Devang Koshti Samaj Pune

Devang Koshti Samaj Pune || धागा धागा अखंड विणूया
विठ्ठल विठ्ठ्?

धागा धागा अखंड विणूया
विठ्ठल विठ्ठ्ल मुखे म्हणूया
अक्षंशाचे रेखांशाचे
उभे आडवे गुंफुन धागे
विविध रंग वसुंधरेचे
वस्त्र विणिले पांडुरंगे
विश्वंभर तो विणकर पहिला
कार्यारंभी नित्य स्मरुया !

करचरणांच्या मागावरती
मनामनांचे तंतू टाका
फेकुन शेला अंगावरती
अर्धिउघडी लाज राखा
बंधुत्वाचा फिरवित चरखा
एकत्वाचे सूत्र धरुया !

जय चौंडेश्वरी.. 🌹खुशखबर..महाराष्ट्रातील कोष्टी समाजाच्या गुणी गायक व नृत्य कलाकारांना सुवर्णसंधी…देवांग कोष्टी समाज पुणे...
03/09/2025

जय चौंडेश्वरी.. 🌹

खुशखबर..
महाराष्ट्रातील कोष्टी समाजाच्या गुणी गायक व नृत्य कलाकारांना सुवर्णसंधी…

देवांग कोष्टी समाज पुणे आयोजित कै. सौ अलकाताई मुसळे स्मरणार्थ संगीत रजनी 2025

समाजातील गायक/नृत्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी देवांग कोष्टी समाज, पुणे यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले श्री विवेकजी परांजपे यांच्या संगीत संयोजनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून जमा करावयाचा आहे. आलेल्या फॉर्म मधील सर्व कलाकारांना पुणे येथे ऑडिशन साठी बोलावण्यात येईल, संगीत क्षेत्रात तज्ञ असलेले पं. हृषीकेश महाले (गायक, संगीतकार, गीतकार) तसेच स्वरश्री मॅडम (गायिका, गीतकार) अशा दोन परीक्षकांच्या मार्गदर्शनातुन गायक कलाकारांची निवड केली जाईल तसेच निवड केलेल्या कलाकारांचा चांगला सराव घेऊन दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे या सर्व कलाकारांचा गायनाचा तसेच नृत्याचा कार्यक्रम होईल..

तरी गायन 🎤आणि नृत्य 💃 या कलेमध्ये पारंगत असलेल्या इच्छुक समाजबांधवांनी त्वरित खालील गुगल फॉर्म भरून पाठवावा..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdYWCEh-0YjI58afW6l9j1LVlLYZddyDCwUlm0S3xny0Mj-Ng/viewform?usp=sf_link

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 5 सप्टेंबर 2025

महत्वाची टिप :
# वयोमर्यादा - वय वर्ष 13 च्या पुढील.
# निवडीचे सर्वस्वी अधिकार परीक्षकास असतील.
# निवड झालेल्या कलाकाराला सरावासाठी यावे लागेल.
# ऑडिशन करता किंवा कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही.
याची कृपया नोंद घ्यावी..

ऑडिशन ची वेळ आणि ठिकाण एक दिवस आधी कळवण्यात येईल..
ऑडिशन दिनांक 07 संप्टें. 2025

# अधिक माहितीकरिता संपर्क :
सुनील ढगे
9423004828
सौ मंजुषा फासे
9423011022
सौ मेघमाला पांडकर
9923172878

सुनील ढगे
उपाध्यक्ष
देवांग कोष्टी समाज पुणे

जय चौंडेश्वरी..🌹खुशखबर..महाराष्ट्रातील कोष्टी समाजाच्या गुणी गायक व नृत्य कलाकारांना सुवर्णसंधी…देवांग कोष्टी समाज पुणे ...
31/08/2025

जय चौंडेश्वरी..🌹

खुशखबर..
महाराष्ट्रातील कोष्टी समाजाच्या गुणी गायक व नृत्य कलाकारांना सुवर्णसंधी…

देवांग कोष्टी समाज पुणे आयोजित कै. सौ अलकाताई मुसळे स्मरणार्थ संगीत रजनी 2025

समाजातील गायक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी देवांग कोष्टी समाज, पुणे यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले श्री विवेकजी परांजपे यांच्या संगीत संयोजनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून जमा करावयाचा आहे. आलेल्या फॉर्म मधील सर्व कलाकारांना पुणे येथे ऑडिशन साठी बोलावण्यात येईल, संगीत क्षेत्रातील तज्ञ असलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून गायक कलाकारांची निवड केली जाईल व निवड केलेल्या कलाकारांचा सराव घेऊन *दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर पुणे* येथे या सर्व कलाकारांचा गायनाचा तसेच नृत्याचा कार्यक्रम होईल..

तरी गायन 🎤आणि नृत्य 💃 या कलेमध्ये पारंगत असलेल्या इच्छुक समाजबांधवांनी त्वरित खालील गुगल फॉर्म भरून पाठवावा..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdYWCEh-0YjI58afW6l9j1LVlLYZddyDCwUlm0S3xny0Mj-Ng/viewform?usp=sf_link

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 5 सप्टेंबर 2025

महत्वाची टिप -
# निवडीचे सर्वस्वी अधिकार परीक्षकास असतील.
# निवड झालेल्या कलाकाराला सरावासाठी यावे लागेल.
# ऑडिशन करता किंवा कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही.
याची कृपया नोंद घ्यावी..

ऑडिशन ची वेळ आणि ठिकाण एक दिवस आधी कळवण्यात येईल..
ऑडिशन दिनांक 07 संप्टें. 2025

देवांग कोष्टी समाज पुणे

जय चौंडेश्वरी..🌸😊🙏घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..💐😊🙏भारतीय संस्कृतीत शक्तीच्या पूजनाला विशेष महत्त्व आ...
03/10/2024

जय चौंडेश्वरी..🌸😊🙏

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा..💐😊🙏

भारतीय संस्कृतीत शक्तीच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे, कोणत्याही कार्यासाठी सकारात्मक ऊर्जा लाभावी म्हणून शक्तीचे पूजन महत्त्वाचे ठरते..

प्रत्येक स्त्रीला 'शक्ती स्वरूप' मानण्याचा संस्कार आपल्या संस्कृतीत आहे. अनेक भूमिकांमधून ती शक्ती आपल्या आसपासच असते. या स्त्री शक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हीच खऱ्या अर्थाने शक्तीची उपासना ठरेल..

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदिशक्ती आई तुळजाभवानी, तसेच श्री चौंडेश्वरी माता चरणी आपल्या व आपल्या कुटुंबासह सर्व समाज बांधवांच्या सुख, शांती, आरोग्य आणि समाधानासाठी मनोभावे प्रार्थना..🙏

आपणां सर्व समाज बांधवांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. !

सुनील ढगे
मा. उपाध्यक्ष
देवांग कोष्टी समाज पुणे

Address

Devang Hostel, Behind Mahanagarpalika School, Pimple Nilakh
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devang Koshti Samaj Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share