address

259, Janwadi
Pune
411016

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unique Medical Foundation Pune 16 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share