Paranjape Abhiruchi Parisar, M1, A Tower

Paranjape Abhiruchi Parisar, M1, A Tower Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Paranjape Abhiruchi Parisar, M1, A Tower, Nonprofit Organization, M1, A, Paranjape Abhiruchi Parisar Dhayari, Pune.

मनपा पिण्याचें पाणी आणणाऱ्यांचे जाहीर आभारनमस्कार मंडळी, 🙏आज इतका आनंद होत आहे ना त्याची कल्पना शब्दात सांगता येणार नाही...
26/01/2024

मनपा पिण्याचें पाणी आणणाऱ्यांचे जाहीर आभार

नमस्कार मंडळी, 🙏
आज इतका आनंद होत आहे ना त्याची कल्पना शब्दात सांगता येणार नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय.
😊

जसे चातक पक्षी आतुरतेने पावसाची वाट बघत असतो, तसे गेल्या काही महिन्यांपासून आपण ज्या आतुरतेने मनपा पिण्याचे पाण्याची वाट पाहत होतो ते आज पूर्ण होऊन पिण्याचे पाणी आज सोसायटी मध्ये आले आहे.

हे मनपाचे पिण्याचे पाणी आणण्यासाठी सर्वात प्रथम ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या हक्कसाठी सर्वात जास्त प्रयत्न केले व लढले ते आमचे मार्गदर्शक, आमचे लाडके सामाजिक कार्यकर्ते, लढवय्ये नेते तसेच खडकवासला विधानसभा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मा. भपेंद्र मोरे साहेब यांचे आभार.
💐💐🙏💐💐

त्याच्या प्रयत्नाला, त्यांना लढण्यासाठीची ऊर्जा देणारे, त्यांच्या सदैव पाठीशी राहणारे आपले धडाकेबाज निर्णय घेणार, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असणारे, झंझावात नेतृत्व असणारे, राष्ट्रवादीचे नेते, पुण्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजित पवार साहेब त्याचेही आभार.
💐💐🙏💐💐

तसेच भूपेंद्र मोरे साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या, त्यांना साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या रणरागिणी ताई, संसदरत्न, अत्यंत लोकप्रिय खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांचेही आभार.
💐💐🙏💐💐

परांजपे बिल्डर यांचे अत्यंत विश्वासु व सतत आपल्याला मदत करणारे प्रसन्ना मारणे साहेब, बाडगी साहेब याचेही आभार.
💐💐🙏💐💐

सोसायटीच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी झटणारे आपल्या सोसायटीतीमधील रहिवाशी असणारे परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष, पर्यटन तज्ञ, मनपा अधिका-यांचे पाठपुरावा करणारे, गणेश चप्पलवार (पत्रकार) यांचे आभार
💐💐🙏💐💐

तसेच ह्यांची खंबीरपणे साथदेणारे, सजग नागरिक, सत्यासाठी लढणारे तसेच सोसायटीमधील लढवय्या रहिवाशी खंबीरपणे साथ देणारे विवेक दंडाळे (BA), मिलिंद सर (अभियंता), अशोक हिरवे (D. T ed), सतीश शिरसट ( शिक्षक व Music Director) यांचे आभार.
💐💐🙏💐💐

त्यांना वेळोवेळी मोलाची साथ देणारे, तसेच पाठबळ देणारे मनीषा उगले (MSW), ऍड. वैशाली हिरवे, प्रज्ञा घोरपडे ( Fashion Designer), प्रियंका कांबळे (D ed, शिक्षिका), कुलकर्णी मॅडम यांचेही विशेष आभार.
💐💐🙏💐💐

तसेच सदैव मोलाची साथ देणारे, अत्यंत विश्वासू, कामात कर्तव्यदक्ष असणारे अधिकारी मा. गावडे साहेब, मा. सकपाळ साहेब, मा. गांगुर्डे साहेब व मा. यादव साहेब, मा. पावसकर साहेब, कांबळे साहेब यांचेही विशेष आभार
💐💐🙏💐💐

मनपाचे पिण्याच्या पाण्यासाठी दृश्य व अदृष्य सोसायटीमधील व सोसायटी बाहेरील सर्व सदस्यांचे आभार.
💐💐🙏💐💐

सोसायटीच्या हितासाठी आता जसे काम करत आहोत तसेच भविष्यात नवनवीन उपक्रम सोसायटीत राबविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू यात.

