Samyak- A Communication and Resource Centre

Samyak- A Communication and Resource Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samyak- A Communication and Resource Centre, Non-Governmental Organization (NGO), Pune.

We are a Communication and Resource Centre on Gender, Masculinity, Health and Development
Follow us on https://twitter.com/india_samyak
https://www.instagram.com/samyak_india/?hl=en

सम्यकने नुकतेच MIT-ADT विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च’च्या अभ्यासकांसोबत ‘Masculinities’ विषयी सत्र घेतले...
10/05/2026

सम्यकने नुकतेच MIT-ADT विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च’च्या अभ्यासकांसोबत ‘Masculinities’ विषयी सत्र घेतले. संस्थेसोबत सम्यकची औपचारिक भागीदारी आहे. डॉ. प्रिया सिंग आणि डॉ. नीता महावन यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली. इंग्रजीतून झालेल्या या सत्रामध्ये Masculinities बाबत सैद्धांतिक मांडणी करण्यात आली. सोबत हिंदी आणि मराठी भाषेचाही मुद्दाम वापर केला गेला. Very intense experience!

पण यानिमित्ताने काही मुद्दे पुन्हा इथे थोडक्यात मांडावेसे वाटतात —

‘Masculinities’ विषयीची चर्चा अनेकदा NGO पद्धतीचे प्रशिक्षक सैद्धांतिक पातळीवर करीत नाहीत. त्याऐवजी या विषयाची मांडणी “बघा, पुरुषांचे असे आणि पुरुषांचे तसे; त्यांना रडता येत नाही आणि अरेरे, त्यांना व्यक्त होता येत नाही; पुरुष यांव करतात आणि पुरुष त्यांव करतात; पुरुषांनी असे वागावे आणि तसे वागू नये” अशी वर्णनात्मक आणि भावनिक पातळीवर केली जाते. त्यामुळे “पुरुषत्व” हा विषय आणि संकल्पना केवळ ‘पुरुषांबाबत’ बोलण्यापुरतीच मर्यादित राहते असे मला वाटते. अर्थात, सहभागींना यातून काहीतरी मदत होतेच, मात्र अशा मर्यादित मांडणीमुळे त्यांची सैद्धांतिक समज आणि विश्लेषण तयार होतेच असे नाही. ‘लिंगभाव’ हा विषय शिकवताना देखील अनेकदा हेच घडते. त्यातून सहभागींची ‘theoretical’ समज तयार होईलच असे नाही, ते केवळ भाषा शिकण्याची शक्यता अधिक!

वास्तविक पाहता Masculinities ची चर्चा पुरुषांविषयीच्या चर्चेपलीकडे जाण्याची गरज आहे. दक्षिण आशियात तर masculinities हा विषय अनेकजण ‘R. W. Connell’ या ऑस्ट्रेलियन समाजशास्त्रज्ञाच्या पलीकडेही मांडताना दिसत नाहीत. वास्तविक पाहता आपण ज्या व्यामिश्र (complex) सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-भांडवली वास्तवात जगतो ते पाहता दक्षिण आशियाई संदर्भात तर ही चर्चा कितीतरी पुढे आणि खोल जाण्याची गरज आहे.

शिवाय, masculinities या विषयाची सैद्धांतिक मांडणी करण्यासाठी सुलभ स्थानिक भाषाही विकसित झाली पाहिजे. एखादा विषय इंग्रजी भाषेतून मांडला की उगाचच जास्त theoretical वाटतो असाही एक गैरसमज प्रचलित आहे; त्यालाही छेद दिला गेला पाहिजे. इंग्रजी आणि स्थानिक भाषेच्या एकत्रित वापरातूनही, विषयाचे गांभीर्य न घालवता, या विषयी सुलभ मांडणी करता येणे शक्य आहे असा आमचा आजवरचा अनुभव आहे.

