ACE EQAL

Directions Website

ACE EQAL Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ACE EQAL, Non-Governmental Organization (NGO), Deccan, Pune.

Assessment and Capability Building for Excellence: Entrant-Qualifier-Aspirant-Leader (ACE-EQAL) is an initiative of Vivek Vyaspeeth, working with grassroots organizations to deliver long-term sustainable impact.

सामाजिक संस्था सक्षमीकरण प्रकल्प

ACE-EQAL | संस्थात्मक सक्षमतेकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल!ACE-EQAL च्या तिसऱ्या तुकडीतील प्रशिक्षण प्रवासात दिनांक १२ सप्...
12/09/2026

ACE-EQAL | संस्थात्मक सक्षमतेकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल!

ACE-EQAL च्या तिसऱ्या तुकडीतील प्रशिक्षण प्रवासात दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सामाजिक संस्थांच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रशासन, सुशासन आणि कायदे अनुपालन या विषयांवर दोन विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले.

पहिल्या सत्रात ‘सामाजिक संस्थांचे प्रशासन आणि धोरणे (Governance and Policies for NGOs)’ या विषयावर जयंत काकतकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेची सक्षम प्रशासन व्यवस्था, भूमिका व जबाबदाऱ्या, धोरणांची आवश्यकता आणि पारदर्शक व उत्तरदायी कार्यपद्धती याबाबत सहभागी संस्थांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यानंतर ‘सामाजिक संस्थांसाठी कायदे अनुपालन (Legal Compliances for NGOs)’ या विषयावर Adv. वृषाली दातार यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक संस्थांना लागू असणाऱ्या विविध कायदेशीर व वैधानिक बाबी, आवश्यक अनुपालने आणि संस्थात्मक जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांवर या सत्रात प्रकाश टाकण्यात आला.

दोन्ही सत्रांमध्ये सहभागी संस्थांचा सक्रिय सहभाग, प्रश्नोत्तर आणि अनुभवांची देवाणघेवाण यामुळे प्रशिक्षण अधिक संवादात्मक आणि उपयुक्त ठरले.

📍 स्थळ: स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे
📅 दिनांक: १२ सप्टेंबर २०२६

Allstate Social Impact Awards 2026 | सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या कल्पनांचा सन्मानACE-EQAL – NGO Capability Building ...
02/09/2026

Allstate Social Impact Awards 2026 | सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या कल्पनांचा सन्मान

ACE-EQAL – NGO Capability Building Programme अंतर्गत Vivek Vyaspeeth आणि Allstate India Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने Batch 1 (2024–25) आणि Batch 2 (2025–26) मधील सहभागी स्वयंसेवी संस्थांसाठी Allstate Social Impact Awards 2026 आयोजित करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांच्या प्रभावी कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. याअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 संस्थांना प्रत्येकी ₹2 लाखांचे Seed Funding देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पांची सुरुवात करता येईल.

अर्ज प्रक्रियेनंतर 9 संस्थांची अंतिम सादरीकरण फेरीसाठी निवड करण्यात आली. ही अंतिम सादरीकरण फेरी 1 सप्टेंबर 2026 रोजी Allstate India कार्यालय, खराडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.

या फेरीत सर्व 9 संस्थांनी आपापल्या प्रकल्पांचे सादरीकरण Allstate च्या मान्यवर Kuldeep Singh, Nilesh Shinde आणि Sandeep Parande यांच्या परीक्षक मंडळासमोर केले.

परीक्षकांनी आपल्या अनुभवातून विचारलेले अभ्यासपूर्ण प्रश्न, दिलेला मौल्यवान अभिप्राय आणि सुचवलेल्या सुधारणा यामुळे सहभागी संस्थांना त्यांच्या प्रकल्पांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि आपल्या कल्पना अधिक सक्षम करण्याची संधी मिळाली.

ही अंतिम सादरीकरण फेरी केवळ निवडीची प्रक्रिया नव्हती; तर संस्थांना कॉर्पोरेट वातावरणात आपले कार्य मांडण्याचा, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व अभिप्राय घेण्याचा, आपली दृश्यमानता वाढवण्याचा आणि स्वतःवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण अनुभव होता.

🏆 Allstate Social Impact Awards 2026 – विजेते

🥇 Manthan Foundation
🥇 Jayatu Social Foundation
🥇 Lokvikas Social Foundation
🥇 Bharatiya Stree Shakti Jagaran
🥇 Seva Arogya Foundation

या पाचही संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल Allstate Social Impact Awards 2026 – Winner Trophy प्रदान करण्यात आली असून, त्यांना त्यांच्या पायलट प्रकल्पासाठी प्रत्येकी ₹2 लाखांचे Seed Funding मिळणार आहे.

