SSBLPM

SSBLPM since 1995.

Shri Sant Bhagwan Baba Lokseva Pratishthan, Munguswade is an organization which has been carrying out social activities like science, education, arts, sports, culture, nature conservation etc.

*चित्रकला *निबंध लेखन *निरीक्षण किंवा शोधनिबंध लेखन*जलजागृती उपक्रमास अभिप्रेत असे एखादे मॉडेल बनवणे*कुणाला संगीताची आवड...
21/04/2026

*चित्रकला
*निबंध लेखन
*निरीक्षण किंवा शोधनिबंध लेखन
*जलजागृती उपक्रमास अभिप्रेत
असे एखादे मॉडेल बनवणे
*कुणाला संगीताची आवड असल्यास आपले स्वतःचे गाणे रेकॉर्ड करून पाठवू शकता
करून पाठवायचे आहे...........

*लहान गट*

इयत्ता 5 वी
इयत्ता 6 वी
इयत्ता 7 वी
--------------

*मोठा गट*

इयत्ता 8 वी
इयत्ता 9 वी
इयत्ता 10 वी........................................
*खुल्या गटासाठी सर्व वयांची सर्व विषयांचे कोणतेही बंधन नाही.* ...................
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्र संबंधित विषयांवर
बक्षीस पात्र कलाकृती/लेखन/प्रथम तीनअभिव्यक्तीस आकर्षक बक्षीस
छोट्या स्वरूपामध्ये प्रदर्शन लावले जाईल...............................................
अटी: विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेमध्ये असला तरी फक्त तो *मुंगूसवाडे गावचा मूळ रहिवासी असावा .* विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अभिव्यक्ती अथवा कलाकृती पाठवताना खाली दिलेल्या नंबर वर शाळेचे नाव संपूर्ण पत्ता आणि शिकत असलेली इयत्ता हा संपूर्ण तपशील व आपल्या कलाकृतीचा उत्तम एचडी क्वालिटी मध्ये इमेज पाठवायचे आहे......................................
आपल्या कलाकृती पाठवण्याचा अंतिम दिनांक *29 एप्रिल 2026*
दुपारी 3 वाजेपर्यंत...........................................

अधिक माहितीसाठी
*9923309753*
या नंबर वर व्हाट्सअप करा वे..............................................

धन्यवाद..!!

राजेंद्र खेडकर
SSBLPM

20/04/2026

SSBLPM या समूहाकडून
१३ एप्रिल २०२१ पासून
" जल जागृती" नावाची एक मोहीम चालवली जाते.

या मोहिमेस *१३ एप्रिल २०२६* रोजी पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण झाले आहे.

त्या निमित्ताने 13 ते 29 एप्रिल दरम्यान पंधरा दिवसाचे जलजागृती माहिती कॅम्पेन चालवत आहोत.

या संपूर्ण मोहिमेची सखोल माहिती आमच्या अधिकृत समाज
माध्यमावर उपलब्ध आहे. या अनुषंगाने संकल्पनेचे प्रबोधन व्हावे म्हणून *पंधरा दिवसाचे* माहिती अभियान चालवत आहोत.

विद्यार्थ्यांना या कॅम्पेन मध्ये भाग घ्यायचा असल्यास कृपया आम्हाला कळवा.

*कॅम्पेन ऍक्टिव्हिटी*

मोहिमेच्या विषयाला धरून खालील प्रकारामध्ये अभिव्यक्ती सादर करू शकता.

*चित्रकला
*निबंध लेखन
*निरीक्षण किंवा शोधनिबंध लेखन
*जलजागृती उपक्रमास अभिप्रेत
असे एखादे मॉडेल बनवने
*कुणाला संगीताची आवड
असल्यास आपले स्वतःचे गाणे रेकॉर्ड करून पाठवू शकता
(आपले गाणे असतात विषयालाधरून असा वी).........................................