•॰ तुकाईनगर स्टोरीज ॰•  अंतर्गत आज आम्ही सम्यकमध्ये इंटर्नशिप केलेल्या काही ‘विद्यार्थ्यांची’ मनोगते इथे देत आहोत. अर्था...
02/04/2026

•॰ तुकाईनगर स्टोरीज ॰•

अंतर्गत आज आम्ही सम्यकमध्ये इंटर्नशिप केलेल्या काही ‘विद्यार्थ्यांची’ मनोगते इथे देत आहोत. अर्थात, या पैकी अनेकजण आता व्यावसायिक दृष्ट्या मोठे काम करीत आहेत.

इंटर्न्ससाठी तुकाईनगर ही वस्ती केवळ एक ‘फील्ड साईट’ नव्हती. वेगवेगळ्या विषयशाखेत शिकणारे विद्यार्थी इथे आले, वस्तीकडून शिकले आणि वस्तीतील लोकांमध्ये रमले सुद्धा. ते इथे केवळ शिकले नाहीत तर माणूस म्हणूनही घडले. प्रत्येकाचा शिकण्याचा प्रवास आणि अनुभव वेगळे असले तरी त्यांतील दुवा मात्र कायम राहीला आणि तो म्हणजे इंटर्न्सच्या आवडीनिवडीचा विचार करून ठरवलेले प्रकल्प, एकत्रितपणे केलेले काम, परस्पर सन्मान आणि वस्तीतील लोकांशी मैत्री.

ज्यांच्याशी लगेच संपर्क होवू शकला अशा काही इंटर्न्सचे प्रातिनिधिक अनुभव इथे देत आहोत. तुम्हाला आवडतील ही अपेक्षा.

“सक्षमीकरण झालेल्या स्त्रियांना सामाजिकदृष्ट्या बढती मिळत नाही, किंबहुना त्यांचे सबलीकरण अनेकांना ‘जड’ जाते. सक्षमीकरण ह...
25/03/2026

“सक्षमीकरण झालेल्या स्त्रियांना सामाजिकदृष्ट्या बढती मिळत नाही, किंबहुना त्यांचे सबलीकरण अनेकांना ‘जड’ जाते. सक्षमीकरण होवून स्त्रिया वेगळ्या ग्रहावर जात नाहीत; त्या इथेच राहतात ज्या समाजात पितृसत्ता आणि पुरुषप्रधानता आहे. त्यामुळे स्त्रियांचे स्वातंत्र्य, सक्षमीकरण ‘पचनी’ पडेल असे पुरुषमन तयार झाले पाहिजे” या विचाराने सन २०१० पासून सम्यकने बचतगट आणि गावपातळीवर काम करणाऱ्या आरोग्य कार्यकर्त्यांच्या पुरुषांचे मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले.

स्वयंसेवी संस्थांचे काम महत्त्वाचे आणि दिशादर्शक असले तरी त्याला व्याप्तीच्या मर्यादा असल्याचे उघडच आहे. त्यामुळे हा दृष्टीकोन आर्थिक सक्षमीकरणाच्या व्यापक कार्यक्रमाचा भाग असणे गरजेचे होते. म्हणून सम्यकने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) कार्यक्रमांतर्गत हा विचार मांडायला सुरुवात केली. सन २०१२ ते २०१४ पर्यंत आम्ही माविमच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातील अक्षरशः सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे, प्रत्येक जिल्ह्याच्या टीमचे आणि CMRC व्यवस्थापकांचे या विषयी प्रशिक्षण केले. त्यातूनच पुढे दशकभरापूर्वी “माविम” साठी तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत “पुरुषांसोबत संवाद हवा” ही प्रशिक्षण मार्गदर्शिका तयार झाली व तिचा राज्यभर वापर सुरू झाला. त्यानंतर माविमचा ‘नव तेजस्विनी’ कार्यक्रम सुरू झाला. गावागावात ‘माविम मित्र मंडळ’ असावे ही कल्पना यातून पुढे आली. हे मित्र मंडळ नेमके काय करेल याबाबत विचारविनिमय होवून सम्यकने ‘माविम मित्र मंडळांसाठी’ आणखी एक प्रशिक्षण कार्यक्रम आखला आणि एक नवीन मार्गदर्शिका प्रकाशित केली. आज पुरुषांसोबत प्रशिक्षणे करणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच प्रशिक्षकांनी या काळात सम्यकने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणांमध्ये काम केले.

