02/07/2025
अवयवदान, नेत्रदान एक चळवळ
अवयवदान, नेत्रदान संकल्प करा.
अंध व्यक्ति तसेच अवयव निकामी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी नेत्रदान आणि अवयवदानाची चळवळ सुरू करीत आहे. सर्वांनी सहभागी व्हावे.
अलीकडच्या काळात अवयवदानाविषयी समाजात काही प्रमाणात प्रबोधन होत आहे. मात्र त्याची व्याप्ती वाढवायला हवी. मृत्यूनंतर शरीर अनंतात विलीन होणार आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. मात्र शरीर अनंतात विलिन करण्यापूर्वी त्या शरीराचे काही अवयव मृत्यूच्या पश्चात दान केल्यास आपल्या अवयवांमुळे अनेकांना जगण्याची नवसंजीवनी मिळू शकते. आपल्या डोळ्याने कोणीतरी जग पाहू शकेल.. कोणीतरी श्वास घेऊ शकेल.
आपण हयातीत असतानाच जवळच्या हॉस्पिटलमध्ये अवयवदानाचा फॉर्म भरून कुटुंबियास तसेच नातेवाईक, मित्रपरिवाराला आपल्या अवयवदानाची इच्छा सांगावी. आपल्या मृत्यूनंतर संबंधित हॉस्पिटलशी कुटुंबीयांनी संपर्क केल्यास अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण होते. एखाद्याचा अवयवदानाचा फॉर्म जरी भरला नसेल तरी त्या व्यक्तीच्या अंतिम इच्छेनुसार तसेच त्याच्या निधनानंतर जर कुटूंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला तरी हॉस्पिटल अशा अवयदानासाठी मदत करतात.
शासनाने, लोकप्रतिनिधीने, राजकीय पक्षांनी, सामाजिक क्षेत्रातल्या सर्व संवेदनशील व्यक्तींनी यासाठी योगदान दिल्यास ही चळवळ मोठया प्रमाणात उभी राहील.
आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा विचार करून प्रत्येकाने आपले बहुमूल्य जीवन देशाच्या उपयोगी आणावे. प्रत्त्येकाला जीवन एकदाच असते असे म्हणतात मात्र अवयवदानामुळे आपण मृत्यूनंतर ही पुन्हा आयुष्य जगू शकतो.
देशसेवक लक्ष्मण चव्हाण
मानवसेवा संस्था, पुणे
8380803311
#अवयवदाननेत्रदानएकचळवळ
#मानवसेवासंस्थापुणे
#प्रजासत्ताकभारतपक्ष
#देशसेवक