लहान गट

इयत्ता 5 वी
इयत्ता 6 वी
इयत्ता 7 वी
--------------

मोठा गट

इयत्ता 8 वी
इयत्ता 9 वी
इयत्ता 10 वी..................................................
*खुल्या गटासाठी सर्व वयांची सर्व विषयांचे
कोणतेही बंधन नाही.*
फक्त मुंगूस वाडी गावचा मूळ रहिवासी असावा.................................................
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्र संबंधित विषयांवर
बक्षीस पात्र कलाकृती/लेखन/प्रथम तीनअभिव्यक्तीस आकर्षक बक्षीस
छोट्या स्वरूपामध्ये प्रदर्शन लावले जाईल. ...................................................
अटी: विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेमध्ये असला तरी फक्त तो इंग्लिश वाडी गावचा मूळ रहिवासी असावा . विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अभिव्यक्ती अथवा कलाकृती पाठवताना खाली दिलेल्या नंबर वर शाळेचे नाव संपूर्ण पत्ता आणि शिकत असलेली इयत्ता हा संपूर्ण तपशील व आपल्या कलाकृतीचा उत्तम एचडी क्वालिटी मध्ये इमेज पाठवायचे आहे......................................
आपल्या कलाकृती पाठवण्याचा अंतिम दिनांक *29 एप्रिल 2026*
दुपारी 3 वाजेपर्यंत...........................................

अधिक माहितीसाठी
*9923309753*
या नंबर वर व्हाट्सअप करा वे..............................................

धन्यवाद..!!

राजेंद्र खेडकर
SSBLPM

💦*"जलजागृती "*💦0️⃣7️⃣ **वा दिवस**           नमस्कार मित्रांनो,    आपण गेल्या चार-पाच दिवसापासून वरील लेखमाला चालू केली आ...
20/04/2026

💦*"जलजागृती "*💦
0️⃣7️⃣ **वा दिवस**

नमस्कार मित्रांनो,
आपण गेल्या चार-पाच दिवसापासून वरील लेखमाला चालू केली आहे. दोन- तीन दिवसांमध्ये जलजागृती या संकल्पनेविषयी ओळख, विविध उपक्रम, वैयक्तिक करायच्या कृती या विषयावर चर्चा केली आहे.

आज आपण जलजागृती च्या माध्यमातून करावयाची सामूहिक कृती, सवयी, समाजभान या विषयावर चर्चा करणार आहे.

मी आपणास विनंती करतो की, लेखनामध्ये माझ्या काही मराठी मध्ये व्याकरणाच्या व इतर स्वरूपाच्या चुका होऊ शकतात कृपया सुधारून वाचावे.

समाजभान म्हणजे काय हो..? तर समाजभान म्हणजे वैयक्तिक लाभासाठी नसलेली एखादी कृती किंवा काम. ज्या कामाचे समाजाला सामूहिकरित्या काहीतरी दिशा मिळू शकते किंवा सामूहिक स्वरूपाचा फायदा होऊ शकतो अशा कामाकडे संवेदनशील दृष्टीने पाहणे. असामलाअर्थ अपेक्षित आहे .

मागील तीन ते चार वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या गावामध्ये “वॉटर” नावाच्या संस्थेने मुंगूसवाडे गावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वे केला होता. सदरील सर्वेचा संपूर्ण रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे तर काय होती ही योजना? नगर जिल्ह्यातील काही सिलेक्टिव्ह गावांना या योजनेअंतर्गत आराखडा तयार करून काही जलसंधारणाची कामे करायची होती. त्याप्रमाणे गावातील लोकप्रतिनिधींकडून गावाचा संपूर्ण सर्वे करून त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आहे. तो मी आपणाला सादर करतो या रिपोर्ट मध्ये संपूर्ण बेसिक माहिती भरून प्रत्यक्ष हा कामाला सुरुवात झाली होती. लोकप्रतिनिधींचे व प्रशासकीय व्यक्तींचे असे म्हणणे आहे की, हे काम करताना काही स्थानिक अडचणी आल्यामुळे बंद /स्थगित झाले आहे.
चांगली संकल्पना आपल्याकडे आल्यानंतर चे इम्प्लिमेंटेशन करताना कुणाचा वैयक्तिक विरोध का होतो. जर फायदा सामूहिक स्वरूपाचा असेल तर त्या कामाला चुकीच्या पद्धतीने विरोध होणे हे अतिशय चुकीचे कृत्य आहे. म्हणून मला असे सांगावेसे वाटते की योजना कितीही चांगली असली तरी 100% टक्के यशस्वी करण्यासाठी ग्राऊंडवरील लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो . लोकप्रतिनिधींनी त्यांचे काम व्यवस्थित पूर्ण केलेले दिसते परंतु लोकांनी त्याचा योग्य अर्थ समजावून नघेतल्यामुळे वरील योजना चार वर्षापासून बंद आहे.
तुम्ही पाणलोटाचा उपचार केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आपल्या मोहिमेतील हा मुद्दा सगळ्यात शेवटचा आहे. परंतु तरीसुद्धा मी आपणास इथे असे सांगू इच्छितो की सगळ्याच गोष्टी ह्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर 100% यशस्वी होतात किंवा पूर्णत्वाला जातात असे अजिबात नाही. किमान 40% लोक सहभाग हा लागतोच.
शासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी या पायाभूत सुविधांचा फायदा घेण्यासाठी येत नाहीत. जो फायदा होतो तो तुम्ही-आम्ही म्हणजे शेवटचे वापरकर्ते घेतात. फायदाही आपलाच आहे… आपलाच फायदा आहे तर मग चांगल्या उपक्रमांना विरोध करणं हे सत-सतविवेकी लोकांचे काम मला वाटत नाही.