धन्यवाद !

*संघर्षानंतर अखेर मनपाचे पाणी सोसायटीत*पुणे महानगरपालिकेला हक्काचे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून सोसायटीतील काही सदस्यांनी...
26/01/2024

*संघर्षानंतर अखेर मनपाचे पाणी सोसायटीत*

पुणे महानगरपालिकेला हक्काचे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून सोसायटीतील काही सदस्यांनी 16 ऑक्टोबर 2023 रोजी मनपा आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात आंदोलना करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर वारंवार पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे तपशील विचारात
अखेर 3 महिन्यानंतर परांजपे अभिरूची परिसर सोसायटीमध्ये मनपाचे पाणी आल्याचा आनंद येथील रहिवाशींनी व्यक्त केला.

सोसायटीतील सदस्य गणेश चप्पलवार, मुकुंद कुलकर्णी, विवेक दंडाळे आणि राजेश वारे या सदस्यांनी पुणे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना आणि संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार हक्काच्या पाणी बाबत मनपा पुणे यांना पाठपूरावा केले होते.

24/7 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परांजपे अभिरूची परिसर धायरीतील येथील सोसायटीत पुणे मनपाकडून नळ जोडण्याचे काम करण्यात आले.

आमच्या सोसायटीमध्ये पाणी यावे म्हणून मा. भूपेंद्र मोरे आणि इंजिनीयर गावडे, वरिष्ठ इंजिनिअर सपकाळ आणि कांबळे यांनी सहकार्य केल्यामुळे त्यांच्या कार्यात तत्परता दाखवल्यामुळे थोडे उशीर झाले पण सोसायटीत पाणी आल्यामुळे सर्व प्रशासकीय व राजकीय प्रतिनिधींचे सोसायटीतील सदस्यांनी सर्वांंचे मनापासून आभार मानले.

आज परांजपे कन्स्ट्रक्शन स्कीमचे व्यवस्थापकीय संचालक मा. शशांक परांजपे आणि सदनिका धारक यांच्यात मा. भूपेंद्र मुरलीधर मोरे...
16/04/2023

आज परांजपे कन्स्ट्रक्शन स्कीमचे व्यवस्थापकीय संचालक मा. शशांक परांजपे आणि सदनिका धारक यांच्यात मा. भूपेंद्र मुरलीधर मोरे यांच्या उपस्थितीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली असून उर्वरित व शिल्लक कामे लवकरात लवकर करून देण्याचे आश्वासन परांजपे यांनी दिले. यावेळेस समितीच्या वतीने त्यांना विविध मागण्याचे पत्र देण्यात आले.

1) कर
2) पाणी
3) रस्ता
4) सुविधा (amenities)
5) कचरा वर्गीकरण प्रकल्प
6) जनरेटर (नवीन)
7) पाथदिवे
8) सिक्युरीटी
9) प्रकल्प फॅक्सिंग
10) आणि इतर मुद्द्यांवर

आशा आहे परांजपे बिल्डर सर्व कामे लवकर करून देतील.

दिनांक : 16 April 2023
ठिकाण : M1 A, Paranjape Abhiruchi Prisar, Dhayari, Pune
Time : 11 to 12 :30

धन्यवाद.
Bhupendra More - भुपेंद्र मोरे

31/03/2023

1 एप्रिल 2023 शनिवारी रात्री 8 वाजता आपल्या सोसायटीमध्ये मा. भूपेंद्र मोरे यांच्या माध्यमातून गेल्या रविवारी घेतलेल्या मीटिंग संदर्भात फॉलोअप आणि पुढील भूमिका याविषयी मीटिंग होणार आहे.

