DigiBharati Education Foundation

DigiBharati Education Foundation Digibharati Education Foundation is Pune based Not-for-Profit Entity dedicated to Education, Innovation in Academia

01/03/2024

३ मिनिटात ३.५% ब्राह्मण संपऊन टाकू
अशी समाज माध्यमातून दिलेली धमकी हे गेली काही वर्षे महाराष्ट्रात पेरलेले जातीयतेचे विषाचा परिणाम आहे . यास राष्ट्रवादी ( शरद पवार) यांचा पक्ष जबाबदार आहे हे वस्तुस्थिती लक्षात घेता कडे नाकारत येईल ?

21/02/2024

आरक्षण प्रश्न संबंधी काही प्रश्न

मराठा आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिले , स्वागत .
परंतु कुणबी मराठ्यांना अन्य मागासवर्ग गटातून व अन्य मराठ्यांना या नवीन आरक्षण मिळणार , पर्यायाने एकूण मराठा लोकसंख्या प्रमाणात मराठ्यांना आरक्षण दिले जाणार का ? लोक समंख्या प्रमाणात दिले जाणारे आरक्षण हे घटनेस मंजूर होणार का ?
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळणे बंद होणार का ?
उर्वरित ३८ % जागा खुल्या वर्ग साठी राहणार त्यातून आरक्षित गटाला खुल्या प्रवर्गातून ,शैक्षणिक प्रवेश नोकरी मिळणार का ?
पर्यायाने खुल्या वर्गासाठी ३८% आरक्षण मिळाल्यात जमा आहे का ?
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षण १०% व खुल्या वर्ग साठी उपलब्ध जागा ३८% म्हणजे एकूण ४८% जागा खुल्या प्रवर्ग साठी उपलब्ध झाल्या का ?
कोणतेही आंदोलन संघर्ष न करता ४८ % आरक्षण खुल्या प्रवर्ग मिळत असेल तर या आरक्षण व्यवस्थेने मागास वर्गाला न्याय दिला असे म्हणता येईल का ?

06/08/2023

प्रकुलगुरू नियुक्ती केव्हा ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र - कुलगुरू नियुक्ती राजकीय निर्णय का शैक्षणिक निर्णय ?
विद्यापीठ कायदा काय सांगतो ? प्र - कुलगुरू या परा साठी पात्र उमेदवार कोणत्या राजकीय विचाराचे अथवा कोणत्या शिक्षण संस्था संबधीत या .निकषावर आधारीत निर्णय होणार ? कुलगुरू उपलब्ध उमेदवारी अर्जावर गुणवत्ता निकषावर प्रकुलगुरू पदाचा निर्णय करणार का ?
प्राचार्य संघटना , प्राध्यापक संघटना यांच्या दबावाखाली निर्णय होणार का ? अन्य काही निकषांवर ?
विद्यमान कुलगुरू विविध गट , तट, पक्ष , संघटना , विचार प्रवाह , राज्य - केंद्र स्तरावरील मंत्री महोदय यांच्या दबावाखाली निर्णय होणार का ? अशा प्रश्नांची चर्चा चालू आहे .
निर्णय लांबला आहे ? केव्हा होणार हे कोणीच सांगू शकत नाही . व्यवस्थापन परिषद सदस्य आपापसातील हेवेदावे विसरून प्रकुलगुरूपदाचा निर्णय करण्यास कुलगुरूना सहकार्य करणार का ?
कुलगुरू स्वतः च्या अधिकाराचा कायद्या नुसार वापर करण्यास, संबधित घटक त्यांना स्वातंत्र्य देणार का ? का प्रकुलगुरू पद भरण्यास राजकीय विलंब होत राहणार ?
परिणामी प्रकुलगुरू पदा अभावी अडलेली , थांबलेली , राहिलेली शैक्षणिक कार्ये होणार नाहीत . शैक्षणिक नुकसान होतच राहणार . तसे मुंबई विद्यापीठात प्रकुलगुरू नियुक्ती कुलगुरू नियुक्ती नंतर त्वरित करण्यात आली . हाच निकष पुण्यासाठी का लागू नाही ?
पूर्वी प्रकुलगुरू पद विद्यापीठात दीर्घ काल रिक्त होते . पण आता कायद्यात तरतूद केल्याने पद भरती करावी लागणार . प्रश्न आहे. केव्हा ?