वरील विधानास किंवा वरील उताऱ्यामध्ये या कामाशी संबंधित कोणी व्यक्ती हा लेख वाचत असेल तर तुमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती या व्यासपीठावर पुढे येऊन सादर करायची आहे.
सार्वजनिक रित्या करायच्या कृतीमध्ये आम्ही जाहीर केलेल्या जल जागृती योजनेमध्ये हा तिसरा टप्पा सांगितलेला आहे. तिसरा टप्पा हा संपूर्ण आठ ते दहा वर्ष कालखंडाचा तिथे नमूद केलेला आहे. तर शासनाच्या आणि बिगर शासनाच्या योजना ज्या माध्यमातून आणि लोकांच्या सहभागातून काही मोहिमा पार पाडल्या जातात परंतु त्याला लोक सहभाग हा अतिशय महत्त्वाचा गाभा समजला जातो . लोकसहभाग जर 40% पर्यंत पोहोचला तर कदाचित सामूहिक स्वरूपाची कामे होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये वॉटर शेड उपचार प्रक्रिया. रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण प्रक्रिया, बोअर पुनर्भरण प्रक्रिया इत्यादी सामूहिक कामांची सुरुवात केल्यास आपणाला 75% पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते ही अनेक ठिकाणी सिद्ध झाले आहे.

कोणी असे म्हणेल की, एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा एक शेत तलाव खोदा शासकीय अनुदान मिळते त्यातून प्लॅस्टिक वगैरे टाका आणि मग तुम्हाला याचा लगेच फायदा होईल. अशा प्रकारचे विधान करणारे मी अनेक लोक पाहिले आहेत. तर मी आपणाला सांगू इच्छितो की जर शेत तलावाचे पाणी जलजागृतीच्या योग्य प्रकारे वापरलं गेलं नाही तर संपूर्ण योजनाही अतिशय भयानक परिणाम दाखवूशकते निरीक्षणाअंती लक्षात आलेली आहे.