🥈 उपविजेते (Runner-up)

• Edignite Foundation
• SpacECE India Foundation
• Yugaan Foundation
• Lokvikas Mandal

या चार संस्थांना त्यांच्या प्रभावी सहभाग आणि प्रकल्प सादरीकरणासाठी Allstate Social Impact Awards 2026 – Runner-up Trophy प्रदान करण्यात आली.

Allstate Social Impact Awards हा केवळ निधी देण्याचा उपक्रम नाही. या माध्यमातून संस्थांना मार्गदर्शन, अनुभव, सकारात्मक अभिप्राय, शिकण्याची संधी, दृश्यमानता आणि आत्मविश्वास मिळतो. अशा संधी सामाजिक संस्थांना आपल्या कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामाजिक प्रभाव अधिक व्यापक करण्यासाठी प्रेरणा देतात.

या अर्थपूर्ण व्यासपीठाची निर्मिती आणि सातत्यपूर्ण सहकार्य केल्याबद्दल Seema Suman, Shibu Zacharia, Jyoti Gupta, Praveen Menon, Sannidhi Vyas तसेच संपूर्ण Allstate India टीमचे मनःपूर्वक आभार! 🙏

सर्व विजेते, उपविजेते आणि सहभागी संस्थांचे हार्दिक अभिनंदन! 🎉👏

विवेक व्यासपीठ आणि Allstate India यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी Allstate India, खराडी  येथील कार्यालयात F...
26/08/2026

विवेक व्यासपीठ आणि Allstate India यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी Allstate India, खराडी येथील कार्यालयात Flash Consulting Initiative यशस्वीरित्या पार पडला.

या उपक्रमात ९ स्वयंसेवी संस्था आणि Allstate India चे ४० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते . संस्थांनी त्यांच्या सद्य आव्हानांची मांडणी केली, तर स्वयंसेवकांनी आपल्या व्यावसायिक अनुभव आणि कौशल्याच्या आधारे त्यावर व्यावहारिक व कृतीशील उपाय शोधण्यासाठी संस्थांसोबत चर्चा आणि विचारमंथन केले.

या संवादातून स्वयंसेवकांना सामाजिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव समजून घेता आला, तर संस्थांना नव्या दृष्टिकोनातून आपल्या आव्हानांकडे पाहण्याची संधी मिळाली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी Shibu Zacharia, Seema Suman, Sannidhi Vyas, Jyoti Gupta, Pravin Menon, CSR टीम आणि Allstate India च्या सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार! 🙏

एकत्रित अनुभव, कौशल्य आणि विचारांची देवाणघेवाण यातूनच प्रभावी बदलाची सुरुवात होते! ✨

कल्पनेपासून प्रभावी प्रकल्पाकडे… एकत्रित प्रयत्नांची वाटचाल!ACE-EQAL Seed Funding उपक्रमांतर्गत दुसऱ्या फेरीसाठी निवड झा...
21/08/2026

कल्पनेपासून प्रभावी प्रकल्पाकडे… एकत्रित प्रयत्नांची वाटचाल!

ACE-EQAL Seed Funding उपक्रमांतर्गत दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या सहभागी संस्थांसाठी Allstate India च्या स्वयंसेवकांसोबत विशेष Volunteer Engagement Activity आयोजित करण्यात आली.

या उपक्रमामध्ये Allstate च्या स्वयंसेवकांनी सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या प्रकल्प कल्पना आणि सादरीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

या संवादातून स्वयंसेवकांनी प्रकल्पाचा उद्देश, समस्या मांडणी, अपेक्षित परिणाम, अंमलबजावणीची रूपरेषा तसेच प्रकल्प सादरीकरण अधिक स्पष्ट, सुटसुटीत आणि प्रभावी करण्यासाठी आपला व्यावसायिक अनुभव व दृष्टिकोन सहभागी संस्थांसोबत शेअर केला.

कॉर्पोरेट स्वयंसेवकांचा अनुभव आणि सामाजिक संस्थांचे तळागाळातील कार्य यांचा हा सुंदर संगम, सहभागी संस्थांना त्यांच्या कल्पनांना अधिक सक्षम आणि परिणामकारक प्रकल्पांमध्ये विकसित करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

ACE-EQAL अंतर्गत Seed Funding ही केवळ आर्थिक मदतीची संधी नसून, सहभागी संस्थांना मार्गदर्शन, क्षमता बांधणी, हँडहोल्डिंग आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून शिकण्याची संधी देणारी एक व्यापक प्रक्रिया आहे.

