09/03/2024
जीवन आशय बाल युवा केंद्र या कोल्हापूरातील संस्थेने महिला दिन खूप उत्साहात साजरा केला. संस्थेने प्रकाशित केलेल्या “मी अन् माझ्या दोघी” पुस्तकातील लेखिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व समाजाप्रती योगदान देणाऱ्या स्त्रीयांना “नवदुर्गा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
साहित्य, कला, क्रिडा, आरोग्य व अध्यात्म या माध्यमातून कार्य करणाऱ्या जीवन आशय बाल युवा केंद्र या संस्थेने नऊ क्षेत्रातील मान्यवर स्त्रीयांचा सन्मान त्या त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असून समाजाप्रती योगदान देतात म्हणून त्यांना सन्मानित केले.
सौ.प्रिती जाधव.
सौ जुई व सौ सुमेधा कुलकर्णी
डॉ. सौ रेश्मा पोवार.
स्वाती तालीकोटी.
डॉ सौ अंजली पाटील
सौ. सुषमा शितोळे
सौ. स्मिता पाटील
सौ रेणू कुलकर्णी
सौ सुजात गाट
सौ अपर्णा चव्हाण
सौ विजया पाटणकर
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या आधारस्तंभ व डॉ. शरद टोपकर यांच्या मातोश्री यांना श्रध्दांजली अर्पण करून झाली तसेच नारायणी या बाल कलाकार हिने गायलेल्या प्रार्थनेने झाली. स्वागत प्रस्ताविक सौ वैशाली शिन्दे यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रृतिका कुलकर्णी हिने केले .
दिपप्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद टोपकर, संचालिका सौ शैला टोपकर, सौ .रुपाली कुंभोजकर, डॉ दिपा कित्तुर , सौ. स्मीता पाटील . ट्रस्टी सौ. अदिती कुलकर्णी टोपकर ह्यांच्या हस्ते झाले
शालेय मुले , कॉलेज मधील युवक व युवती तसेच महिला , जेष्ठ नागरिक यांच्या साठी जीवन आशय बाल युवा केंद्र ही संस्था कोल्हापुरात गेली २३ वर्षे कार्य करीत आहे . गेली १५ वर्षे संस्था अनाथ आश्रमातील मुलासाठी कार्य करीत आहे.
जीवन आशयच्या कार्यक्रमा ला संस्थे बद्दल स्नेह असणारे असंख्य पालक , शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपास्थित होते . संस्थेच्या संचालिका सौ शैला टोपकर यांनी आपले मनोगत व नवदूर्गांचा परिचय करून दिला . नवदुर्गांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. सर्व नवदूर्गानी आपले मनोगत व्यक्त केले . याच कार्यक्रमात संस्थेने या वर्षीपासून आदर्श माता पुरस्कार दिला. तो स्वतः मोलमजूरी करून आपल्या जावेच्या मुलांना उच्चशिक्षित व आत्मनिर्भर करणाऱ्या सौ.सविता सरवदे या सोलापूरच्या या मातेने मिळवला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सौ जी एस पाटील या होत्या.
एकंदरीत कार्यक्रम नवदुर्गांच्या मनोगतानंतर खूपच रंगत गेला . प्रमुख पाहुण्याच्या अमुल्य मार्गदर्शना नंतर सौ रुपाली कुंभोजकर यांनी आभार प्रदर्शन केले . सौ पुजा टोपकर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली . या कार्यक्रमात कृषि विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी स्वंयसेवकांचे काम केले .
लेखिकांचा व नवदुर्गाचा सत्कार प्रमुख पाहुण्या डॉ जी .एस पाटील तसेच संस्थेच्या ट्रस्टी सौ शुभदा केसकर यांचे हस्ते करण्यात आला .