राष्ट्र सेवा दल - Rashtra Seva Dal

  • Home
  • India
  • Pune
  • राष्ट्र सेवा दल - Rashtra Seva Dal

राष्ट्र सेवा दल - Rashtra Seva Dal समताधिष्टित समाज निर्मितीवर निष्ठा असणारे समाजवादी नागरिक घडवणारी सेवाभावी संघटना.

राष्ट्र सेवा दल क्रियाशील कार्यकर्ता मेळावा  #राष्ट्रसेवादल
05/04/2026

राष्ट्र सेवा दल क्रियाशील कार्यकर्ता मेळावा

#राष्ट्रसेवादल

राष्ट्र सेवा दल सक्रिय कार्यकर्ता राज्य मेळावा : प्रथम दिवसScreening of Gandhi talks filmपुणे : राष्ट्र सेवा दल सक्रिय क...
05/04/2026

राष्ट्र सेवा दल सक्रिय कार्यकर्ता राज्य मेळावा : प्रथम दिवस

Screening of Gandhi talks film

पुणे : राष्ट्र सेवा दल सक्रिय कार्यकर्ता राज्य मेळाव्यात शेकडो सैनिकांच्या उपस्थितीत गांधी टाॅक्स चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले.

मेळावा संयोजक साथी झेलम परांजपे यांनी राज्यभरातून आलेल्या सैनिकांचे स्वागत केले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर बेलेकर आवर्जून उपस्थित होते.

#राष्ट्रसेवादल

प्रिय साथी,राष्ट्र सेवा दलाच्या  महाराष्ट्रातील सेवा दल सैनिकांनी आज  समाजात  सेवादलाच्या  विचारांची कधी नाही एवढी गरज न...
04/04/2026

प्रिय साथी,

राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्रातील सेवा दल सैनिकांनी आज समाजात सेवादलाच्या विचारांची कधी नाही एवढी गरज निर्माण झाली आहे. त्या साठी एक संकल्प व निर्धार करून भविष्यातील कृती कार्यक्रम निश्चित केला जाईल.या साठी राज्याच्या विविध भागातून प्रमुख क्रियाशील कार्यकर्ते दि. 4 एप्रिल व 5 एप्रिल 26 या दोन दिवस उपस्थित असणार आहेत.

सेवा दला साठी कार्यकर्ते कृतिशील होत असताना विश्वस्त नियुक्त अध्यक्ष ,राज्य अध्यक्ष सेवादलाचे शिबीर व. हा मेळावा होऊ नये यासाठी. प्रयत्न करीत आहेत संघटनेच्या कार्यकर्त्यांना मनुवादी प्रतिगामी ठरवून सोशल मीडियावर संघटनेची बदनामी करीत आहेत.

या मेळाव्यासाठी माजी अध्यक्ष मा भरत लाटकर, प्रकाश कांबळे जॉर्ज जेकब सुरेश खैरनार तसेच झेलम ताई परांजपे इत्यादी अनेक प्रमुख माजी पदाधिकारी सह विद्यमान पदाधिकारी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी धडपडत आहेत. यासाठी आपल्या सारख्या सर्व धडपडणाऱ्या दल सैनिकांनी या. मेळाव्यास आवर्जून वेळ काढून उपस्थित रहावे


आपले

दीपाली आपटे नरेंद्र पवार युवराज सुतार
मनीषा पाटील दत्त्ता पाकिरे अश्विनी सातव
भीमराव अडसूळ संदेश दिवेकर. पुष्पक कांदळकर विलास किरोते. रवींद्र लामखडे
बाळासाहेब गायकवाड संजय गायकवाड

#राष्ट्रसेवादल

राज्य मेळाव्यात महाराष्ट्रभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.पुणे : राष्ट्र सेवा दल आयोजित सक्रिय कार्यकर...
04/04/2026

राज्य मेळाव्यात महाराष्ट्रभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

पुणे : राष्ट्र सेवा दल आयोजित सक्रिय कार्यकर्ता राज्य मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना मेळावा प्रमुख तथा माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश कांबळे, माजी महामंत्री राजा अवसक, Shrikant Laxmishankar , मनिषा पाटील, प्रकाश डोबाले, शिबिर विभाग प्रमुख धनंजय धोत्रे, शरद वास्कर, कोमल मगदूम

या रे सारे येथे जमा, या झेंड्याखाली,
बाल असा वाद थोर असा या सायंकाली

#राष्ट्रसेवादल

राष्ट्र सेवा दलाची गाणी, एसेम आणि लोकनायक चरित्र शिबिरार्थींना भेट देण्यात आले. खेळ गाणी गप्पा गोष्टीमधून लहान मुलांमध्य...
04/04/2026

राष्ट्र सेवा दलाची गाणी, एसेम आणि लोकनायक चरित्र शिबिरार्थींना भेट देण्यात आले.

खेळ गाणी गप्पा गोष्टीमधून लहान मुलांमध्ये सेवादल पोहचवणेचे काम कसे करतात याची माहिती संजय रेंदाळकर यांनी दिली.

#राष्ट्रसेवादल

आपण पुण्यातील या महत्वपूर्ण मेळाव्यासाठी आलात तर आनंद होईल. 🤝सेवादल बढाना है, परिवर्तन लाना है! #राष्ट्रसेवादल
04/04/2026

आपण पुण्यातील या महत्वपूर्ण मेळाव्यासाठी आलात तर आनंद होईल. 🤝

सेवादल बढाना है, परिवर्तन लाना है!

#राष्ट्रसेवादल

प्रिय साथी,             सप्रेम नमस्कार, महाराष्ट्रातील राष्ट्र सेवा दलाच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचा मेळावा पुणे येथे श...
04/04/2026

प्रिय साथी,

सप्रेम नमस्कार, महाराष्ट्रातील राष्ट्र सेवा दलाच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचा मेळावा पुणे येथे शनिवार दिनांक ४ एप्रिल व रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी घेत आहोत.

देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती काय आहे ते आपल्याला माहीतच आहे परंतु या सगळ्या धकाधकीच्या काळात राष्ट्र सेवा दलाची गरज सातत्याने भासत आहे.आपण सर्वजण आपापल्या भागात काम करून सेवादलाचे काम करीत आहोत .

आदरणीय राष्ट्र सेवा दलाचे संस्थापक श्रद्धेय एस.एम.जोशी यांचा १एप्रिल व आदरणीय समाजवादी नेते भाई वैद्य यांचा स्मृतिदिन २ एप्रिलला आहे या निमित्ताने राज्यातील क्रियाशील कार्यकर्त्यांचा मेळावा आपण आयोजित केला आहे.

राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या दोन दिवशी वेळ काढवा म्हणून हे निवेदन करीत आहे. हा मेळावा भविष्यात सेवादलाच्या दृष्टीने खुप खुप महत्वाचा आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कि आम्ही आपली वाट पहात आहोत.

सेवादल बढाना है
परिवर्तन लांना है
भुलो मत भुलो मत
सेवादल बढाना है

आपले सहकारी
राष्ट्र सेवा दल, पुणे शहर व जिल्हा & महाराष्ट्र
तारीख राखून ठेवा
येणार असल्याचे कळवा
सविस्तर कार्यक्रम लवकरच कळवला जाईल

#राष्ट्रसेवादल

राष्ट्र सेवा दल क्रियाशील कार्यकर्ता मेळावा #राष्ट्रसेवादल
04/04/2026

राष्ट्र सेवा दल क्रियाशील कार्यकर्ता मेळावा

#राष्ट्रसेवादल

Address

Sinhgad Road
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्र सेवा दल - Rashtra Seva Dal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share