स्वातंत्र्य हा श्वास, अभिमान हा वारसा;एकजूट ही ताकद आणि प्रगती हा आपला मार्ग! 🇮🇳१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक श...
15/08/2026

स्वातंत्र्य हा श्वास, अभिमान हा वारसा;
एकजूट ही ताकद आणि प्रगती हा आपला मार्ग! 🇮🇳

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨

स्वातंत्र्य आपल्याला केवळ अधिकार देत नाही, तर समाजाप्रती आपली जबाबदारीही अधोरेखित करते.

समानता, एकता, समावेशकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या मूल्यांवर आधारित सक्षम समाज घडवणे ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.

या स्वातंत्र्यदिनानिमित्त विवेक व्यासपीठ आणि ACE-EQAL टीम तर्फे सर्व देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳

चला, या शुभदिनी सक्षम संस्था, सशक्त समाज आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत राहण्याचा संकल्प करूया.

जय हिंद! जय भारत! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन

🎯 ACE-EQAL Batch 3 | पहिले प्रशिक्षण सत्र – सामाजिक संस्थांचे  व्हिजन मिशन🎯ACE-EQAL च्या बॅचच्या  प्रशिक्षण प्रवासाची सु...
03/08/2026

🎯 ACE-EQAL Batch 3 | पहिले प्रशिक्षण सत्र – सामाजिक संस्थांचे व्हिजन मिशन🎯

ACE-EQAL च्या बॅचच्या प्रशिक्षण प्रवासाची सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक संस्थांचे व्हिजन - मिशन या विषयाने झाली.

या सत्रासाठी अनुभवी मार्गदर्शक विंदा बाळ यांनी संस्थेची दिशा, उद्दिष्टे आणि मूल्ये यांचे महत्त्व अत्यंत प्रभावी पद्धतीने उलगडून सांगितले.

कोणतीही संस्था केवळ प्रकल्प राबवून मोठी होत नाही, तर स्पष्ट ध्येय (Vision), ठोस उद्दिष्टे (Mission) आणि मजबूत मूल्यव्यवस्था (Values) यांच्या आधारावरच दीर्घकालीन सामाजिक परिवर्तन घडवू शकते. याच विचारातून सहभागी संस्थांना आपल्या संस्थेच्या मूलभूत ओळखीचा पुनर्विचार करण्याची आणि भविष्यासाठी स्पष्ट दिशा निश्चित करण्याची संधी या सत्रातून मिळाली.

सत्रादरम्यान सहभागी संस्थांनी गटचर्चा, चिंतनपर उपक्रम आणि प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून आपल्या संस्थेचे Vision आणि Mission अधिक परिणामकारकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी आपले अनुभव, आव्हाने आणि शिकण्याचे मुद्दे एकमेकांसोबत शेअर करत एक समृद्ध शिक्षण वातावरण निर्माण केले.

ACE-EQAL चा उद्देश केवळ माहिती देणे नसून, प्रत्येक संस्थेला अधिक सक्षम, आणि परिणामकारक बनविणे हा आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून हे सत्र सहभागी संस्थांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरले.

03/08/2026
सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची सुरुवात समाजात शाश्वत आणि परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था सक्षम असण...
03/08/2026

सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची सुरुवात

समाजात शाश्वत आणि परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था सक्षम असणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने विवेक व्यासपीठ आणि ऑलस्टेट इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ACE-EQAL (Assessment and Capability Building for Excellence) या उपक्रमाच्या तिसऱ्या बॅचचा उद्घाटन सोहळा एरंडवणे येथील सेवा भवन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रसंगी विवेक व्यासपीठचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. महेश पोहनेरकर, ऑलस्टेट इंडियाचे Legal Head श्री. अनिल कुमार आणि Talent Acquisition & Human Resources Manager श्री. सिद्धांत कश्यप यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना महेश पोहनेरकर यांनी सामाजिक संस्थांच्या कामामागील मूल्यांवर भर देत सांगितले की, "केवळ आर्थिक निधी उभारण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या संस्था दीर्घकालीन सामाजिक परिवर्तन घडवू शकत नाहीत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचा या बॅचमधील सहभाग ही आनंदाची बाब आहे. कमी संसाधने, सामाजिक असंवेदनशीलता आणि आर्थिक अडचणींवर मात करत ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्थांना सर्वार्थाने सक्षम करणे हेच ACE-EQAL चे उद्दिष्ट आहे."