धनंजय कुलक्णी

27/07/2023

विद्यापीठ परीक्षांचे निकाल उशीरा का लागतात ? यावर उपाय काय ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षांचे निकाल उशीरा लागतात , या संदर्भात आज वर्तमानपत्रात एक बातमी वाचनात आली . १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात कार्यक्रम निमित्ताने येणार आहेत त्या पूर्वी विद्यापीठ परीक्षांचे निकाल जाहीर होणार . असे विधान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याचे प्रसिद्ध झाले आहे . खरेतर प्रश्न पडतो नरेंद्रा मोदी पुण्यात येण्याचा व विद्यापीठ परीक्षांचे निकाल जाहीर होण्याचा काय संबंध ? नरेंद्र मोदी पुण्यात येतील अथवा नाहीत विद्यापीठ परीक्षांचे निकाल लागलेच पाहिजेत ना ? यात पंतप्रधान यांचा पुण्यातील वास्तव्याचा दबाव लक्षात घेऊन विद्यापीठ परीक्षा विभाग काम करणार आहे का ? तसा या फोन घटनाचा बादरायण संबंध नाही हे स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे .
विधान सभेच्या अध्यक्ष श्री नार्वेकर यांनी विद्यापीठ परीक्षांचे निकाल उशीरा लागणे ही गंभीर बाब आहे असे मत प्रदर्शन केले आहे . विद्यार्थी परिषदेने काही दिवस पूर्वी विद्यापीठात आंदोलन केले , परीक्षांचे निकाल वेळेत लागत नाहीत या प्रश्नावर . या बाबत आंदोलन पद्धती वरून परिषदे वर टीका करण्यात आली .
आज परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांचे निवेदन प्रसिद्ध झाले आहे त्यांच्या निवेदन नुसार मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत . बाकी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होतील या साठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे .
विद्यापीठ कुलगुरूंनी नुकताच कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला आहे . ते परिस्थिती नियंत्रण खाली ठेवत आहेत . पण ही परिस्थिती का निर्माण होते ? ७५ वर्षे पूर्ण करत असलेल्या विद्यापीठात परीक्षा व्यवस्था परिस्थिती सापेक्ष पद्धतीने प्रस्थापित का कार्य करता येत नाही . विद्यापीठ कायद्यात तरतूद आहे परीक्षा संपल्या नंतर ४५ दिवसात परीक्षांचे निकाल जाहीर करणे बंधन कारक आहे . तसे न झाल्यास कुलगुरूंनी कुलपतींना आवश्यक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे . प्रश्न स्पष्टीकरण देण्याचा नाही . मुळात हा प्रश्नच का निर्माण होतो हा आहे .
परीक्षेचा निकाल लावण्याच्या कामात दोन भाग आहेत १ उत्तर पत्रिकांचे प्राध्यापकांनी करावयाचे मुल्यांकन २ परीक्षा निकाल व्यवस्थापन . या दोन्ही भागात काही प्रश्न आहेत परिणामी परीक्षांचे निकाल उशीरा लागतात , विद्यापीठ कायदा तरतुदींचा भंग होतो , विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते . ज्यांचा मुळे परीक्षा निकाल लागण्यास उशीर होतो त्यांना कोणत्याच कारवाईला समोर जावे लागत नाही . झालीच तर दंडात्मक , परीक्षेच्या कामातून निलंबन . अशी कारवाई होते . यातील दुसरी कारवाईचे प्राध्यापक नेहमीच स्वागत करतात . कारण त्यांची परीक्षेच्या कामातून सुटका होते . पहिल्या कारवाईचे विशेष वाटत नाही कारण प्राध्यापकांचे वाढलेले पगार . परिणामी दंड भरणे प्राध्यापकांना विशेष टोचणी देणारे ठरत नाही .
परीक्षा निकालात असलेली प्रशासकीय दिरंगाई हा गंभीर विषय आहे . या बाबत परीक्षा नियंत्रक जबाबदार धरले पाहिजे . तसेच परीक्षेच्या कामात प्राध्यापकांचा सहभाग हा त्यांच्या सेवा कर्तव्यचा अनिवार्य भाग करणे गरजेचे आहे . परीक्षेच्या कामासाठी प्राध्यापक उपलब्ध होत नाहीत यास संबधित प्राध्यापक व त्यांच्या प्राचार्य यास जबाबदार धरले पाहिजे . हे करणे अत्यंत गरजेचे आहे .
ऐका दिवशी केंद्रीय मुल्यांकन केंद्रावर ६ तासात ६० पेक्षा जास्त उत्तर पत्रिका तपासू नये , पात्र व संबधित विषयाच्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका वेळेत मुल्यांकन करणे , अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिलेल्या मुदतीत विद्यापीठ यंत्रणेत पाठवणे . प्राध्यापक व परीक्षा विभाग याच्यातील संवादाचा अभाव यातून परीक्षा निकाल उशीर होतो हे स्पष्ट आहे .
पूर्वी विद्यापीठात ऐका दिवशी ४०० पेक्षा अधिक उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकन केले हा प्रश्न गाजला होता . अतिरिक्त उत्तरपत्रिंकाचे मुल्यांकन केलेल्या प्राध्यापका वर कारवाई केली पण पुढील मुल्यांकन करण्यास प्राध्यापक उपलब्ध न झाल्याने कारवाई झालेले प्राध्यापक मूल्यांकन करण्यासाठी पुन्हा निमंत्रीत करावे लागले हे विद्यापीठातील वास्तव अजून बदललेले नाही .
य सर्व प्रश्र्नी विद्यार्थी मात्र समस्या तोंड देतो हे वास्तव केव्हा बदलणार ?
विद्यापीठ परीक्षा ससंगणक प्रणाली द्वारा संचालित करावी , हे केव्हा साध्य होणार या बाबत केव्हा योजना होणार ? विद्यापीठ ७५ वर्षे पूर्ण होत असताना हे साध्य होईल का ? या वरच विद्यापीठाची गुणवत्ता अवलंबून आहे हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे .
धनंजय कुलकर्णी
माजी अधिसभा सदस्य
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ .
पुणे .