मी आपणाला काही प्रत्यक्ष पुरावे देतो. जर शेततलाव सरकारी 100% योजनेच्या नियमाप्रमाणे केल्यानंतर त्याची अंमलबजावणी नियमाप्रमाणे न केल्यास अनेक गावांना अनेक वस्त्यांना येणाऱ्या दहा वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्या वाचून बोंबलायची वेळ येणार आहे. काम शासन नियमाप्रमाणे करत असतील तर काहीप्रमाणात फायदा होऊ शकतो. बहुसंख्य लोक असे काम करत नाही त्यांच्यासाठी हे विधान आहे.
शेत तलावाची भरती पाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असताना तलाव भरत गेला तर त्या संबंधित परिसरातील पाण्याचा टक्का घसरतो. तो घसरलेला टक्का हा इतर लोकांच्या पाण्यावर गदा आणतो. कारण अशाप्रकारे पाणी विपुल प्रमाणात साठवल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावरून जवळपास बारा ते १७ टक्के पाणी बाष्पीभवनाने उडून जाते. पूर्वी हे पाणी विहिरीमध्ये साठले असल्यामुळे या पाण्याची बाष्पीभवन कमी होते. शेततलाव मात्र हा उथळ पृष्ठभाग असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी बाष्पीभवन, किरकोळ स्वरूपाचे लिकेज, स्टोर आहे म्हणून शेतकरी आपले ओलीत क्षेत्र वाढवतजातात किंवा बारमाही ओलिताखाली आणतात त्यामुळे पाण्याची मागणी वाढते . शेत तलाव सुद्धा अपुरा पडायला लागतो असं त्यांच्या लक्षात आल्यावर तेव्हा मात्र हे लोक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विहिरी,बोरमधून पाणी उपसा करून हा शेत तलावामध्ये 24 तास टाकायला सुरुवात करतात. असे सर्व शेतकरी नाही पण बहुतेक. जमिनीखाली 300 फुटाच्या खाली सुरक्षित असलेले पाणी सुद्धा असुरक्षित ठिकाणी आल्यानंतर बाष्पीभवन झाले आणि तसेच विहिरीमधील पाणी हे पन्नास Ft लेव्हलपर्यंतचे रात्रंदिवस ओढल्यामुळे त्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणावरून पाण्याचा सोर्स येतो त्या ठिकाणचा Area Dry होण्यास सुरुवात होतगेला परिणामतः संपूर्ण परिसर हा जलस्तर जास्तीत जास्त खाली जाण्याला कारणीभूत ठरला.

अनेकांच्या यशोगाथा ऐकताना आपण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा संबंधित शेतकऱ्याच्या व्हिडिओच्या पाठीमागील भाग अतिशय वाळवंट ग्रस्त झालेला दिसतो याचा अर्थ असा होतो की शेत तलावांनी संपूर्ण लोकांचे कल्याण होऊ शकत नाही. तो फक्त बोटावर मोजण्या इतपत लोकांचा फायदा होऊ शकतो ते सुद्धा त्यांनी जल व्यवस्थापन आणि जलजागृती कार्यक्रमांतर्गत आम्ही सांगितलेल्या गोष्टीची तंतोतंत पालन केले तरच.
ही योजना महाभयंकर ठरू शकते पाण्याचा स्टोरेज उपलब्ध असल्यामुळे जास्तीत जास्त वापर होतो आणि वापर झाल्यामुळे जे पाणी सर्वांना मिळणार होते ते एकाच शेतकऱ्याला मिळते आणि त्याचे परिणाम दूरगामी होतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या जमिनीतील वॉटर लेवलवर होतो आता Water Lavel ज्या ज्या गावांमध्ये तीनशे फुटा पेक्षा जास्त खोल गेलेली आहे असे पाणी भरायला वर्षानुवर्षे लागतील. आपण बोरमधून पाणी तर घेतो परंतु ते जमिनीतून त्या जागेपर्यंत पाणी जाण्यासाठी या प्रक्रियेला किमान दहा वर्ष लागतात 1 पावसाळ्यामध्ये हे पाणी भरत नाही. एका पावसाळ्यामध्ये भरणारे पाणी हे फक्त आणि फक्त 50 - 100 फुटापर्यंतच्या जलपातळीमध्ये असते म्हणून सामूहिकरीत्या करायच्या कामापैकी हे एक महत्त्वाचे काम आहे.
की ज्यांच्याकडे शेत तलाव असतील त्यांनी पाणी असलेल्या लोकांपेक्षा जास्त काटकसरीने पाणी वापरले पाहिजे एवढाच या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश आहे.
म्हणूनच जलसमृद्ध होण्याआधी जलसाक्षर व्हा...!!
धन्यवाद..

