05/06/2026
#मनःपूर्वक_आग्रहाचे_निमंत्रण
काही आयुष्यांना फक्त आसऱ्याची गरज असते...आणि काही निराधार जीवांना सुरक्षिततेच्या एका छताची...
अशाच निराधार, वंचित, बेघर व गरजू महिला आणि बालकांच्या जीवनात मायेचा स्पर्श, आधाराचा हात आणि नव्या आशेचा प्रकाश देणारी "*आश्रय*" संस्था आज एका नव्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
या स्वप्नाच्या उभारणीचा पवित्र क्षण...
#नवीन_जागेचे_भूमिपूजन व #वृक्षारोपण_समारंभ**
📅 **रविवार, दि. ०७ जून २०२६**
🕕 **सायंकाळी ६.०० वाजता**
*ठिकाण* पिंपरी दुमाला (रांजणगाव गणपती पासून ३ कि.मी अंतर) ता. शिरूर जि. पुणे.
🌹**मा. पै. डॉ. तानाजी (भाऊ) जाधव**
*संस्थापक अध्यक्ष, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य* यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या भूमिपूजनात केवळ एका इमारतीचा पाया रचला जाणार नाही, तर अनेक निराधार माता-भगिनीं व बालकांच्या सुरक्षित, सन्माननीय आणि आनंदी भविष्याचा पाया घातला जाणार आहे.
आपली उपस्थिती ही फक्त पाहुण्याची उपस्थिती नसून, ती या सेवायज्ञाला मिळणारी ताकद, आशीर्वाद आणि मानवतेप्रती असलेली आपली बांधिलकी असेल.
म्हणूनच आपण सहकुटुंब, स्नेहीजनांसह उपस्थित राहून या सेवाकार्याच्या पवित्र प्रवासाचे साक्षीदार व्हावे व आपल्या शुभेच्छांनी हा क्षण अधिक संस्मरणीय करावा, ही मनापासून विनंती.
🙏 *"जिथे माणुसकीचा हात पुढे येतो, तिथेच आशेची नवी पहाट उगवते..."* 🙏
*आपले नम्र,*
*आश्रय परिवार*
*९८८१५०७६५०*