09/06/2026
ग्रामपंचायत आदर्श ग्राम #सिद्धेगव्हाण येथे पंचायत समिती सदस्य मा. #श्री_प्रसादभाऊ_अशोक_घेनंद यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षातील #सर्वप्रथम_कर_भरणारे माजी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक #श्री_टिळक_भाऊसाहेब_उगले यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांना फेटा बांधून, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. ग्रामविकासासाठी ग्रामस्थांनी वेळेवर कर भरून सहकार्य करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कर भरण्याबाबत जागरूकता निर्माण करत आदर्श नागरिकत्वाचे उदाहरण निर्माण केल्याबद्दल श्री. उगले यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
"वेळेवर कर भरणारा नागरिक हा गावाच्या विकासाचा खरा भागीदार असतो." 🌿🏡
#आदर्श_ग्राम_सिद्धेगव्हाण ा_गाव_विकसित_करा
#ग्रामपंचायत #सन्मान_सोहळा #ग्रामविकास