सर्व सदनिका धारकांना विनंती आहे की उद्या संध्याकाळी बरोबर 8 वाजता मिटींगला सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी इंडेक्स टू आणि कर करपत्राचे झेरॉक्स आणावे. धन्यवाद

26/03/2023

पुण्यातील नामांकित परांजपे बिल्डरकडून २५८ जणांची फसवणूक

इमारत न बांधता उचलले गृहकर्जाचे हफ्ते ; रहिवाशांनी दिला ९ एप्रिल पर्यंतचा अल्टिमेटम

पुणे : पुण्यातील नामांकित परांजपे बिल्डरच्या वतीने सुमारे २५८ जणांची फसवणूक केली असून यामुळे नऱ्हे येथील अभिरुची परिसरातील अनेक सदनिकाधारक हवालदिल झाले आहेत.

म्हाडाने सन २०१९ साली सोडत करताना धायरी सर्वे नंबर २४/१ व २५ मधील परांजपे अभिरुची परिसर येथे ४३० जणांना सदनिका मंजूर झाल्या होत्या. यात ११ मजल्यांच्या एम १,२ व ३ अशा तीन इमारतींना महरेराने सन २०१९ साली मंजुरी दिली होती.

यातील दोन इमारती पूर्ण झाल्या असून त्यातील दोन सुमारे १७२ जणांना ताबा देण्यात आला आहे. मात्र, सदर भाग हा एनडीएच्या जवळ असल्याने संरक्षण विभागाने २० जुलै २०२० साली पाचव्या मजल्यापर्यंतच परवानगी दिली व वरील मजल्याचे बांधकाम करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

ही परवानगी सन २०२० मध्ये परवानगी नाकारल्यानंतर देखील बिल्डरने ११ मजल्यांच्या नकाशाप्रमाणे सन २०२१ मध्ये सदनिकांची विक्री केली. यात एचडीएफसी बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम बिल्डरला दिली. यामुळे अस्तित्वातच नसलेल्या इमारतीवर देखील कर्जाचे वितरण करण्यात आले.

बँकेने वितरित केलेल्या कर्जाचे हफ्ते देखील सुरू झाले असल्याने सदनिका घेतलेले दुहेरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी या संदर्भात सदनिकांचा ताबा मिळालेल्या व अपूर्ण असलेल्या सर्वच सदनिकाधारकांची बैठक घेतली. या बैठकीसाठी सुमारे १०० पेक्षा अधिक सदनिकाधारक उपस्थित होते.

९ एप्रिल पर्यंतचा 'अल्टिमेटम'

सदनिका धारकांनी सन २०२० मध्ये या संदर्भांत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा तक्रार करण्यात आली असून त्यासोबत ५० पेक्षा अधिक सह्या असलेले पत्र देखील जोडण्यात आले आहे. यावेळी ९ एप्रिल पूर्वी बिल्डरने या सदनिकाधारकांशी संपर्क करून संवाद साधत त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असा अल्टिमेटम भूपेंद्र मोरे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

कोट

घर हे प्रत्येकाचे स्वप्न असून त्याच स्वप्नांना धुळीस मिळविण्याचे काम येथील बिल्डर करत आहे. मात्र, बिल्डरने तातडीने या सदनिका धारकांशी संवाद साधावा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. निर्धारित वेळेत काम न केल्यास अभिरुची परिसरातील बिल्डरच्या कार्यलायाला टाळे लावण्यात येईल.

भूपेंद्र मुरलीधर मोरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

माझ्याकडून सदनिकेच्या किमतीच्या ८० टक्के रक्कम भरून घेतली आहे. मात्र मला मंजूर झालेल्या इमारतीची एकही वीट अजून बिल्डरने लावलेली नाही. एका बाजूला घराचे हफ्ते सुरु झालेत, त्यामुळे आमच्यावर हवालदिल होण्याची वेळे आली आहे.

पवन फुरंगे, सदनिका मंजूर झालेला रहिवासी

आम्हाला ताबा सन २०२२ मध्ये मिळाला, मात्र बिल्डर सन २०२० पासूनचा मिळकत कर भरा असे सांगत आहे. या गोष्टीला आमचा विरोध असून ताबा मिळाल्या नंतरची मिळकतकराची थकबाकी आम्ही भरू शकतो. पिण्याचे पाणी, कर, रस्ता आणि इतर अनेक अडचणी आमच्या इमारतीत आहेत.