सुरुवातीला या प्रशिक्षणांमध्ये येणाऱ्या पुरुषांची संख्या कमी असे. महाराष्ट्रभरात अंदाजे १८०० पुरुषांसोबत सुरुवातीला प्रशिक्षणे घेतली गेली, त्यांच्या उपयुक्ततेचा आणि प्रभावीपणाचा अभ्यास केला गेला व या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली गेली. माविमच्या अधिकारी, राज्याच्या कार्यक्रम व्यवस्थापक, विभागीय अधिकाऱ्यांनी, जिल्हा समन्वयकांनी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व CMRC च्या लोकांनी खूप कष्ट घेतले. आज एक तपानंतर ‘माविम मित्र मंडळ’ कार्यक्रमाचे स्वरूप अधिक स्पष्ट झालेले आहे, व्याप्ती वाढली आहे आणि सहभागी पुरुषांची संख्या आणि उत्साह दोन्ही कित्येक पटीने वाढलेला दिसून येत आहे. आता मावीम मित्र मंडळाचे सदस्य पुरुष विविध प्रशिक्षणांना आणि कार्यक्रमांना गर्दी करीत आहेत. आज १०-१२ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर राज्याच्या एका अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमात पुरुषांना संवेदनशील व जबाबदार बनविण्याच्या कार्यक्रमाचा अंतर्भाव झालेला आहे. देशात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे जिकडे शासन इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतःची मानवी व आर्थिक संसाधने लावून पुरुषांसोबत लिंगभाव समानतेचे काम करीत आहे.

याच कामाचा नियमित भाग म्हणून नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत सम्यकच्या टीमने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘माविम मित्र मंडळांच्या’ प्रमुख सदस्यांची प्रशिक्षणे घेतली. यामध्ये नाशिक, सोलापूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा १९ जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षणे घेतली गेली. पैकी काही जिल्ह्यात एकाहून जास्त बॅचेस झाल्या. यामध्ये लिंगभाव, पितृसत्ता, जेंडर-ट्रान्सफॉर्मेशन दृष्टिकोन म्हणजे काय आणि ‘माविम मित्र मंडळ’ म्हणून आपण एकत्रितपणे गावांमध्ये आता काय काय करू शकतो या मुद्द्यावर भर देण्यात आला.

जिथे वेळेअभावी ‘सम्यक’ पोहोचू शकले नाही त्या जिल्ह्यांमधे इतर प्रशिक्षकांनी ही प्रशिक्षणे घेतली.

या प्रशिक्षणांना उपस्थित राहणाऱ्या पुरुषांचे ‘प्रोफाईल’ खूपच वेगळे असते. त्यातील बहुतेक पुरुष हे आधीपासूनच सार्वजनिक जीवनात समाजाला उपयुक्त असे काम करीत असतात. काहीजण शेतकरी, व्यापारी असतात तर काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी, शिक्षक, पोलीस पाटील असतात. गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले तरुण देखील अनेकदा यात सहभागी होतात. आज पुरुषांसोबत व्यापक पातळीवर सुरू असलेला ‘माविम मित्र मंडळ’ हा देशातील एकमेव कार्यक्रम आहे हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

सम्यकने महाराष्ट्रभर ‘माविम मित्र मंडळांसोबत’ घेतलेल्या यंदाच्या प्रशिक्षणांची काही क्षणचित्रे इथे देत आहोत.

Students from the Geography Department of Sir Parashurambhau (SP) College, Pune, completed a two-month internship at SAM...
25/03/2026

Students from the Geography Department of Sir Parashurambhau (SP) College, Pune, completed a two-month internship at SAMYAK under the (Intersectional-Interdisciplinary Internships) programme. During this period, they conducted a research study on the use of firewood in households living on hillslopes in Pune and its impact on women’s overall lives, especially their sexual and reproductive health.

To share their findings with the media, SAMYAK organised a press conference for them yesterday at Patrakar Bhavan, Pune. The students confidently addressed their first ever press conference.

