09/03/2026
स्व. सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन,जळगाव -व अष्टविनायक सिटी वरिष्ठ नागरिक संघातर्फे महिलांचा सन्मान
पुणे- आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमिताने स्व.सौ.श्वेता वाणी-नेवे फाउंडेशन जळगाव व अष्टविनायक सिटी वरिष्ठ नागरिक संघ फुरसुंगी पुणे यांच्या सौजन्याने आयोजित महिलादिन कार्यक्रमाचे उद्घाटन फुरसुंगी देवाची उरळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.संतोष सरोदे, नगरसेवक श्री.गणेश कामठे, नगरसेविका सौ.मोनीकाताई पवार, सौ.राणीताई हरपळे,डाॅ.राकेश नेवे कॅन्सर सर्जन व डायरेक्टर लाईफ पाॅईंट हाॅस्पिटल बाणेर व इंटीग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर वाघोली व फाऊंडेशन चे अध्यक्ष मिलिंद नेवे वाणी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांचेकडून पुष्प अर्पित करण्यात आले.सदर कार्यक्रमात डाॅ.राकेश नेवे यांचेकडून कॅन्सर ला प्रतिबंध विषयावर मार्गदर्शन करण्यात येवून , कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक,उद्योग क्रिडा,
सांस्कृतिक,वैद्यकीय,पोलीससेवा आणि इतर क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त 20 महिला व मुलीचा स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येवुन अष्टविनायक सोसायटी परिसरातील उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या 40 महिलां व मुलींचा श्वेता वाणी फाऊंडेशनच्या व अष्टविनायक नागरिक संघाच्या वतीने गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी फाऊंडेशन चे उपाध्यक्ष रोहन नेवे, संचालक श्रीनिवास व जिवनराज नेवे तसेच संचालिका सौ विनंती व सौ समीक्षा नेवे हजर होते. अष्टविनायक वरिष्ठ नागरिक संघाचे गोरख घोडके, रघुनाथ गायकवाड,साक्षर मस्के,प्राण पंडिता,जांभुळकर, चव्हाण, राजेंद्र कुंभार, सुरेश चंद, सुरेश पाटील यांचेकडून कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सहकार्य लाभले.सोसायटीचे सदस्य अंकुश अहीरे,सुरेश मोहिते,हरिष जोगदंड, आनंद , यांनी विशेष परिश्रम घेतले.
----------××------ -- ------
👇👇👇👇👇