28/08/2025
श्री. सागर कांतिलाल अभंग (लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत विडणी) यांच्या संकल्पनेतून व हरित दिशा फाउंडेशन तर्फे 8 ऑगस्ट 2025 रोजी गावात पर्यावरण संवर्धन व हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने झाडे लावणी उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात गावातील रस्त्याच्या कडेला तसेच उपलब्ध जागांमध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, महिला बचतगट व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग घेतला.
संपूर्ण गाव हरित करण्यासाठी सरपंच श्री. अभंग यांनी पुढाकार घेतला असून गावातील नागरिकांनी या झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. या झाडलावणीमुळे गावातील हरित क्षेत्र वाढण्यासह पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार असल्याचे मत हरित दिशा फाउंडेशन चे कार्यकर्ते यांनी व्यक्त केले.