Through this process, students gained practical learning in research, fieldwork, and presenting in a press conference. They highlighted that 43% of households in these areas still use firewood for daily fuel. They also spoke about firewood dependency and lack of clean energy, linking it to Sustainable Development Goals (SDGs). They noted that rising LPG prices in the current global situation could make this issue more serious.

SAMYAK appreciates the initiative, confidence, and efforts shown by the students. A few media reports and photos from the press conference are shared here.


पंचायत समिती, जामखेड आणि ग्रामीण विकास केंद्र यांच्या सोबत आज जामखेड येथे तालुक्यातील भटक्या विमुक्त समुदायातील महिला सा...
06/01/2026

पंचायत समिती, जामखेड आणि ग्रामीण विकास केंद्र यांच्या सोबत आज जामखेड येथे तालुक्यातील भटक्या विमुक्त समुदायातील महिला सामाजिक कार्यकर्त्या, एकल महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य कार्यकर्त्या यांच्यासोबत सम्यकने "जेंडर (लिंगभाव समानता) व महिलांचे प्रजनन आरोग्य हक्क" एकदिवसीय मेळावा घेतला.

या मेळाव्यात २५०+ स्त्रियांनी सहभाग घेतला. भटक्याविमुक्त समाजातील स्त्रियांच्या लैंगिक व प्रजनन आरोग्य हक्कांचा दुर्लक्षित मुद्दा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याचे व हाताळण्याचे काम सम्यक मागील दशकभरापासून करत आले आहे. या प्रयत्नांना आता एक निश्चित आकारउकार येत आहे.

We facilitated two sessions on gender and masculinity today—one with the Centre for Excellence in Gender Justice at Woxs...
19/11/2025

We facilitated two sessions on gender and masculinity today—one with the Centre for Excellence in Gender Justice at Woxsen University, Hyderabad, and another with Sinhgad Institute of Pharmacy, Lonavala. What a meaningful way to return to field activities after a long and enriching tour of Colombia!
We used the occasion of International Men’s Day to shift the narrative: instead of celebrating stereotypical ideas of manhood, we encouraged participants to reflect on their patriarchal privileges and to question the problematic notions of masculinity that often harm not just others, but men themselves.
SAMYAK also entered into an MoU with the Sinhgad Institute of Pharmacy, marking the beginning of collaborative work with them on issues of gender and SRHR.

•• SDG online Course Inauguration •• The online Certificate Course on “Sustainable Development Goals: The Indian Context...
06/11/2025

•• SDG online Course Inauguration ••

The online Certificate Course on “Sustainable Development Goals: The Indian Context (Marathi)” was launched today in collaboration with the Atal Bihari Vajpayee Institute of Policy Research and International Studies (AIPRIS) and The Maharaja Sayajirao University of Baroda, Vadodara.

The inaugural session was graced by Prof. Bhalchandra M. Bhanage, Hon’ble Vice-Chancellor, MSU, who attended the full session. Prof. Amit Dholakia (Director, AIPRIS) welcomed the participants, Prof. Yogesh V. Gokhale introduced the course, Anand Pawar (SAMYAK, Pune) shared special remarks, and Mr. Sunil Dadhe delivered the inaugural lecture.

At SAMYAK, decentralizing and democratising knowledge for those who do the actual work, beyond its traditional gatekeepers, is a political act. Offering such certified courses in regional languages affirms the dignity of grassroots learning and moves beyond symbolic appreciation toward real recognition.

In this spirit, SAMYAK has also initiated certification-based institutes for grassroots actors on Media, Journalism, and SRHR.

#अभ्यासक्रम #प्रमाणपत्र

॰• Celebrating 18 Years of SAMYAK – Entering Our 19th Year!  •॰In 2007, we had hoped to register SAMYAK on October 2nd, ...
03/10/2025

॰• Celebrating 18 Years of SAMYAK – Entering Our 19th Year! •॰

In 2007, we had hoped to register SAMYAK on October 2nd, Gandhi Jayanti, a day that carries the values of peace and justice. Since it was a public holiday, our formal journey began on October 3rd, 2007.