आजच्या लेखामध्ये आपण सामूहिक सवयी विषयी विश्लेषण केले.
उद्या आपण पीक पद्धती आणि सिंचित व्यवस्था विषयी चर्चा करणार आहोत.*

राजेंद्र खेडकर
लेख क्रमांक : 4
19 एप्रिल 2026
क्रमशः

📞: 9923309753

नमस्कार मित्रांनो,  *"जलजागृती " पंधरवाड्याचे साधारणतः ५ पाच दिवस संपत*  आहेत त्याच अनुषंगाने सविस्तर लिहीत आहे.*       ...
17/04/2026

नमस्कार मित्रांनो,
*"जलजागृती " पंधरवाड्याचे साधारणतः ५ पाच दिवस संपत*
आहेत त्याच अनुषंगाने सविस्तर लिहीत आहे.*

जलजागृती हा वैयक्तिक रित्या पाण्याविषयीच्या सूक्ष्म सवयी अंगवळणी पाडणे व करायचेच झाले तर वैयक्तिक स्वरूपाचेच पाणी वाचवण्याचे उपाय राबवणे, सध्यातरी याच पद्धतीचा अंगीकार आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून सांगत आहोत
असे आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये अभिप्रेत आहे.

जलजागृती म्हणजे अनेकांना असे वाटते की लगेच कुठल्यातरी पाण्याविषयी संस्थांना जाऊन जाऊन अटॅच होणे . सीएसआर फंडाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या संस्थांकडून काम करून वॉटर शेड करणे वगैरे किंवा लगेच मोठा पाऊल उचलून मोठमोठे खोदायची यंत्रसामुग्री उभा करून अमर्याद खोदायला सुरुवात करणे याचा अर्थ असा नाही. भरपूर अभ्यासाअंती त्याच्या मुळापर्यंत जाऊन अगदी छोटे मॉडेल बनवण्यात आले आहे . ही एक अंगवळणी पाडण्याची सवय स्वतःला किंवा स्वयशिस्त लावून दीर्घकालीन चालणारी समृद्ध, शांततेत करावयाची जलक्रांतीच आहे. इतकाच ह्याचा अर्थ आहे त्यामुळे अनेक जण ह्या पोस्ट वाचून कन्फ्युज/गोंधळात पडतात त्यांना असे वाटते की लगेच कुदळ फावडे घेऊन किंवा मोठे एक्सावेटर घेऊन पाणलोट क्षेत्रात जाऊन खोदकाम करायचे आहे याचा अर्थ असा अजिबात नाही. निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता खोदकाम जरी करायचे असले तरी त्याच्या संपूर्ण तांत्रिक बाबी विचारात घेऊन हे काम केले जाते फक्त आपल्याकडे डिझेल टाकून एखाद्या सीएसआर फंडातून एक्सावेटर येऊन उभा होणे आणि त्यांनी अमर्याद खोदाई करणे त्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची तांत्रिकता नसल्यामुळे तात्पुरते परिणाम मिळतात.

त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला उत्तम सवयी लावून घ्याव्या लागतील. आणि त्या सवयीची सुरुवात मी माझ्यापासून सुरुवात करतो म्हणजेच करत आहे.

अनेक ठिकाणी असे आढळून आले आहे की वॉटर कप वगैरे बक्षीस घेऊन पाच वर्षानंतर त्या गावात पुन्हा तीच परिस्थिती आहे. याचा अर्थ काय तर याचा अर्थ सरळ स्पष्ट असा आहे की उपाययोजना कितीही केल्या तरी त्यावर स्वयंशिस्त शेवटचा वापर करता हा तेवढ्याच तळमळीने सजग, सक्षम झाला नाही तर अपयश हे हमखास ठरलेले आहे. योजना कोणती असो.

जलजागृती म्हणजे नुसतेच पाणी आडवा, पाणी मुरवा, झाडे लावा झाडे जगवा असे नाही तर ती स्वतः अमलात आणायची एक अत्यंत सोपी , साधी सहज सर्वांना अमलात आणण्या सारखी सर्व समाज घटकांसाठी बिना खर्चिक अशी संकल्पना आहे.

हेच काम आम्ही जलजागृती मोहिमेच्या माध्यमातून सांगत आहोत.