23/07/2023

NDA will rule INDIA for next 100 year . It is the commitment of INDIA's voters . Because INDIAN voters are against Antinationals

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
05/10/2022

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

18/12/2021

मराठी साहित्यातील अभिजात ग्रंथ ,
महाकवी ग. दि. माडगूळकर रचित गीत रामायण

जेष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके यांनी त्यास स्वरबध्द केले व गायलेले , मराठी जनतेचे श्रध्दा स्थान
गीत रामायण

आजच्या मराठी युवकांशी गीतरामायण या महाकाव्या विषयी सहज संवाद साधणारा , तरुणांच्या मनाचा ठाव घेणारा धनंजय कुलकर्णी लिखित ग्रंथ ' पत्ररुप भावार्थ गीतरामायण '.

गीत रामायणाचा भावार्थ , साहित्यार्थ , संगीतार्थ पत्ररुपात युवकांना कथन करणारा ' आनंद संवाद '
ग्रंथ म्हणजे ' पत्ररुप भावार्थ गीत रामायण '

महाराष्ट्राचे राज्यपाला माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दि २५ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे प्रकाशित होत आहे .

हा पत्ररुप संवाद ग्रंथ 'आनंद संवाद' , आपण आज आपल्या कुटुंबीय तसेच स्नेही युवक युवतींसाठी खरेदी करा .

हा ग्रंथ अमृतसंचय प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळी , पुणे
संयुक्तपणे प्रकाशित करत आहेत .

ग्रंथ पृष्ठ संख्या ४७६ , मूळ किंमत ७०० रुपये , सवलत मुल्य ६०० रुपये अधिक टपाल शुल्क ८० रुपये , आपल्या संग्रही असावा ग्रंथ आजच नोंदवा .

आॕन लाईन नोंदणीसाठी
बँक - स़ंपदा सहकारी बँक
खाते क्रमांक - अमृतसंचय प्रतिष्ठान - 001002300039500
IFSC - IBKL0459SBS
ग्रंथ नोंदणी करणाऱ्याचे नाव , पत्ता

हे आवाहन नरेंद्र उंब्रजकर ,सचिव , अमृतसंचय प्रतिष्ठान ,पुणे द्वारा करण्यात येतआहे .

06/09/2021
28/10/2020

नमस्कार,

पत्ररूप भावार्थ गीतरामायण या ऑनलाइन प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची फेसबुक लाईव्ह रविवार सकाळी १० वाजता संपन्न झाली.

सदर फेसबुक लाईव्ह वेबसाईट अनावरण सोहळा आपल्या साठी खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://www.facebook.com/patra.roop.geet.ramayan/live/

शिक्षण, कला, संगीत, वांगमय आणि अध्यात्म या विविध विषयातले मान्यवर e link वर उपस्थित होते आणि त्यांनी शुभेच्छा, सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

सर्व मित्र आणि परिवार यांच्या मिळालेल्या शुभेच्छा यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आपले आशीर्वाद असेच राहोत, ही ईश्वर चरणी विनंती..

आपला नम्र,
धनंजय कुलकर्णी.

|| पत्ररुप भावार्थ गीत रामायण - काव्य नव

Address

Pune

Telephone

+919370315272

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DigiBharati Education Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share