11/09/2026
मध्यप्रदेशमधील कोल्हापूर!
माती महाराष्ट्राची…
रक्त मराठ्यांचे…
आणि श्वास आजही शिवरायांचा!
मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरातील अनेक गड दुर्ग असलेले ठिकाण म्हणजे रामपूर येथील शिवाजीनगर कॉलनी होय
महाराष्ट्रापासून 1200 किलोमीटर दूर असलेले महाराष्ट्राचे एक जिवंत बेट!
महत्त्वाची ऐतिहासिक स्थानिक परंपरा आजही जपणारे मावळे
रामपूर येथील जमीन ताबा , वहिवाट करताना त्या संघर्षात ५ मराठे आणि त्यानंतर १६ विरोधक मारले गेल्याचा उल्लेख हा रामपूर परिसरातील गावकरी, कुटुंबे आणि पिढ्यान्पिढ्या सांगितल्या जाणाऱ्या लढाईचे प्रसंग आजही अंगावर शहारे आणतात🚩
स्थानिक परंपरेनुसार, इ.स. १९०१ च्या सुमारास ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे प्रथम यांनी कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सहकार्याने/संमतीने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अंदाजे ७५ मराठा कुटुंबांना मध्यप्रदेशातील रामपूर येथे वसवले.
या कुटुंबांसाठी प्रत्येकी सुमारे ५५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली, विशाल तलाव बांधून देण्यात आला आणि महाराष्ट्रातून गेलेल्या या कुटुंबांनी मध्यप्रदेशच्या भूमीत आपले नवे आयुष्य उभे केले.
म्हणजेच
कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद,
ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे प्रथम यांचा आधार,
आणि मराठ्यांची कष्ट करण्याची जिद्द! 🚩
पण या मराठ्यांना सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता…
स्थानिकांकडून विरोध झाला. संघर्ष झाले. त्या संघर्षात ५ मराठे मारले गेले.
आपल्या बांधवांची हत्या झाल्यानंतर हे मराठे आपली कैफियत घेऊन ग्वाल्हेरला महाराज माधवराव शिंदे प्रथम यांच्याकडे गेले.
तेव्हा महाराजांनी त्यांना धीर देत कथितरित्या विचारले
“मराठे कधीपासून घाबरायला लागले?
आपला वारसा विसरलात का?” 🚩
महाराजांनी त्यांना शस्त्रसज्ज बंदूक तलवारी देऊन आपल्या स्वाभिमानासाठी उभे राहण्याचा संदेश दिला,
रागाने पेटलेले ते मराठे रामपूरला परतले…
आणि पुन्हा संघर्ष झाला!
त्या संघर्षात १६ विरोधक मारले गेले.
त्यानंतर या भागात मराठ्यांच्या वाटेला जाण्याची हिंमत कोणी केली नाही,
पण या लां केवळ तलवार आणि बंदुकीची कथा म्हणून पाहू नका…
ही कथा आहे मराठ्यांच्या स्वाभिमानाची, संघर्षाची आणि आपल्या मुळांशी नाते जपण्याची!
आजही अनेक घरांमध्ये बंदूक आणि तलवार जपून ठेवलेली आहे.
शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला…
प्रदेश बदलला…
पिढ्या बदलल्या…
पण मराठेपण बदलले नाही!
आजही
🚩 घरात मराठी बोलली जाते.
🚩 बाहेर हिंदी, पण घरात मायबोली मराठी!
🚩 महाराष्ट्रातील दिवाळी दसरा पाडवा सण-उत्सव त्याच परंपरेने साजरे केले जातात.
🚩 कोल्हापूर जिल्ह्याशी विवाहसंबंध आजही कायम आहेत.
🚩 महाराष्ट्रातील मुली तिकडे दिल्या जातात आणि तिकडच्या मुली महाराष्ट्रात दिल्या जातात
🚩 शिवरायांचा इतिहास आणि मराठी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते.
आणि म्हणूनच
रामपूरचे शिवाजीनगर म्हणजे “मध्यप्रदेशमधील कोल्हापूर!” ❤️🚩
🚩 गरुडझेप मोहिमेशी अतूट नाते 🚩
आग्रा ते राजगड गरुडझेप मोहीम दरवर्षी या गावात मुक्काम करते.
आम्ही गावात पोहोचलो की स्वागताचा जल्लोष पाहण्यासारखा असतो!
गावकरी आमच्या धावपटू आणि सायकलस्वारांना घरोघरी घेऊन जातात.
एका घरात तीन-तीन माणसांना जेवायला घेऊन जाण्याची आपुलकी!
हा केवळ पाहुणचार नाही…
हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यातील जिव्हाळ्याचा स्नेहबंध आहे! ❤️
आम्हीही दरवर्षी या गावात रक्षाबंधनाचा स्नेहबंध जपतो.
शेकडो किलोमीटर दूर राहूनही
मराठी भाषा, मराठी संस्कृती, शिवरायांची आठवण आणि महाराष्ट्राशी असलेले नाते जिवंत ठेवणाऱ्या या बांधवांना मनापासून मानाचा मुजरा! 🙏🚩
नकाशावर महाराष्ट्र दूर असतो;
पण मराठ्यांच्या हृदयात महाराष्ट्र कधीच दूर नसतो!
जिथे मराठी माणूस आपली भाषा जपतो,
जिथे शिवरायांचे नाव अभिमानाने घेतले जाते,
जिथे भगवा फडकतो—
तिथे महाराष्ट्र जिवंत असतो! 🚩
मध्यप्रदेशमधील कोल्हापूर — रामपूर, गुना!
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा!
महाराज माधवराव शिंदे प्रथम यांना मानाचा मुजरा!
आणि या भूमीत मराठीपण जिवंत ठेवणाऱ्या मराठा बांधवांना मानाचा मुजरा! 🚩
जय भवानी! जय शिवाजी!
हर हर महादेव!
जय महाराष्ट्र! 🚩
#मध्यप्रदेशमधीलकोल्हापूर #रामपूर #शिवाजीनगरकॉलनी #गुना #माधवरावशिंदेप्रथम #राजर्षीछत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराज #मराठे #मराठाअस्मिता #मराठीमाणूस #मराठीभाषा #मराठीसंस्कृती #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराय #कोल्हापूर #महाराष्ट्र #गरुडझेपमोहीम #आग्राते राजगड #मराठावारसा #मराठाइतिहास #जयमहाराष्ट्र #हरहरमहादेव