Today, on our 18th Foundation Day, as we step into our 19th year, we reflect with gratitude on a journey built on resilience, collaboration, and a shared commitment to social justice. From working with medical professionals, public healthcare providers, CSOs, media, academia, and elected women representatives of PRIs, to nurturing feminist perspectives on Gender, Masculinities, SRHR and Development, our path has been shaped by collective spirit.

We owe this journey to our Board Members, communities we work with, staff-team, partners, mentors, collaborators, vendors, transporters, auditors, and above all, our Donors, whose faith and solidarity made it possible.

With resilience and gratitude, we move forward and are ready for the challenges and possibilities of our 19th year.

✨ On International Safe Abortion Day 2025, SAMYAK organised a meaningful workshop with young media professionals and stu...
28/09/2025

✨ On International Safe Abortion Day 2025, SAMYAK organised a meaningful workshop with young media professionals and students at the Department of Mass Communication and Journalism, Savitribai Phule Pune University.

Through engaging discussions, we explored the critical role of media in shaping public narratives around safe abortion as life-saving healthcare. The participation and reflections of budding journalists reaffirmed that informed, responsible, and sensitive reporting can break myths, reduce stigma, and ensure access to rights-based healthcare information.

A big thank you to all the students and participants who contributed their energy and perspectives. Together, we take one more step towards building a society where safe abortion is recognised as essential healthcare and a fundamental right.


मराठवाडा मुक्ती दिनाच्या आठवड्यातच ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड’ येथे ‘लिंगभाव, पितृसत्ता आणि लैंगिक...
24/09/2025

मराठवाडा मुक्ती दिनाच्या आठवड्यातच ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड’ येथे ‘लिंगभाव, पितृसत्ता आणि लैंगिकता’ या विषयी एक कार्यशाळा घेण्यासाठी जाता आले हे मी माझे सौभाग्य समजतो. या दोन दिवसाच्या कार्यशाळेत समाजशास्त्र, स्त्री अभ्यास केंद्र, समाजकार्य, भाषा व साहित्य, मानसशास्त्र आदि विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक मंडळी सहभागी झाले होते.

या निमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालक डॉ. शालिनी कदम यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोलताना कुलगुरू म्हणाले, “इथले विद्यार्थी कणखर आहेत. निजामाशी लढून स्वातंत्र्य मिळवलेल्या या पिढ्या आहेत. इथला प्रत्येक विद्यार्थी हा हिराच आहे. योग्य मार्गदर्शनाने ते निश्चितच लकाकतील याची आम्हाला खात्री आहे.”

महाराष्ट्रातील प्रशासन, पत्रकारिता, माध्यमे, कला, साहित्य, राजकारण, समाजकारण, चळवळी अशा विविध आघाड्यांवर मराठवाडा, विदर्भ आणि इतर ग्रामीण-निमशहरी भागांमधून आलेल्या व्यक्तीच तर खरे प्रभावी काम करत आहेत हे वास्तव आहे. मागील दशकभरामध्ये ‘सम्यक’ देखील मुंबई-पुणेतर विद्यापीठांमधे व इतर शैक्षणिक संस्थापर्यंत आवर्जून पोहोचत आहे. वर्चस्ववादाला पर्याय शोधण्याचा, न्याय्य दृश्यतेचा आणि प्रतिनिधित्वाचा हा मुद्दा आहे असे आमचे मत आहे.

नांदेड मधील या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये आम्हांला वेगळीच भूक आणि चमक जाणवली. विषयांच्या सैद्धांतिक मांडणीवर, संदर्भासहित चर्चेवर, अभ्याससाहित्यावर आणि विषयांची व्यामिश्रता संभाळून सुलभ चर्चेवर कार्यशाळेचा भर होता. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासोबत सम्यकचा हा प्रवास पुढेही असाच सुरू राहणार आहे.

Address

Pune
411051

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm

Telephone

+919850516237

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samyak- A Communication and Resource Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samyak- A Communication and Resource Centre:

Share