रुचिरा घडसी, रहिवासी

Bhupendra More - भुपेंद्र मोरे

नमस्कार,आपल्या सोसायटीसाठी आनंदाची बातमी!गुढीपाडव्यापासून म्हणजे परवापासून आपल्या सोसायटीसाठी पुुणे मनपाचं एक पाण्याचा म...
23/03/2023

नमस्कार,

आपल्या सोसायटीसाठी आनंदाची बातमी!

गुढीपाडव्यापासून म्हणजे परवापासून आपल्या सोसायटीसाठी पुुणे मनपाचं एक पाण्याचा मोफत टँकर दररोज मिळणार आहे. आज आपल्या सोसायटीतील सदस्य विवेक दंडाळे, अशोक हिरवे, सतीश शिरसाट, मुकुंदराज कुलकर्णी आणि मी गणेश चप्पलवार आम्ही सर्वांनी आज आपल्या नरे आणि धायरी परिसरातील सामाजिक व परिसरातील अभ्यासू कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांना आपल्या सोसायटीतील विविध समस्या संदर्भात चर्चा केली. त्याचं बरोबर दीड किंवा दोन इंची पाण्याचं पाईपलाईन, कर, कचरा, रस्ता आणि इतर छोटे-मोठे सर्व प्रश्न लवकरच सुटणार आहेत. यासाठी आपल्याला फक्त वेळ द्यावा लागेल आणि फॉलोअप घेणे गरजेचे आहे.

कर संदर्भात आपल्याला लवकरात लवकर एक मीटिंग घेऊन सर्वानुमते एक निर्णय घेऊन कर संदर्भात जो बिल्डर आपल्याकडून एकूण तीन वर्षांचा अतिरिक्त कर आपल्यावर लादलेला आहे. त्या तीन वर्षांपैकी फक्त एक वर्षाचाच कर भरायचा आपल्याला आहे. ते कसा आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः भूपेंद्र मोरे हे मंगळवारी संध्याकाळी आपल्या सोसायटीमध्ये येणार आहेत. 172 लोकांचे प्रत्येकी 14 हजार कमी होणार आहेत. पाणी प्रश्न, कचरा आणि रस्त्याचा प्रश्न सुटणार आहेत. मंगळवार बाहेरगावी असणार्‍यांनी ही यावे ही विनंती.

सर्व सदस्य

नमस्कार, सोसायटीसाठी आनंदाची बातमीपरवा बोलल्याप्रमाणे आज आपल्या सोसायटीमध्ये गुडी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मनपाचं मोफत ...
23/03/2023

नमस्कार,

सोसायटीसाठी आनंदाची बातमी

परवा बोलल्याप्रमाणे आज आपल्या सोसायटीमध्ये गुडी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मनपाचं मोफत पिण्याचे पाण्याच्या टँकरला सुरुवात झाली आहे. याचं श्रेय मा. भूपेंद्र मोरे साहेब आणि आपल्या सोसायटीतील सदस्यांच्या सहकार्याने मुळे शक्य होत आहे.


आत्ताच मोरे साहेब आणि मनपा अधिकाऱ्यांशी बोलणं झालं बाकीचं कर, कचरा आणि इतर छोटे-मोठे प्रॉब्लेम बद्दलही आपल्याशी बोलण्यासाठी ते येणार आहेत. वेळ आणि तारीख लवकरात कळवण्यात येईल.

मनपाच्या पाणी पुरवठा विभागात ही आपल्या सोसायटीची नोंद आजपासून करण्यात आली आहे.

गणपती बप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात करणायत आले.
07/09/2022

गणपती बप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात करणायत आले.

मोठ्या उत्साहात दही हंडी साजरा करण्यात आला. गोविंद गोपाला!
20/08/2022

मोठ्या उत्साहात दही हंडी साजरा करण्यात आला.

गोविंद गोपाला!

Address

M1, A, Paranjape Abhiruchi Parisar Dhayari
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paranjape Abhiruchi Parisar, M1, A Tower posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share