12/05/2026
सुकून है! ❤️🌹
तीन वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्याने अखेर सगळे अडथळे पार करत पुण्यात प्रेमविवाह करून त्यांच्या नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली.
या आनंदाच्या क्षणी मुलीच्या घरच्यांची उपस्थिती होती, तर मुलाच्या मित्रमंडळींनी उत्साहाने सहभागी होत या प्रेमसोहळ्याचा आनंद अजूनच वाढवला.
प्रेम, विश्वास आणि समानतेच्या नात्याला साथ देत हा विवाह राईट टू लव्ह च्या मदतीने यशस्वीरित्या पार पडला.
आजही प्रेम करणाऱ्या अनेक जोडप्यांना समाजाचा दबाव, भीती आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत त्यांना कायदेशीर, सामाजिक आणि मानसिक आधार देण्याचं काम अनहद सोशल फाउंडेशन च्या राईट टू लव्ह उपक्रमामार्फत सातत्याने सुरू आहे.
राईट टू लव्ह च्या वतीने नवदांपत्याचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
— राईट टू लव्ह | अनहद सोशल फाउंडेशन ❤️