स्वतःला शिस्त लावणे म्हणजे नेमके कायहो ? तर आपण वर्षानुवर्ष याच भूमीमध्ये राहत आहोत अनेक पूर्वजांचे पूर्वज याच भूमीमध्ये आले आणि गेले आपण सर्वजण सुद्धा या प्रकारामध्ये जगणारी सर्वसामान्य माणस आहोत. माझे वय आता 42 वर्ष आहे. आता मला सर्वसाधारण दुनियादारी समजणे च्या कालखंडाची पहिली पंधरा वर्षे आपण वजा करू उरलेल्या वर्षांमध्ये आपण याच गावामध्ये अनेक उन्हाळे- पावसाळी , दुष्काळ पाहिले आहेत. अनेक पूर्वजांनी मोठे मोठे दुष्काळाचे वर्णन आपण ऐकले आहेत. दर दहा वर्षात लहान मोठे दोन ते तीन दुष्काळ हे असतातच तर हे दुष्काळ आपल्याला कायमस्वरूपी काहीतरी शिकवत असतात त्याचाच उपयोग करून नकळत आपण निरीक्षण करत असतो. बऱ्याच वेळा खूप पाऊस होऊन सुद्धा भरपूर प्रमाणात टंचाई वाढते. आता याच वर्षीचे उदाहरण घेतले तर यावर्षी दहा वर्षातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद आपल्या परिसरामध्ये झाली आहे तरीसुद्धा यावर्षी बऱ्याच ठिकाणी आपल्या गावामध्ये जल स्तर हा 30 ते 40 फुटाच्या खाली गेलेला दिसतोय तर असे का होत असेल? जागृती म्हणजे एक आदर्श सवयी आहे . पाण्याविषयीच्या आदर्श सवयी स्वतःला लावून घेणे हाच याचा मतीत अर्थ होतो.

सवयी लावणे म्हणजे तरी काय हो. पहिली गोष्ट आपण पाण्याचा तांब्या भरून घेतल्यानंतर साधारणतः एक तांब्या अर्ध्या लिटरचा असतो त्याच्यातले अर्धे पाणी आपण पितो म्हणजे ज्याच्या त्याच्या तहानुसार कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तहान असो अथवा नसो पाण्याचा पूर्ण तांब्या भरून आपल्यासमोर ठेवला जातो मग तो तांब्या समोरच्या व्यक्तीला पाणी प्यायचे नसले तरीसुद्धा तो गुळना करून दोन घोट पिऊनपाणी स्वतःच्या हाताने ओतून देतात या एका छोट्याशा कृतीमध्ये एका माणसाकडून एक वेळा पाणी पिताना कमीत कमी 250ml पाणी वेस्ट होते बर .. हे पाणी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यामधूनच वेस्ट झालेली असते. त्याचे कारण असे आहे पावसाळा संपून गेल्यानंतर जमिनीत कुठेही कधीही पाणी तयार होत नाही फार फार तर काही टक्क्यांनी ते जमीत गेल्यानंतर खडकामध्ये शोषले जाते त्याचे प्रमाण कमीच होते वाढत कधीही नाही.

आपण पूर्वी जमिनीच्या 15 ते 20 फुटावरून बादलीने वर घेत होतो वापरत होतो. नंतर अनेक सुधारणा झाल्यानंतर मोटार पंप आले एका मिनिटात पाचशे लिटर पाणी उपसणारे पंप आता उपलब्ध आहेत . सहाजिकच पाणी वर ओढण्याचं स्पीड वाढला परंतु जमिनीतले पाणी वाढण्याचं स्पीड वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून तोच आहे... मग मला हेच म्हणायचे आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणावर मूल्य उपलब्ध होतं तेव्हाच त्याची किंमत जाणवते. हे तांब्याभर पाण्याचे एक छोटेसे उदाहरणं आहेत.

पाणी उपसा करण्याचे स्पीड जर जास्त आहे तर जमीनित पाणी जाण्याचे सुद्धा जास्त पाहिजे. हे आपल्याला आपल्या कृतीतून करतात येते.

म्हणूनच जलसमृद्ध होण्याआधी जलसाक्षर व्हा...!!

धन्यवाद..

*राजेंद्र खेडकर*
लेख क्रमांक : २,
१७ फेब्रुवारी 2026
क्रमशः

📞: 099233 09753

🙏 On the occasion of Siddheshwar Yatra, a Kushti (Wrestling) Event organized by our organization is currently ongoing at...
16/02/2026

🙏 On the occasion of Siddheshwar Yatra, a Kushti (Wrestling) Event organized by our organization is currently ongoing at Munguswade village.
A great display of tradition, strength, and sportsmanship 🤼‍♂️🔥

Address

Pathardi
414113

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSBLPM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SSBLPM:

Share