सिद्धांत कश्यप यांनी सांगितले की, "सामाजिक संस्थांना पाठबळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे समाजाप्रती असलेले आमचे उत्तरदायित्व कृतीतून व्यक्त करण्याची संधी आहे. आजपर्यंत १२० हून अधिक संस्थांना या उपक्रमाशी जोडण्यात आले असून, संस्थांच्या कार्याचा दर्जा उंचावण्यासाठीच्या या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे."

अनिल कुमार यांनी संघटनात्मक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "कोणत्याही संस्थेच्या यशामागे सक्षम संघटनात्मक रचना असते. प्रत्येकाला आपली जबाबदारी आणि अधिकार स्पष्टपणे समजले, तर त्यातून निर्माण होणारा एकोपा संस्थेला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो."

कार्यक्रमात ACE-EQAL च्या मागील बॅचमधील सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. ACE-EQAL च्या प्रवासामुळे त्यांच्या संस्थांमध्ये घडलेले सकारात्मक बदल, व्यवस्थापनातील सुधारणा, सुशासन, धोरणात्मक नियोजन आणि निधी उभारणीतील वाढलेली क्षमता याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांनी नव्या तुकडीतील संस्थांना आत्मविश्वास आणि नव्या उमेदीची प्रेरणा दिली.

कार्यक्रमात प्रकल्प प्रमुख पंकज गव्हाणे यांनी ACE-EQAL प्रकल्पाचे सादरीकरण करून उपक्रमाची उद्दिष्टे, प्रशिक्षणाची रचना आणि आगामी Handholding प्रक्रियेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाचपुते यांनी केले, तर नेहा धाडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ACE-EQAL हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नाही; तर सक्षम संस्था, सक्षम नेतृत्व आणि सक्षम समाज घडविण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे. आम्हाला विश्वास आहे की या तिसऱ्या बॅचमधील संस्था आपल्या कार्यातून समाजात अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवतील.

🌼 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼"गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारी प्रेरणा...
29/07/2026

🌼 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

"गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी शक्ती आहे." 🙏

सक्षम संस्था घडवण्यासाठी सातत्याने शिकणे, मार्गदर्शन स्वीकारणे आणि अनुभवातून विकसित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजन, मार्गदर्शक, प्रशिक्षक, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती आणि समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक अभिवादन!

आपल्या मार्गदर्शनामुळे अनेक स्वयंसेवी संस्था अधिक सक्षम होत आहेत आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहेत. ही ज्ञानपरंपरा अशीच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥

टीम ACE EQAL
Assessment • Capacity Building • Handholding
Empowering NGOs for Sustainable Impact

22/07/2026

सामाजिक संस्था प्रशिक्षण कार्यक्रम उदघाटन समारंभ

सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना अधिक सक्षम, शाश्वत आणि परिणामकारक बनविण्यासाठी विवेक स्पार्क फाउंडेशन आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ऑलस्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगातून एस-इक्वल संस्था सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील सेवा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

या दोन वर्षांच्या प्रशिक्षण प्रकल्पामध्ये संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे व मूल्ये निश्चित करणे, कायदेशीर पूर्तता, प्रशासन व निर्णय प्रक्रिया, आर्थिक व्यवस्थापन, लेखा प्रणाली, प्रकल्प प्रस्ताव तयार करणे, सीएसआर व इतर निधी संकलनाची प्रक्रिया, प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणी तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर संस्थांना आवश्यक त्या विषयांवर सल्ला व सहकार्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मागील वर्षी या उपक्रमाला सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीवर २०२६-२७ या वर्षासाठीही पुणे शहर व परिसरातील अधिकाधिक नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी या प्रकल्पासाठी नोंदणी करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रकल्पाबाबत अधिक माहिती, नोंदणी प्रक्रिया तसेच उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ७७९८८६००३६ किंवा ९३२५२६९८८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

सर्व इच्छुक सामाजिक संस्थांना आग्रहाचे आवाहन करण्यात येत आहे की, संस्थेने नोंदणी करून संस्थेच्या सर्व पदाधिकारी, विश्वस्त, संचालक यांनी उद्घाटन सोहळ्यास तसेच या प्रशिक्षण प्रकल्पात आवर्जून सहभागी व्हावे.

Address

Deccan
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when ACE EQAL posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share